Maharashtra Breaking 3rd July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी...

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 03 Jul 2024 03:10 PM
सुधीरभाऊ तुम्ही कार्यक्षम मंत्री, महाराष्ट्रात राहिलात त्याबद्दल आम्हाला खूप आनंद, जयंत पाटलांचा टोला

जयंत पाटील 


सुधीर भाऊ तुम्ही कार्यक्षम मंत्री आहात तुम्ही महाराष्ट्रात राहिला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे


जयंत पाटील यांचा सुधीर मुनगंटीवार यांना मिश्किल टोला

Sangli News: दूधदर वाढीसाठी तासगाव मध्ये दुध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने धडक मोर्चा

Sangli News: तासगाव मध्ये दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादकांकडून धडक मोर्चा काढण्यात आला. गाई म्हैशी च्या दुधाला मिळणारा अपुरा दर,  दुधात होणारी भेसळ अशा विविध समस्यां चा सामना करणार्‍या दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . सरकारने वेळोवेळी पोकळ घोषणा करूनही सातत्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा कार्यक्रम केला. सध्या गाईच्या दुधाला सांगली जिल्ह्यात 28 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 48 रुपये दर देण्यात येतो.   परंतु, यामध्ये उत्पादन खर्चही निघत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा. शिवाय शासनाकडून जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदानासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करता करता शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे.   त्यामुळे, आम्हाला अनुदान देण्यापेक्षा थेट दर वाढवून द्यावा. तसेच भाकड जनावरांना महिन्याकाठी पंधराशे रुपये अनुदान मिळावे आणि मोफत विमा सुद्धा मिळावा. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळात सरकारला तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशाराही या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलाय.


 
Yavatmal News: उपमुख्यमंत्री कार्यालयातून वर्गणीसाठी नायब तहसीलदाराला फोन; महागाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Yavatmal News: उपमुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या कार्यक्रमासाठी 71 हजार रुपयाची वर्गणी दिलेल्या नंबर पाठवा नाहीतर तुमच्या विरोधात असलेला प्रश्न अधिवेशनात लावण्यात येईल. याचा परस्पर निपटारा करायचा असेल तर वर्गणी पाठवा असा फोन उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून पाटनकर नामक इसमाचा महागाचे नायब तहसीलदार गोदाजी राठोड यांना आला. 


या फोन कॉलवर विश्वास ठेवून नायब तहसीलदार राठोड यांनी 1 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजता वाजता मंडळ अधिकारी संजय नरवाडे, किरण मतपलवार यांच्या समक्ष 2 हजार रुपये वर्गणी पाठवली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा महागाव तहसील कार्यालयाचे महसूल सहायक शेख गुलाब शेख कासम यांना भ्रमणध्वनीद्वारे 2500 रुपयाची मागणी करण्यात आली. राठोड यांचा संशय बळावल्यामुळे त्यांनी नागपूर व कार्यालयाशी संपर्क करून खात्री केली असता पाटणकर यांनी असा कोणताही कॉल केला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे दिसताच गोदाजी राठोड यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध महागाव पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी महागाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Akola News: अकोल्यात लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून पैसे उकळणारा तलाठी निलंबित

Akola News: अकोल्यात लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून पैसे उकळणारा तलाठी राजेश शेळकेला निलंबित करण्यात आलंय. 'एबीपी माझा'नं यासंदर्भातील वृत्त दाखविलं होतंय. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी निलंबनाचे आदेश दिलेयेत. राजेश शेळके हे शहरातील मोठी उमरी भागाचे तलाठी आहेयेत. मोठी उमरी येथील तलाठी कार्यालयात योदनेसाठी नोंदणी सुरू असतांना हा प्रकार घडलाय. पैसे स्विकारतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला होताय. अमरावतीनंतर अकोल्यात लाडकी बहीण योजनेत पैसे घेणार्या तलाठ्यावर प्रशासनाची कारवाई केलीये. सरकारने दिलेत पैसे घेणार्यांवर कारवाईचे सक्त आदेश दिलेयेत. शेळकेच्या निलंबन आदेशात 'एबीपी माझा'च्या बातमीचा उल्लेख आहेय. 

Chhatrapati Sambhaji Nagar: उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण कार्यालयात उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे. महाज्योती फेलोशिप मिळावी या मागणीसाठी हे विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून उपोषण करत आहेत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांची बैठक घेत फेलोशिपचा प्रश्न सोडवणार असल्याचं आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही फेलोशिपचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने विद्यार्थ्यांनी संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. तर उपोषणकर्ते विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Pune News: पिंपरीतील एकोणतीस बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश. तीनशे रहिवाशी बेघर होणार?

Pune News: पिंपरी चिंचवडमधील एकोणतीस बंगले जमीनदोस्त केली जाणारेत. इंद्रायणी नदीच्या ब्लू-लाईन अर्थात पुररेषेत हे बंगले उभारण्यात आलीत. त्यामुळं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने सहा महिन्यांत या बंगल्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश दिलेत. त्यामुळं इथल्या तीनशे रहीवाश्यांवर बेघर होण्याची वेळ आलीये. जरे वल्ड नामक बिल्डरने अंधारात ठेऊन, फसवणूक केल्याचा आरोप आता रहिवाशी करतायेत. तक्रारदार वकील तानाजी गंभीरेंनी ही बाब 2017 साली पिंपरी पालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. तेंव्हा एका बंगल्याचे काम सुरू होते. त्यावेळी पालिकेने दुर्लक्ष केलं. पुढं कोरोना काळात गंभीरेंनी हरित लवादाने याचिका दाखल केली. मात्र तांत्रिक कारणांमुळे सुनावणी झाली नाही. प्रत्यक्षात सुनावणी सुरू झाली तेंव्हा इथं तीन बंगले होते, मग सुनावणी दरम्यान पालिकेने माहिती दिली तेंव्हा एकोणतीस बंगले उभारल्याचं समोर आलं. असा दावा गंभीरेंनी केलाय. पुररेषेत बांधलेले हे बंगले पाहून हरित लवादाने पालिकेवर ताशेरे ओढलेत. आता पुढच्या सहा महिन्यात हे बंगले जमीनदोस्त करून बांधकाम करणाऱ्यांसह संबंधित दोषींकडून पाच कोटींचा दंड वसुलण्याने आदेश हरित लवादाने दिलेत. आता हे बंगले जमीनदोस्त करण्याशिवाय कोणताच पर्याय नसल्याचं पालिकेने म्हटलंय. त्यामुळं इथल्या रहिवाश्यांवर मोठं संकट उभारलं आहे. आमची चूक झालीये पण यातून काहीतरी तोडगा काढावा, अशी विनवणी इथले रहिवाशी करतायेत.

साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो : सुधीर मुनगंटीवार


विश्वजीत कदम


माझ्या मतदारसंघात सागरेश्वर  जुनं अभयारण्य आहे तिथे 2000 हरण आहेत 


माझ्याकडे हरणांचं नुकसान होत आहे 


साप वनखात्याच्या अंतर्गत येत नाही मग कशात येतो



सुधीर मुनगंटीवार


कुंपण हे डीबीटीच्या माध्यमातून दिले जात


राज्यात कुंपणासाठी डीबीटी दिली जाते 


सर्प दंश आणि त्याची मदत वनविभागात येत नाही


साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो


त्यामुळे वनविभागाच्या विभागात येत नाही

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पंचवार्षिक कार्य अहवालाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पंचवार्षिक कारकिर्दीच्या अहवालाचे प्रकाशन मुंबईत पार पडले.माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. 


उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात घेतलेले निर्णय, विविध विभागांना दिलेले निर्देश, कोविड वेळी केलेले काम, तीर्थक्षेत्र विकास, पंढरपूर देवस्थान आराखडा मंजुरी व निधीची उपलब्धता यासारखे अनेक विषय गेल्या पाच वर्षात मार्गी लावले आहेत. अशा अनेक महत्वपूर्ण कामकाजाचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. यावेळी  डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कार्यक्षम कारकिर्दीबद्दल मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी गौरव उद्गार काढले.  


मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह  इथे प्रकाशनाचा सोहळा पार पडला. यावेळी प्रकाशनाला मंत्री मा.श्री. श्री. उदय सामंत, मंत्री मा.श्री. संजय राठोड, मंत्री मा.श्री. दीपक केसरकर, मंत्री मा.श्री. दादाजी भुसे, मंत्री मा.श्री. शंभूराजे देसाई, आमदार संजय शिरसाठ यांच्यासह शिवसेनेचे आमदार, जिल्हाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांचा अर्ज बाद, आता रिंगणात 12 उमेदवार

विधानपरिषदेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून ज्यांनी दोघांनी अर्ज भरला होता होता त्यांचा अर्ज हा आज अर्ज पडताळणी समितीने बाद केला आहे


अजय सिंग सेंगर आणि अरुण जगताप या दोन्ही अपक्ष उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात आला आहे ..


आत्ता निवडणुकीच्या रिंगणात १२ उमेदवार असणार ..

ठाण्याचे पालकमंत्री शोधून दिल्यास गावठी कोंबडा व वळघणीचे मासे बक्षीस, मुरबाडधील राष्ट्रवादीच्या बॅनरची चर्चा

ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई याची निवड झाल्या पासून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये  अनेक समस्या निर्माण झाल्या तरी पालकमंत्री फिरकले नाहीत. त्यामुळं मुरबाड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी पालकमंत्री यांना शोधून दिल्यास गावठी कोंबडा व वळघणीचे मासे  बक्षीस ठेवले आहेत.  पालकमंत्री नाही थाऱ्यावर जनतेला सोडलंय वाऱ्यावर. मुरबाडमध्ये लावलेल्या या बॅनची चर्चा सर्वत्र होत आहे .



Palghar News: पालघर - लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिलांची गर्दी

Palghar News: राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील तहसील कार्यालय आणि सेतुं बाहेर महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते. उत्पन्नाचा दाखला,  रहिवासी दाखले यासाठी नागरिकांनी पालघर तहसील कार्यालयाबाहेर देखील तुंबळ गर्दी केली असून या कार्यालयात ओसंडून गर्दी दिसून आली . आधीच शाळा सुरू झाल्याने नवीन प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची गर्दी असतानाच या योजनेची घोषणा सरकारने केल्यानंतर मोठी गर्दी वाढल्याच पहायला मिळतंय. मात्र ग्रामीण भागात हे अर्ज भरण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने महीलांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात येत आहे.

Hathras Tragedy : हाथरस दुर्घटनेवरुन सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Hathras Tragedy : हाथरस दुर्घटनेवरुन सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील विशाल तिवारी यांनी दाखल
याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करुन तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सगळ्या राज्यांना निर्देश दिले जावेत. सुप्रीम कोर्टातील याचिकेकडे संपूर्ण उत्तर प्रदेश राज्याचे लक्ष लागलं आहे. 

Hathras Tragedy : भोलेबाबाचे महागडे शौक उघड; सत्संगात 30 हून अधिक गाड्यांचा ताफा

Hathras Tragedy : भोलेबाबाचे महागडे शौक उघड


भोलेबाबाला महागड्या गाड्याचा शौक, सत्संगात 30 हून अधिक गाड्यांचा ताफा


भोलेबाबासोबत महिला सुरक्षा रक्षकांचा असतो  जत्था

Mahadev Jankar: मी कधीच विधानसभा निवडणुकीला उभा राहणार नाही : महादेव जानकर


Mahadev Jankar: मी कधीच विधानसभा निवडणुकीला उभा राहणार नाही : महादेव जानकर



'दोन टर्म परिषदेत होतो आता दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे' : महादेव जानकर 

मी नाराज नाही : महादेव जानकर

'मला लोकसभेत संधी देण्यात आली, जनतेचा कौल मान्य' : महादेव जानकर

Vidhan Parishad Adhiveshan : विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनुपस्थित

Vidhan Parishad Adhiveshan : विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनुपस्थित

अंबादास दानवेंवरील निलंबन कारवाईचा आमदारांकडून निषेध

⁠कालही याच विषयावरुन ठाकरे गटाच्या आमदारांचा सभागृहातून वॉकआऊट

Nawab Mallik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का? : अजित पवार

Nawab Mallik : अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर काल बैठक पार पडली या बैठकीला नवाब मलिकांनींही हजेरी लावली होती.. नवाब मलिक यांच्यावर असलेल्या आरोपावरुनच त्यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास अडचणी असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच स्पष्ट केलं होतं मात्र तरीही नवाब मलिक बैठकीला उपस्थित होते.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत दोन मोठे बदल; वयाच्या मर्यादेत 65 वर्षांपर्यंत वाढ

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत सरकारने दोन महत्त्वाचे बदल केलेत. वयाची मर्यादा वाढवण्यात आलीये. आता 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येणारेय. याआधी 21 वर्ष पूर्ण झालेल्या आणि 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा फायदा घेता येत होता. तर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे शेतजमीनीची अटही रद्द करण्यात आलीये. पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. मात्र ही अट शिथिल करण्यात आलीये. 

Pune News: पुण्यातील तरुणांचा जीवघेणा प्रवास कॅमेऱ्यात कैद

Pune News: पुण्यातील तरुणांचा जीवघेणा प्रवास कॅमेऱ्यात चित्रित झालाय. दिवेघाटातून येताना तरुण अॅम्बुलन्सला लटकून प्रवास करत असल्याचं दिसत आहेत. नागरिकांनी संबंधित प्रकार मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं आहे. अशा पद्धतीचा प्रवास जीवावर बेतू शकतं तरीही नसतं धाडस करुन जीवघेणा प्रवास करत आहेत. त्यामुळे अशा मुलांचं काय करायचं असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Nanded News: राजकीय पूर्व वैमनस्यातून हिमायतनगरचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर चाकूहल्ला

Nanded News: राजकीय पूर्व वैमनस्यातून हिमायतनगरचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यावर रात्री चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला.या जिवघेण्या हलल्यात माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड गंभीर जखमी झाले.भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष राम सूर्यवंशी यांनी राठोड यांच्यावर चाकू हल्ला केला आहे.राठोड आणि सूर्यवंशी यांच्यात मागील काही दिवसांपासून राजकीय वाद सुरू होता. रात्री भाजपचे राम सूर्यवंशी आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्यात पुन्हा वाद झाला.आणि या वादातून राम सूर्यवंशी यांनी कुणाल राठोड वर चाकूने हल्ला केला.राठोड या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. राठोड यांच्यावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Mumbai Accident: मुंबईत भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

Goregaon Accident : मुंबई : मुंबईत झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण शहर हादरलं आहे. मुंबई उपनगरातील गोरेगाव पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावरून दुचाकी थेट खाली कोसळली. तब्बल 20 फुट खाली दुचाकी कोसळली. त्यामुळे गाडीचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला होता, तर दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या दोघांचाही या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात वैभव गमरे आणि आनंद इंगळे यांचा मृत्यू झाला आहे. 

Mumbai Cricket Association Election: नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवण्याच्या तयारीत?

Mumbai Cricket Association Election 2024: मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी म्हणून निवड  करण्यात आली आहे. त्यामुळे नाना पटोले आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर नाना पटोले माझगाव क्रिकेट क्लबचं प्रतिनिधित्व करणार आहेत. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Share Market : सेन्सेक्स निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्सनं 80 हजारांचा टप्पा केला पार

Share Market : शेअर बाजारातून (share market) एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. शेअर बाजाराने एक नवा इतिहास रचला आहे. सेन्सेक्सने (sensex) पहिल्यांदाच 80 हजारांचा टप्पा पार केला आहे. काल देशांतर्गत बाजारात थोडीशी घसरण झाली होती. पण आज व्यवसाय मजबूत राहण्याची चिन्हे दिसत आहेत.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. अजित पवारांच्या बैठकीला नवाब मलिकांची उपस्थिती, बैठकीला आमंत्रण आल्यामुळे मलिक उपस्थित राहिले, फडणवीस, एकनाथ शिंदेंना रूचणार का याची चर्चा


2. विधानपरिषदेच्या नऊच्या नऊ जागा निवडून आणा, मुख्यमंत्र्यांच्या आमदारांना सूचना, विधानसभेच्या तयारीला लागण्यचेही आदेश


3. लाडकी बहीण योजनेत दोन बदल, वयाच्या मर्यादेत 65 वर्षांपर्यंत वाढ, तर पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार, तर अर्ज भरण्यासाठी ⁠31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ


4. तुम्ही नकली वाघांसोबत आहात इथे असली वाघांमध्ये या, वाघनखं कधी आणणार या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना टोला


5. दीक्षाभूमीवर झालेल्या हिंसक आंदोलनाबाबत गुन्हा दाखल, वंचितचा शहर अध्यक्ष रवी शेंडेही आरोपी, इतर सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल


6. राज्यात गायीच्या दुधाला प्रतिलीटर 30 रूपये निश्चित दर, सरकारकडून पाच रूपये अनुदानही देण्याचा निर्णय तर दूध पावडर निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना 30 रूपये प्रतिकिलो अनुदान


7. पुण्यात झिकाच्या रूग्णसंख्येत वाढ, 7 रूग्ण आढळले, झिकाच्या रूग्णवाढीचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न


8. हाथरसमधील चेंगराचेंगरीला भोलेबाबाचे सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका, लाठ्याकाठ्यांच्या जोरावर गर्दी रोखल्याची माहिती उघड, चेंगराचेंगरीत 116 भाविकांचा मृत्यू


9. दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून, बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान, तर दहावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै दरम्यान होणार


10. गणेशोत्सवासाठी एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी उद्यापासून आरक्षण, समूह, वैयक्तिक आरक्षणासह परतीचं तिकीटही काढता येणार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.