Maharashtra Breaking 30th July LIVE Updates: वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत राडा; दोन्ही गटांचे कार्यकर्ते आपापसांत भिडले

Maharashtra Breaking 30th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 30 Jul 2024 02:35 PM
Maratha Reservation Agitation: मराठा आंदोलनात भाजपचा पदाधिकारी?

Maratha Reservation Agitation : मराठा आंदोलनात भाजपचा पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. 


मातोश्रीबाहेर रमेश केरे पाटील यांनी केलेल्या आंदोलनामध्ये कल्याणमधील भाजपाचा पदाधिकारी असल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, हा पदाधिकारी मराठा समाजाचा नसतानाही मराठा आंदोलनामध्ये सामील झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे, असा आरोप उबाठा गटाचे जिल्हा समनवयक हर्षवर्धन पालांडे यांनी केला आहे. 

 
OBC Reservation: ओबीसी आंदोलक आक्रमक, मोर्चा काढत दिली हिमायतनगर बंदची हाक

OBC Reservation: मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मागील पाच दिवसापासून ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.आज याच मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत.नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे ओबीसी बांधवानी मोर्चा काढत हिमायतनगर कडकडीत बंद ठेवले. दरम्यान मागील अकरा दिवसापासून ओबीसी आंदोलक दत्तात्रय आनंतवार यांनी हदगाव तालुक्यातील कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केले आहे. दत्तात्रय आनंतवार यांची तब्बेत खालावली आहे. शासनाने अद्याप दत्तात्रय आनंतवार यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही.त्यामुळे ओबीसी बांधव आता आक्रमक झाले असून दत्तात्रय आनंतवार यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी आणि मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावेत अशी मागणी ओबीसी बांधवांनी केलीय.

Yavatmal News : पांदनरस्ता तुडवत जावं लागतं अंत्यसंस्काराला

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्याचे शेवटचा टोक असलेल्या उमरखेड तालुक्यातील अकोली या गावात अंत्यविधीसाठी जाण्यासाठी ना रस्ता ना दहनशेडपासून अकोली गावातील रहवाशी वंचित आहेत. त्यामुळे अंत्यविधीसाठी ग्रामस्थांना पांदनरस्ता तडवीत अंत्यविधी करिता जावे लागत आहे. मागील कित्येक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून या कडे स्थनिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रस्नानाने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. 

Yashashree Shinde: यशश्री शिंदेच्या हत्येच्या निषेधार्थ पेणमध्ये मुक मोर्चा

Yashashree Shinde: उरण येथील तरुणी यशश्री शिंदे हीची क्रूरतेने हत्या केली गेली, या प्रकाराच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असतानाच रायगड मधील पेण शहरात देखील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मुक मोर्चाची हाक देण्यात आली , या मुक मोर्चाला लहान चिमुरड्यांसह महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता, शिवाय सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे असंख्य मावळे आणि विविध प्रकारच्या सामाजिक संघटनांचे सदस्य मोठया संख्येनी उपस्थित होते. कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता काळे कपडे परिधान करून, तोंडाला काळे मास्क लावून आणि हाताला काळ्या फित बांधून  मुक मोर्चा काढण्यात आला आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करा अस निवेदन या संघटनेच्या वतीने पेण पोलिस ठाण्यात देण्यात आले .

Wardha News : ओला दुष्काळ घोषीत करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनाची निदर्शनं

Wardha News : वर्ध्यात शेतकऱ्यांनी आणि विविध संघटनांनी किसान अधिकार अभियानच्या नेतृत्वाखाली एकत्र येत ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केलीय. वर्ध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विविध घोषणा देत निदर्शने करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून  सुरु असलेल्या अतीवृष्टी व  संततधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील  कापूस,  सोयाबीन, तुर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहेय. 

Mumbai News : वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत राडा 

Mumbai News : वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत राडा 


दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले 


जांबोरी मैदानात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामावरून एकमेकांना भिडले 


आदित्य ठाकरे जांबोरीत बेकायदेशीर काम केल्याचा मनसेचा विरोध 


संतोष धुरी आणि संदिप देशपांडे घटनास्थळी गेले असताना झाली बाचाबाची

Baramati Crime : बारामती शहर पोलीस ठाण्यात मारहाण झाल्याचा प्रकार 

Baramati Crime : बारामती शहर पोलीस ठाण्यात मारहाण झाल्याचा प्रकार 


फिर्याद द्यायला गेलेल्या व्यक्तीला ज्यांच्या विरोधात तक्रार द्यायला गेला त्यांनी मारहाण केल्याचा आरोपट


परवा रात्री झाली पोलीस ठाण्यात पोलीसासमोर मारहाण झाल्याची माहिती 


फिर्याद देण्याआधी झाला होता दोन गटात वाद


पोलिसांनी गुन्हा दाखल करूनही अद्याप पर्यंत प्रसारमाध्यमांना दिली नाही कोणतीही माहिती 


पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर मारहाण झाल्याने बारामती सुरक्षित आहे का असा प्रश्न विचारला जावू लागला आहे

Crime News : महाड येथुन बेपत्ता झालेला संदीप शिलीमकर याचा मृतदेह सापडला

Crime News : मागील चार दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील बिरवाडी विभागातून दोन तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आणि बेपत्ता असलेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी जवळच्या नातेवाईकांकडे तपास केला मात्र त्यांना कोणत्याच प्रकारची माहिती मिळाली नाही. शेवटी सूरु असलेल्या पोलिसांच्या शोध मोहिमेत महाडच्या ढालकाठी येथील बेपत्ता असलेला 31 वर्षीय संदीप शिलीमकर याचा मृतदेह अखेर गोवंडी खाडीपात्रात मिळून आल्यानंतर त्याने आत्महत्या केली असावी असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त होतोय.

Jalna News : जालन्यातील मंठा शहरात भीषण अपघात,आयशरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Jalna News : जालन्यातील मंठा शहरात आयशर ट्रकच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झालाय. शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह सहा वर्षीय मुलीला आणि एक ज्येष्ठ नागरिकाला भरगाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने धडक दिली,या अपघातात सहा वर्षीय मुलगी, महिला आणि एक जेष्ठ नागरिकाचा उपचारा दरम्यान दुर्देवी अंत झाला,सीमा चव्हाण वय 24 वर्ष, मारिया पठाण वय 6 वर्ष आणि रूपला राठोड वय 65 वर्ष असे मृतांचे नावे आहेत. तर या घटनेत इशिका चव्हाण ही चार वर्षाची चिमुकली मुलगी देखील जखमी झाली आहे. या घटनेने नंतर आयशर चालक फरार झाला असून मंठा शहरासह परिसरामध्ये या घटनेने हळहळ व्यक्त होतेय.

Lonavala Crime : लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडाचा मंगळवारी फैसला, सात वर्षानंतर निकाल लागणार?

Lonavala Crime : लोणावळ्यात चोरीच्या उद्देशाने 2017मध्ये एका जोडप्याची हत्या झाली होती. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी सलीम शेख आणि आसिफ शेख यांचा फैसला मंगळवारी पुणे सत्र न्यायालयात होणार आहे. 3 एप्रिल 2017 रोजी भुशी धरणाच्या मागील डोंगरात सार्थक वाघचौरे आणि श्रुती डुंबरेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पुढची अडीच महिने ही हत्या नेमकी कोणी केली, याचा उलगडा झाला नव्हता. मात्र यातील एका आरोपीने हॉटेलमध्ये दारूच्या नशेत त्याच्या मित्राकडे याची वाच्यता केली. ही बाब एका खबऱ्याने पोलीस शिपायाला दिली अन त्यानंतर या खुनाला वाचा फुटली होती. उज्वल निकामांनी या हत्येप्रकरणी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं होतं. मंगळवारी या खुनाचा अंतिम निकाल सुनावण्यात येणार आहे.

Buldana News : स्थानिक जिजाऊ भक्तांच्या विरोधानंतर, आंदोलनानंतर पुरातत्त्व विभागानं वृक्षतोड थांबवली

Buldana News : सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंचा जन्मस्थान असलेल्या राजे लखोजी जाधव यांच्या राजवाडा भोवतालची जवळपास 50 ते 60 वर्षे जुनी अशी आणि 60 ते 70 फूट उंच असलेली 40 ते 50 झाडे काल पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदेश देऊन कापलीत. ही माहिती परिसरात पसरतात स्थानिक नागरिकांनी व जिजाऊ भक्तांनी या ठिकाणी धाव घेतली. स्थानिक प्रशासनाला व जिजाऊ भक्तांना विश्वासात न घेता पुरातत्त्व विभागाने ही झाडे कापण्याचे आदेश दिले होते, मात्र स्थानिकांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली वृक्षतोड थांबवली आहे व त्यानंतर पुरातत्त्व विभागाने आदेश देऊन पुढील वृक्षतोड थांबवली आहे. मात्र तोपर्यंत 40 ते 50 झाडे कापल्या गेली होती आणि यामुळे राजवाड्याला भकास असं स्वरूप आलेल आहे. यामुळे स्थानिक आणि जिजाऊ भक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. स्थानिकांचा विरोध बघता तुर्त पुढील वृक्षतोड ही थांबवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


याबाबत नागपूर येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता सहाय्यक संचालक मयुरेश खाडके यांनी सांगितलं की , "जिजाऊ जन्मस्थळा समोरील राजवाड्याला या मोठ्या झाडांमुळे सौंदर्याला बाधा आली होती.  त्यामुळे पुरातत्व विभागाच्या नियमाप्रमाणे कठीण निर्णय घ्यावा लागला. पुढील काळात पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे सौंदर्यकरणासाठी वृक्षारोपण करण्यात येईल."

Raj Thackeray on Pune : आपल्या कुठल्याच शहरांत टाऊन प्लॅनिंग केलं जात नाही : राज ठाकरे

Raj Thackeray on Pune : पुण्यात गेल्या गुरुवारी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारी यंत्रणेवर परखड टीका केली. आपल्या कुठल्याच शहरांत टाऊन प्लॅनिंग केलं जात नाही, जमीन दिसली की विक हे एकमेव धोरण राबवलं जातं, असे ताशेरे राज यांनी ओढलेत. तर केंद्र सरकार स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका घेत नाहीये त्यामुळे नगरसेवक नसल्याने जबाबदारी घेणार कोण? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.

Raj Thackeray On Ajit Pawar: राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे. ते त्या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय; राज ठाकरेंचा खोचक टोला

Raj Thackeray On Ajit Pawar: पुण्यातील पूरस्थितीवरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे. ते त्या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. असा खोचक टोलाच राज ठाकरे यांनी अजित पवार यांना लगावला आहे. तर पुण्यात अचानक पूर आला. यामध्ये अजित पवार यांनी लक्ष घालायला नको का? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी अजित पवारांना केलाय. त्यांच्या टीकेला आता अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींनी उत्तर दिलंय.. 

Maratha Reservation: सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक, उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

Maratha Reservation: सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने काल मातोश्रीवर धडक दिली. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची समाजाची मुख्य मागणी आहे. याबाबत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनीही आपली भूमिका मांडावी असं या सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे. दरम्यान या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती. मात्र सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला न भेटता उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन बाहेर पडले.. ठाकरेंची भेट न झाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.. तर आज मराठा क्रांती ठोक मोर्चा मातोश्रीवर आंदोलन करणार आहे.. 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 30th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर बैठक, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा 


2. सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक, उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने मराठा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, 
मराठा क्रांती ठोक मोर्चा आज मातोश्रीवर आंदोलन करणार


3. अजित पवार नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय, पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना खोचक टोला, तर सुपारीबहाद्दरांनी दादांवर बोलू नये, मिटकरींचं प्रत्युत्तर 


4. पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पुराच्या पाण्यात उतरून काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप


5. राज्यात लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना सुरू, 5 आवडत्या कंत्रादारांना मदतनिधी दिला जातोय, रस्ते घोटाळ्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.