Maharashtra Breaking 31st July LIVE Updates: माजी खा.चिखलीकर यांना मोठा धक्का, कट्टर समर्थक जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Breaking 31st July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 31 Jul 2024 12:25 PM
धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला


3हाजार 300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू


कृष्णा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे घोडबंदर मार्गांवर तीन महिन्यात 12 गंभीर अपघात, 2 जणांचा मृत्यू 

मीरा भाईंदर  : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून  ठाणे घोडबंदर मार्गांवर महिनाभर पूर्वी  डांबरीकरण करण्यात आलं होतं.  परंतु ते काम निकृष्ट दर्जाचं केल्याने पुन्हा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. ठाण्याच्या घोडबंदर मार्गांवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते.  याशिवाय या मार्गांवर मुंबई वसई विरार भाईंदर भागातून वाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांचे प्रमाण अधिक आहे मात्र तेथील रस्त्याच्या वाईट अवस्थेमुळे हा रस्ता प्रवाशासाठी आता घातक ठरू लागला आहे.  मागील तीन महिन्यात 12 गंभीर अपघात घडले असल्याची नोंद काशिगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.  त्यात 2 जणांचा मृत्यू ही झाला आहे.  आता  तरी बांधकाम विभाग खड्डे भरण्याकडे लक्ष देणार का..? असा संतप्त सवाल नागरीक विचारत आहेत.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर


सागर कुंभार या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा


सागर कुंभारला 8 जून रोजी गोव्यातील हॉटेलच्या खोलीतून अटक करण्यात आली होती


मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या एसआयटीकडून सागर कुंभार, इगो मीडियाचा संचालक भावेश भिंडे, जान्हवी मराठे आणि स्ट्रक्चरल इंजिनीअर मनोज संघू यांच्याविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे


घाटकोपर होर्डिंग कोसळून 17 ठार आणि 80 हून अधिक लोकं जखमी झाल्याप्रकरणी झाली आहे आरोपींना अटक

Maharashtra News: विशाल, अतिविशाल सात प्रकल्पांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत मंजुरी

Maharashtra News: राज्यातील गुंतवणुकीबद्दल मोठी बातमी आहे. विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. हे सात प्रकल्प एकूण 81 हजार 137 कोटींचे आहेत. यामध्ये लिथियम बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सुमारे 20 हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. 

Manu Bhakar : भारताची पिस्टल नेमबाज मनू भाकरनं ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला

Manu Bhakar : भारताची पिस्टल नेमबाज मनू भाकरनं ऑलिम्पिकमध्ये  नवा इतिहास घडवला. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली. मनूनं 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकारात रविवारी वैयक्तिक कांस्यपदकाची कमाई केली होती. तिनं सरबजोत सिंगच्या साथीनं एअर पिस्टलच्या मिश्र दुहेरीचंही कांस्यपदक जिंकलं. त्यामुळं भारताच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात मनू भाकरचं नाव आता सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल.

Akola News : मिटकरींवर हल्ला करणाऱ्या दोन मनसे पदाधिकाऱ्यांना अटक, अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल

Akola News : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडी तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज साबळे आणि दुसरे पदाधिकारी सौरभ भगत यांना अटक करण्यात आलीये. पंकज साबळे मनसेचे अकोला जिल्हाध्यक्ष आहेयेत. अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरमधून रात्री उशीरा साबळे आणि भगत यांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलीये. दोघांनाही अटकेनंतर अस्वस्थ वाटत असल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आलंये. तोडफोड प्रकरणातील मुख्य सुत्रधार मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अद्याप फरारच अहेयेत. दुनबळे यांनीच मनसैनिकांना मिटकरींवर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्याचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती लागलाय. या प्रकरणात एकूण 13 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेयेत. यातील जय मालोकार या आरोपीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रात्री मृत्यू झालाय. दुनबळेंसह 10 आरोपी अद्याप फरार आहेयेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 31st July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानं मनसे सैनिक नाराज. अकोल्यात मनसे सैनिकांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची केली तोडफोड


2. हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड झाल्यानंतर अमोल मिटकरींना उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे फोन. दोषींवर कडक कारवाई करण्याचे अजित पवारांचे अकोला पोलिसांना आदेश.


3. हल्ला आणि गाडीवर तोडफोड प्रकरणी आठ मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांनी दाखल केले गुन्हे. सर्व मनसे कार्यकर्ते फरार


4. मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यांना भीक घालत नाही, गाडी तोडफोडीवर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचं नाव घेतात आणि गुंडागर्दी करतात. हा भेकड हल्ला आहे. याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार. मिटकरी यांची प्रतिक्रिया


5. मनसे सैनिकांनी राज ठाकरे यांच्या आदेशावरून हल्ला केला, हल्ल्यानंतर आमदार अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर आरोप


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.