Maharashtra Breaking 6th July LIVE Updates: धक्कादायक! रुग्णांच्या रिपोर्टच्या पेपर प्लेट बनून केईएम रुग्णालयात केला जातोय वापर

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 06 Jul 2024 12:37 PM
Nashik News: पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग कसारा येथे तुटली, वाहतूक विस्कळीत

Nashik News: मनमाडहून मुंबईला निघालेल्या पंचवटी एक्स्प्रेसच्या डब्यांचे कपलिंग निघाल्याची घटना कसारा स्थानकात आज सकाळी घडली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ऐन पावसात ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास कसारा स्थानकात पंचवटी एक्स्प्रेसचे तीन आणि चार क्रमांकाचे डबे इंजिनपासून वेगळे झाले. त्यामुळे गाडी काही अंतरावर जाऊन थांबली. रेल्वे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ  डबे जोडून गाडी पुढे धावल्याची माहिती दिली. मात्र तोपर्यंत प्रवाशांनी गर्दी करून व्हिडीओ व्हायरल केले. फोटो समाज माध्यमांवर आल्याने नेमका अपघात किती मोठा आहे, याची चर्चा सुरू होती.


या गाडीने हजारो प्रवासी मनमाड, इगतपुरी, नाशिक येथून मुंबईत येतात, संध्याकाळी प्रवास करतात. वर्षानुवर्षे ही गाडी प्रवाशांना सेवा देते. या गाडीबद्दल प्रवाशांना आकर्षण असून अनेकांना सोयीची ही गाडी असल्याने अपघात झाला तरी प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करत पावसाचे दिवस असल्याने अशा घटना घडू शकतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त दिली.

CM Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा माणगावमध्ये उपक्रम

CM Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक महीला या योजनेचा लाभ घेताना सेतू केंद्रावर अर्ज भरण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. गरजू आणि गरीब महिलांना याचा लाभ मिळावा याकरता राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये या उपक्रमाच अयोजन केलं आहे. यावेळी हजारोंच्या संख्येनं महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड देखील उपस्थीत आहेत. 

Mumbai News: धक्कादायक! रुग्णांच्या रिपोर्टच्या पेपर प्लेट बनून त्याचा वापर केईएम रुग्णालयात केला जातोय

Mumbai News: रुग्णांच्या रिपोर्टच्या पेपर प्लेट बनून त्याचा वापर केईएम रुग्णालयात केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार अजय चौधरी आणि शिवसेना पदाधिकारी नेते हे केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाशी  चर्चा करत आहेत. 

Navi Mumbai Politicle Updates: उबाठा शिवसेनेला मोठा धक्का; ऐरोलीतील नगरसेवकाचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Navi Mumbai Politicle Updates: नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ऐरोलीतील तीन टर्म नगरसेवक राहिलेले आणि उपजिल्हा प्रमुख पदावर असलेले मनोज हळदणकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हळदणकर यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. ऐरोली विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांना ताकद दिली जात नाही, त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते, पक्ष स्थरावर लोकांप्रती आंदोलनात्मक भुमिका नसल्याने गेल्या काही दिवसापासून मनोज हळदणकर नाराज होते. आपल्या विभागातील लोकांच्या समस्या सत्ताधारी पक्षाकडून सुटू शकतात या जाणिवेतून त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हळदणकर यांच्या प्रवेशाने ऐरोली विधानसभेत शिंदे गटाचे पारडे जड होण्यास मदत मिळणार आहे.

Pune Politics : इंदापुरात अजित पवार गटात फुट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune Politics : इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फुट पडली की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि शरद पवार गटाच्या बॅनरबाजी नंतर इंदापुरात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचेही भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत. यावर बॅनरवर लक्ष नाही फिक्स आहे 2024 प्रदीप दादा गारटकर आमदार साहेब असा मजकूर लिहिण्यात आला असून सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर असं नमूद करण्यात आलेय. या आधी दत्तात्रय भरने यांचे देखील भावी आमदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत.






 




Ashadhi Ekadashi 2024 : माऊली महाराजांच्या पादुकांचं आज होणार नीरा स्नान

Ashadhi Ekadashi 2024 : माऊली महाराजांचा पालखी सोहळा आज वाल्हेवरून निघाला आहे. दुपारी निरामधील दत्त घाटावर माऊली महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जाईल आणि इथून पुढे हा वैष्णवांचा मेळा पुणे जिल्ह्यातील आपला मुक्काम आटोपून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. वारकऱ्यांनी सकाळपासूनच दत्तघाटावर गर्दी करायला सुरुवात केली आहे आणि निरामधील हा दत्तघाट पूर्णपणे वारकऱ्यांनी फुलून गेला आहे.


 

Maharashtra News : सावरोली शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले 20 हजार सीड बॉल; पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनोखा उपक्रम

Maharashtra News : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सावरोली बुद्रुक शाळा पुढाकार घेत आहे. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीड बॉल (Seed Ball) बनविण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेऊन तब्बल 20 हजार सीड बॉल तयार केले आहेत. 


विविध बिया, माती, शेणखतापासून तयार करण्यात आलेल्या सीड बॉल शहापूर तालुक्यात गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे यांच्या हस्ते मातीत विविध ठिकाणी टाकण्यात आले.  


शाळेतील पटसंख्या 74 असून, विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी प्रेम, आत्मीयता जागृत करणे, पर्यावरण आणि मनुष्य यांचा सहसंबंधाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची संकल्पना या शाळेतील शिक्षिका पूनम रवींद्र उबाळे यांची असून यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. शाळा सुरू झाल्यावर गटागटांमधून सीड बॉल जमा करण्यात आले असून सर्वाधिक सीड बॉल बनवणाऱ्या गटाला बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे. 


या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे, गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, विस्तार अधिकारी डॉ. प्राजक्ता राऊत, केंद्रप्रमुख मनीषा जटाळ, वनक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले.

Sindhudurg News: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील जिल्हा परिषदेच्या इमारतीची भिंत कोसळली

Sindhudurg News: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील जिल्हा परिषद च्या इमारतीची भिंत कोसळली, त्याची पाहणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. ज्या शाळेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर शिकले ती शाळा दीपक केसरकर दुरुस्त करू शकले नाहीत हे या शाळेचं दुर्दैव आहे. या शाळेतील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम शिक्षण मंत्र्याच्या खात्याकडून होत आहे. अश्या पद्धतीच्या कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या जिल्यातील 22 शाळा असल्याचा दावा राउतांनी यावेळी केला. त्या शाळांमध्ये मूल शिकत असून ही शिक्षण खात्याची लापरावाई शिक्षण खात्याला शोभा देणारी नाही. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम शिक्षण मंत्र्यांच शिक्षण खात करत असल्याचा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

New Delhi : निवडणूक आयोगानं एकतर्फी पक्ष आणि चिन्ह शिंदे यांना दिलं, असा ठाकरे गटाचा दावा, 15 जुलैला सुनावणी

New Delhi : सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज सुरू होताच दुसऱ्या आठवड्यात राज्यातील प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. 


शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 15 जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. 


निवडणूक आयोगानं एकतर्फी पक्ष आणि चिन्ह शिंदे यांना दिलं, असा ठाकरे गटाचा दावा आहे. 


मागच्या अनेक महिन्यांपासून या याचिकेवर सुनावणी झालेली नाही


त्यामुळं आता तरी सुनावणी होऊन कोर्ट काही सूचना करत का हे पाहणं महत्वाचं

Gondia News: गोंदियाच्या वडेगावातील प्राथमिक शाळेत 7 वर्गांसाठी फक्त दोनच शिक्षक; शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही, पालकांचा निर्णय

Gondia News: गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील  वडेगाव/बंध्या या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत विद्यार्थांना शाळेत पाठवणार नाही असा निर्णय पालकांनी घेतला. काल 5 जुलै पासून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले नसल्यामुळे शाळा ओस पडली आहे. राज्यात 1 जुलै 2024 पासुन विदर्भातील संपूर्ण शाळा सुरु झाल्यात आणि सर्वत्र शाळा प्रवेश उत्सव दिवस साजरा करण्यात आला. मात्र, वडेगाव येथील शाळेत केवळ दोनच शिक्षक असुन विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेत एकुन 1 ते 7 वर्ग असुन एकूण 112 विद्यार्थी या शाळेत आहेत. मात्र शाळेला एक मुख्याध्यापक आणि एकच शिक्षक असुन या शाळेला एकूण 5 शिक्षकांची गरज असताना शाळेला दोनच शिक्षक असून 3 पदे रिक्त आहेत. विद्यार्थांच्या पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने शासानाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी शिक्षक भरती सुरू असल्याने सर्व पालक शिक्षक मिळतील अशी अपेक्षा लावून होते परंतु जिल्हा परिषदेने भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकही शिक्षक शाळेला दिला नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पासून सगळ्यांना निवेदन दिले.परंतु गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेत शिक्षकांची अजुनही नियुक्ति केली नाही.त्यामुळे पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त करत कालपासून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही त्यामुळे विद्यार्थांविना शाळा ओस पडली आहे.जोपर्यंत शाळेत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

Nilesh Lanke Agitation: निलेश लंके यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस

Nilesh Lanke Agitation: मविआच्या वतीने सुरू असलेल्या 'शेतकरी जन आक्रोश' आंदोलनाच्या ठिकाणी दुधाच्या कॅनची हंडी उभारण्यात आलीये. त्याला कांद्याच्या माळा लावण्यात आल्या असून आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून आज मोठ्या संख्येने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मेंढ्या, म्हशी आणि गायी आणल्या जाणार असल्याचे निलेश लंके यांनी सांगितले आहे...सोबतच जिल्हाधिकाऱ्यांवर कुणाचातरी दबाव असल्याचे म्हणत निलेश लंके यांनी नाव न घेता राधाकृष्ण विखेंवर टीका केली आहे.

Shirdi Rain Updates: भंडारदरा धरण परिसरात पावसाचा जोर कायम; अनेक धबधबे प्रवाहित

Shirdi Rain Updates: अहमदनगर जिल्ह्यात बळीराजा पावसाची वाट पाहत असला तरी उत्तर नगर जिल्ह्यासाठी शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे 11039 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या धरणाचा पाणीसाठा 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे भात लागवडीला वेग आला असून आदिवासी या भात लागवडीत व्यस्त झाला आहे. तर सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरण परिसरातील अनेक छोटे-मोठे धबधबे हे प्रवाहित झाले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरण परिसर हा हिरवाईन नटला असून पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

Nashik News: नाशिकच्या सिडको परिसरात दोन वर्षांचा चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून पडल्यानं गंभीर जखमी

Nashik News: नाशिकच्या सिडको परिसरात दोन वर्षांचा चिमुकला दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.,सिडकोच्या  काळे मळा येथे शुक्रवारी 2 वर्षांचा करीम शेख नावाचा मुलगा दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला.  गॅलरीच्या रेलिंगवर पकडून उभा राहून खेळत असताना त्याचा तोल जाऊन  खाली पडला. ही घटना लक्षात येताच त्याला खाजगी उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघाताची घटना cctv मध्ये कैद झाली आहे.

Bhandara News: शेतीवर जाण्यासाठीच्या मार्गासाठी वृद्ध शेतकऱ्याचं भंडाऱ्यात आमरण उपोषण

Bhandara News: शेतीवर जाण्यासाठी बावनथडी उपसा सिंचन योजनेच्या वितरीकेचा वापर करण्यात येत होता. मात्र, याच मार्गावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यावर शेती केली आहे. यामुळं त्या अतिक्रमित शेतीच्या पुढे असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीवर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळं अनेकांना शेती करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं प्रशासनानं हे अतिक्रमण काढून शेतीवर जाण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा, या मागणीसाठी भंडाऱ्याच्या खमाटा टाकळी या गावातील वृद्ध शेतकरी शामराव गायधने यांनी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे.

Beed News: माऊली महाराजांच्या पादुकांना आज होणार निरास्नान

Beed News: माऊली महाराजांचा पालखी सोहळा आज वाल्हे वरून निघाला आहे. दुपारी निरा मधील दत्तघाटावर माऊली महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जाईल आणि इथून पुढे हा वैष्णवांचा मेळा पुणे जिल्ह्यातील आपला मुक्काम आटोपून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल.


वारकऱ्यांनी सकाळपासूनच दत्तघाटावर गर्दी करायला सुरुवात केली आहे आणि निरा मधील हा दत्तघाट पूर्णपणे वारकऱ्यांनी फुलून गेला आहे.

Bhiwandi News: भिवंडीत सहाशे किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

Bhiwandi News: प्लास्टिक पिशव्या विक्री आणि वापरण्यास बंदी असताना सुद्धा भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्या विक्री व वापर होत असल्याने पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त फैसल तातली यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्लास्टिक पिशवी आणि थुंकण्यावर कारवाई करण्यासाठी नेमलेल्या रेयान एंटरप्राइजेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तीनबत्ती येथील दुकानात कारवाई करून तेथे विक्री साठी असलेला सिंगल युज पिशव्यांचा साठा जप्त करत दुकानदारास 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Ratnagiri : बारसू गावापासून 5 किमी अंतरावरील जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित

Ratnagiri Barsu Refinery : कोकणात रिफायनरी प्रस्तावित असलेल्या बारसू गावापासून 5 किमी अंतरावरील जमीन औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. वाडीखुर्द गावातील 125 हेक्टर म्हणजे 308 एकर जमीनिच्या औद्योगिक क्षेत्राबाबतची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या अधिसूचनेनंतर स्थानिक पातळीवर अनेक चर्चांना सुरुवात आता झाली आहे.

Bhandara Nana Patole Banner : नाना पटोले बनणार मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष! भंडाऱ्यात ठिकठिकाणी लावले बॅनर

Bhandara Nana Patole Banner : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना माझगाव क्रिकेट क्लबने सदस्यत्व दिलं आहे. त्यामुळे नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झालीय आहे. अशात भंडाऱ्यात नाना पटोले हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनणार असल्याच्या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. भंडारा जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती मदन रामटेके यांनी लावलेल्या बॅनरवर....ये वादा रहा, आमच्या भंडाऱ्याचा नाना भाऊ पटोले बनेल मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष. शेतकरी पुत्र ते भावी मुख्यमंत्री, यात जोडली जाणार क्रिकेटच्या इतिहासाची सुवर्ण अक्षराने नोंद.... या आशयाचे हे बॅनर भंडारा शहरात ठिकाणी लावण्यात आले आहेत. या बॅनरवर नाना पटोले हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनणार असं नमूद आहे. नानांच्या या बॅनरमुळे आता नाना मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढतील या चर्चेला आता सुरुवात झाली आहे. 

Nagpur Crime : हिट अँड रन प्रकरणातील रितू मालुच्या अटकेसाठी तहसील पोलिसांकडून सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल

Nagpur Crime : नगापूर : हिट अँड रन प्रकरणातील रितू मालुला अटक करण्यासाठी तहसील पोलिसांनी अटकेसाठी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला आहे.


घटनेनंतर अनेक महिने फरार असलेल्या रितू मालूने आत्मसमर्पण करत अटक केली. मात्र अटक अवैध असल्याचे म्हणत तांत्रिक चुकांमुळे न्यायालयाने पोलिसांना सूनवल रितू मालूला जामीन दिला.


25 फेब्रुवारी 2024 ला रितू मालुने दारूच्या नशेत वाहन चालवत दोन तरुणांना मृत्यूस कारणीभूत ठरली.


मात्र यात पोलिसांनी केलेल्या तांत्रिक चुकीने तिची सुटका झाली.


त्यामुळे आता तहसील पोलिसांनी पुन्हा नव्याने सत्र न्यायालायर रिव्हिजन अर्ज दाखल करत अटकेसाठी परवानगी मागितली.

Akola News: अकोल्यात भंगार बाजारातील एका दुकानाला आग

Akola News: अकोल्यात भंगार बाजारातील एका दुकानाला आग लागली आहे. सकाळच्या सुमारास ही आग लागली असून शॉट सर्किट मूळ आग लागली असावी, असा अंदाज घटनास्थळी वर्तविला जात होता. अग्निशमन दलाला माहिती देताच् घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. या आगीत सुदैवानं जीवितहानी झाली नसून दुकानातील काही सामान पुर्णता जळाले आहे.

Nashik : सहा तरुण सायकलवर निघाले पंढरीला

Nashik News : नाशिकच्या नांदगाव येथील सायकलिस्ट ओम ठाकूर यांच्यासह 6 तरुण आज नांदगाव ते पंढरपूर अशी सायकलवारी करण्यासाठी रवाना झाले आहेत. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत 372 किलोमीटरची ही पंढरपूर वारी अवघ्या 3 दिवसांत हे सहा तरुण पूर्ण करणार आहेत. निसर्गाचे संवर्धन करा, झाडे लावा, झाडे जगवा. निसर्गावर प्रेम करा हा संदेश हे तरुण पोहोचवणार आहेत. यापूर्वी देखील या तरुणांनी केदारनाथ, अयोध्या, अमरनाथ अशी सायकलवारी केलेली आहे.

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी वारीसाठी 64 विशेष रेल्वे फेऱ्या; 7 जूलैपासून विशेष फेऱ्यांचे आरक्षण सुरू

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या वारीतील भाविकांच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने 64 विशेष रेल्वे फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-मिरज-नागपूर (4 फेऱ्या), नवी अमरावती-पंढरपूर (4), खामगाव-पंढरपूर (4), लातूर- पंढरपूर (10), भुसावळ-पंढरपूर (2), मिरज-पंढरपूर (20), मिरज- कुडूवाडी (20) या मार्गावर विशेष फेऱ्या धावणार आहेत. 7 जूलैपासून विशेष फेऱ्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. फेऱ्यांच्या सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.

Chhatrapati Sambhajinagar: वाळुंज एमआयडीसीमधून चोरट्यांकडून 4 लाख 30 हजाराचा मुद्देमाल लंपास

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज एमआयडीसीमधून अज्ञात सात ते आठ चोरट्यांनी कंपनीचे शटर उचकटून आत प्रवेश करत कंपनीतील तांब्याचे पिताळाचे धातुंसह इतर साहित्य असे 4 लाख 30 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना 30 जून रोजी सकाळी  वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एसपी इंजीनिरिंग वर्कस या कंपनीमध्ये घडली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.

Buldhana News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बोलावला कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा

Buldhana News : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाण्यात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा बोलावला आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रविकांत तुपकर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. अद्यापही रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी संघटनेतून हकालपट्टी किंवा रविकांत तुपकर यांनी स्वतःहून स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडल्याचं अधिकृत कुठेही म्हटलेलं नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेतल्यास रविकांत तुपकर आपली पुढील राजकीय भूमिका आज ठरवणार असल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधून आज रविकांत तुपकर कुठल्या पक्षात जायचं किंवा नवीन पक्ष स्थापन करायचा याबाबत निर्णय घेणार आहेत. मात्र एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, रविकांत तुपकर हे स्वतःचा नवीन पक्ष स्थापन करू शकतात अशी खात्रीलायक माहिती आहे.

Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट

Ravindra Waikar : रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट मिळाल्याची माहिती मिळत आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी EOWकडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेनं गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 


मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

Manoj Jarange Shantata Rally: मनोज जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आणि अशोक चव्हाणांमध्ये काल तब्बल दोन तास चर्चा

Manoj Jarange Shantata Rally: मनोज जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आणि अशोक चव्हाणांमध्ये काल तब्बल दोन तास चर्चा झाली. यावेळी संदिपान भुमरेही  उपस्थित होते.

Manoj Jarange Shantata Rally: मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीतून सुरुवात

Manoj Jarange Shantata Rally: मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीला आज हिंगोलीतून सुरुवात होणार आहे. जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून 13 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलंय. दरम्यान हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय. सकाळी साडेअकरा वाजता जरांगेंच्या शांततात रॅलीला सुरूवात होणार आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्या तब्बल दोन तास चर्चा

Manoj Jarange : जालन्यातील अंतरवली  सराटी मध्ये भाजप नेते अशोक चव्हाण आणि खासदार संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली या तिघांमध्ये जवळपास दोन तास ही चर्चा झाली, मीडिया ला या चर्चेपासून दूर ठेवण्यात आलं होतं ,मात्र सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असून हा विषय लवकर संपवा अशी आमची भावना असल्याने संवाद होण्याच्या कारणाने आपण आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.


दरम्यान अशोक चव्हाण हे सरकार, समाज  किंवा माध्यम म्हणून आलेत का? हा विषय महत्त्वाचा नसून त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरूच राहील बाकी आमच्या मागण्याबाबत पाठपुरावा सुरूच राहणार असून, सगे सोयरे ची आमच्या प्रमाणे व्याख्या, हैदराबाद गॅजेट आणि सरसकट गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

Nagpur Crime: पत्नीच्या कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे नव्हते, पतीनं पत्नी, मुलीला शीतपेयातून विष देत स्वतःही घेतलं

Nagpur Crime: नागपूर : कॅन्सर पीडित पत्नीच्या उपचारासाठी केरळ राज्यातून नागपूरल आलेल्या एका दाम्पत्यानं 12 वर्षीय मुलीला विष देऊन स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील विजयश्री नगर येथे घडली आहे. या घटनेमध्ये दाम्पत्याचा मृत्यू झाला असून त्यांची 12 वर्षांची मुलगी मात्र बचावली आहे. तिच्यावर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय (मेयो) येथे उपचार सुरू आहेत.


रीजु विजयन उर्फ विजय नायर (45) आणि प्रिया रीजु नायर (34) असं आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. आत्महत्या प्रकरणाचा जरीपटका पोलीस तपास करत आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.