Anjali Damania : जोपर्यंत पुरावा सापडत नाही, तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबत  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिंचन घोटाळ्यावेळी अजित पवार यांच्यावर आरोप करण्यात आले त्यावेळी त्यांनी निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून स्वत: तडकाफडकी राजीनामा दिला होता असे दमानिया म्हणाल्या. त्यांच्याकडे कोणी मागितला नसतानाही राजीनामा दिल्याचते दमानिया म्हणाल्या.


मुंडे जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत लढायला हवं


दरम्यान, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे कसे संबंध आहेत, व्यवहार एकत्र आहेत, जमिनी एकत्र आहेत, कंपनी एकत्र आहे, दहशत एकत्र आहे. याबाबतचे हजारो व्हिडीओ समोर आले असल्याचे अंजडली दमानिया म्हणाल्या. एवढं सगळं होऊनही धनंजय मुंडेंना जनाची नाही मनाचीही लाज वाटत नसेल की आपण राजीनामा दिला न पाहिजे तर ही कठीण परिस्थिती असल्याचे दमानिया म्हणाल्या. मुंडे जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत लढायला हवं असेही दमानिया म्हणाल्या. चौकशीच पदोपदी नवनवीन माहिती समोर येत आहे.   


 मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट 


दरम्यान, आज मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांनी देखील सिंचन घोटाळ्यावेळी राजीनामा दिला होता, त्यामुळं धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्याव असे दमानिया म्हणाल्या. जोपर्यंत पुरावा सापडत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे. चौकशीमध्ये जो दोषी आढळे त्याच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावर बोलताना दमानिया म्हणाल्या की जनाची नाही मनाची असेल तर राजीनामा द्या अशी टीका त्यांनी केली. 


बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन चांगलच राजकीय वातावर तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी आहेत. त्यामुळं या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. या पु्रकरणावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.