Maharashtra News LIVE Updates : अखेर ठरलं! विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, निवडणुकीला रंगत चढणार

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

प्रज्वल ढगे Last Updated: 05 Jul 2024 03:55 PM
वाहन चालकांसाठी खुशखबर, जगातील पहिल्या सीएनजी बाईकचं अनावरण!

जगातील पहिल्या सीएनजी बाईकचं अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालं. बजाज कंपनीने या पहिल्या-वहिल्या सीएनजी बाईकची निर्मिती केलीये. सीएनजी प्लस पेट्रोल अशी ही हायब्रीड बाईक आहे. दोन किलो सीएनजी आणि दोन लिटर पेट्रोल वर ही बाईक 330 किलोमीटरचं अंतर कापते. तीन मॉडेलमध्ये असलेल्या या बाईकची 95 हजारे ते एक लाख 10 हजार इतकी किंमत आहे. 

मोठी बातमी! पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर 

पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेत सादर 


शंभूराज देसाई यांनी मांडलं विधेयक 


परीक्षतेल्या तोतयागिरी, फेरागिरीला बसणार आळा 


अपराध करणाऱ्या व्यक्तीला ३ ते १० वर्षांची शिक्षा, तसंच १ कोटी रुपये दंडाची तरतूद

अखेर ठरलं! विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, निवडणुकीला रंगत चढणार

विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायची वेळ संपली 


विधानपरिषद निवडणुकीतून कुणीही माघार घेतली नाही 


विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात 


12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार 


गुप्तपद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता 

मोठी बातमी! अजित पवार वारीत सहभागी होणार, वारकऱ्यांसोबत चालणार

हल्ली सर्वांना वारीत चालावे असे वाटते त्यामुळे मी देखील पालखीत चालणार आहे- अजित पवार


जयंत राव येतील असे मला वाटत नाही. ते आले तर मी त्यांना कुठेही घेऊन जायला तयार आहे- अजित पवार

Hathras Stamped : भोले बाबाचा आर्थिक व्यवहार सांभाळणारा देवप्रकाश मधुकर अजूनही फरार

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील हाथरस दुर्घटना प्रकरण 


सत्संग आयोजक आणि मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर अजूनही फरार 


मधुकर याला शोधून देणाऱ्याला एक लाख रुपयांच बक्षीस 


उत्तर प्रदेश मधल्या सलीमपूर गावचा रहिवासी देवप्रकाश मधुकर 


देवप्रकाशच्या घराला सध्या कुलूप असल्याची माहिती 


देवप्रकाश हा भोले बाबाचा आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची माहिती समोर 


उत्तर प्रदेश पोलिसांकडून देवप्रकाशचा शोध सुरू

Crop Insurance : एबीपी माझाच्या बातमीचा दणका, एक लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा कंपनीने स्वीकारला

एबीपी माझाच्या बातमीचा मोठा दणका


माझाच्या बातम्यानंतर एक लाख 14 हजार शेतकऱ्यांचा विमा कंपनीने स्वीकारला


माझाच्या बातम्या नंतर काही तासात शेतकऱ्यांचा विमा स्वीकारला


अजूनही दोन लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे दावे फेटाळलेले


कंपनीने दावे फेटाळण्याचे दिलेले कारण योग्य न वाटल्यास कृषी विभाग करणार कंपनीवर कारवाई


वेळप्रसंगी विमा कंपनी ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा


जिल्हा कृषी अधीक्षक प्यार देशमुख यांची माजला माहिती

Mumbai Andheri Hit And Run Case: पुण्यानंतर आता मुंबईच्या अंधेरीत हीट अँड रनची घटना, दोन तरुणांना बोलोरो कारने उडवले

 पुण्यानंतर आता मुंबईच्या अंधेरीत हीट अँड रनची घटना 


मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन तरुणांना भरधाव वेगाने जात असलेल्या बोलोरो पिकप कारने उडवले


यात एक तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी


जखमी तरुणआवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू

Chhatrapati Sambhajinagar Fight Video : संभाजीनगरमधील महाराणीचा व्हिडिओ व्हायरल, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण

छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग


संभाजीनगरमधील महाराणीचा व्हिडिओ व्हायरल


दोन तरुणांकडून एकाला जोरदार मारहाण


संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील घटना


रक्तबंबाळ होईपर्यंत केली मारहाण


मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Porsche Car Update : पोर्शे कार अपघात प्रकरणातील विधिसंघर्षग्रस्त बालकाने सादर केला 300 शब्दांचा निबंध

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अपडेट


"त्या" विधिसंघर्षग्रस्त बालकाने प्रस्तूत केला ३०० शब्दांचा निबंध


अल्पवयीन तरुणाने बाल न्याय मंडळापुढे सादर केला निबंध


अपघातप्रकरणी आरोपी असलेल्या त्या तरुणाला बाल न्याय मंडळाने सुनावली होती निबंध लिहण्याची शिक्षा


समुपदेशन आणि वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) सोबत काम करणे यासारख्या इतर अटींचे पालन करण्यासाठी प्रक्रिया देखील सुरू

धक्कादायक! पुण्यातील वाघोलीत डॉक्टराकडून तरुणावर कोयत्याने हल्ला

पुणे  वाघोलीत डॉक्टराने तरुणावर केला कोयत्याने हल्ला..


डॉक्टरांकडून तरुणाने व्याजाने घेतलेले पैसे वेळेत परत न दिल्याने डॉक्टर आणि गुंडांनी मिळून केला तरुणावर हल्ला


जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या इतर दोन साथीदार गुंड मिळून फिर्यादी प्रितेश बाफना यांच्यावर केला हल्ला.. 


हल्ल्या प्रकारात पुण्यातील वाघोली येथील लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल...


पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात डॉक्टरचा आता कोयता घेऊन हल्ला करत असल्याने खळबळ उडाली आहे.

Pune Crime : बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी पुण्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकसाह पत्नीवर गुन्हा दाखल

पुणे : तत्कालीन शिक्षण उपसंचालकसाह पत्नीवर गुन्हा दाखल


लाचलुचपत विभागाची कारवाई


बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी पुण्यातील तत्कालीन शिक्षण उपसंचालकसाह पत्नीवर पुण्यात गुन्हा दाखल


कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वत:च्या व पत्नीच्या नावे ३१ लाख ७८ हजार २०० (ज्ञात उत्पन्नापेक्षा २५.२६ टक्के) किंमतीची संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमवल्या प्रकरणी पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल


प्रवीण वसंत अहिरे पत्नी स्मिता प्रवीण अहिरे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे


पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल

Pune Rain Update : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये पूरक पाऊस

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये पूरक पाऊस


खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये एकूण 5 टीएमसी पाणीसाठा


पावसाला सुरूवात झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांत  वाढला एकूण दीड टीएमसी पाणीसाठा 


चारही धरणांमध्ये मिळून शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा


खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये २६ जून या दिवशी ३.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. हा साठा बुधवारी ४.९९ टीएमसी झाला आहे

मोठी बातमी! पुणे पोलिसांच्या तावडीतून महिला आरोपीचे पलायन

पुणे पोलिसांच्या तावडीतून महिला आरोपीचे पलायन


हडपसर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई निलंबित


पालखी सोहळ्यादरम्यान महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीने केले पलायन


धुरपता अशोक भोसले हिला मंगळवारी हडपसर पोलिसांनी अटक केली होती


संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत अनेक महिलांचे दागिने चोरल्याप्रकरणी केली होती


पोलिसांची नजर चुकवून बुधवारी भोसले ने पलायन केले


याप्रकरणी कर्तव्यात बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा केल्याने महिला पोलीस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे

विधानपरिषद निवडणुकीत महायुती आपला उमेदवार मागे घेणार नाही, अजित पवार यांची भूमिका

विधानपरिषद निवडणुकीत महायुती आपला उमेदवार मागे घेणार नाही 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका 


विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय


आज ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत


महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे आता लक्ष

बोईसरच्या वर्तक नगर गल्ली परिसरात पहाटेच्या सुमारास दुकानांना भीषण आग

पालघर : बोईसरच्या वर्तक नगर गल्ली परिसरात पहाटेच्या सुमारास दुकानांना भीषण आग


कपड्याच्या दुकानांना लागली होती आग


आगीत दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान 


अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांसह जवानांनी आग आणली आटोक्यात  


आगीचे कारण अस्पष्ट, मात्र शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज

मोठी बातमी! गाईच्या दुधात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ, गोकुळ दूध संघाचा निर्णय

गोकुळ दूध संघाकडून पुणे आणि मुंबई या ठिकाणी गाईच्या दूध विक्री दरामध्ये वाढ


एक जुलैपासून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी केली वाढ


गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी


पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ नाही

Vasai Virar Rain Update : नालासोपारा परिसरात सकाळपासून पावसाची संततधार, शेतकरी सुखावला

वसई विरार - नालासोपारा परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.


संपूर्ण परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, जोरदार पाऊस पडत आहे.
मागच्या तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे.
आज आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे .


काही तुरळक, सकल भाग सोडले तर शहरातील मुख्य रस्त्यावर कुठेही पाणी साचलं नाही


विरार-चर्चगेट पश्चिम रेल्वे सेवा तसेच शहरातली वाहतूकसेवा सुरळीत सुरू आहे.


संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला आहे.


विरार पूर्वेच्या विवा जांहगीड परिसरातील दृश्य

आषाढी एकादशीसाठी नाशिकमधील सायकलस्वारांची सायकल वारी 

नाशिक -  नाशिक ते पंढरपूर सायकल वारी 
- आषाढी एकादशीसाठी नाशिकमधील सायकलस्वारांची सायकल वारी 
- नाशिक सायकल लिस्ट फाउंडेशनचा उपक्रम 
- ढोल ताशाच्या गजरात वाजत-गाजत सायकल वारीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान 
- पंढरपूर येथे सायकलचे करणार गोल रिंगण 
- आज नाशिक मधून निघाल्यानंतर उद्या पंढरपूरमध्ये संध्याकाळी पोहोचणार 
- सायकल चालवत जात, सायकल वारीत पर्यावरण वाचवा, अमली पदार्थ विरोध, असे सामाजिक संदेश देणार...

Shekhar Chandrashekhar Granted Bail : सुकेश उर्फ शेखर चंद्रशेखरला हायकोर्टाचा दिलासा

सुकेश उर्फ शेखर चंद्रशेखरला हायकोर्टाचा दिलासा


गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मंजूर


याप्रकरणात जास्तीत जास्त 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असताना, सुकेश 7 वर्षे 10 महिने तुरूंगात आहे


याच मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयानं मंजूर केला सुकेशचा जामीन अर्ज


मात्र देशभरात दाखल अन्य गुन्ह्यात खटले सुरू असल्यानं सुकेशला तुरूंगातच राहावं लागणार, सुकेश सध्या तिहार जेलमध्ये कैद


या बंगलोर स्थित व्यावसायिकावर शेकडो लोकांना फसवून 100 कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप


जॅकलिन फर्नांडिससोबतची मैत्री आणि निवडणूक आयोगातून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं अमिष काहींना दिल्यानं सुकेश चंदेरशेखर आला होता चर्चेत

पार्श्वभूमी

सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विधिंमडळाचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेनात विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे विरोधकही सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नांना चोख उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय पातळीवर सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनातही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जात आहे.


दुसरीकडे राज्यात मुंबई, कोकण भागात मौसमी पाउस चालू आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी जोमात बरसतायत तर काही ठिकाणी अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. या घडामोडी तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व बातम्यांचे अपडेट्स वाचा एका क्लीकवर...  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.