Maharashtra Breaking 2nd August LIVE Updates: लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका; मंगळवारी तातडीची सुनावणी

Maharashtra Breaking 2nd August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

नामदेव जगताप Last Updated: 02 Aug 2024 03:00 PM
Sindhudurg News: सावंतवाडीतील जंगलात लोखंडी साखळीनं बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या 'त्या' अमेरिकन महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गमधून रत्नागिरीत

Sindhudurg News: सावंतवाडीतील सोनुर्ली रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या "त्या" अमेरिकन महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग मधून रत्नागिरी येथे मानसिक रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती बांदा पोलिसांनी दिली. तसेच ती महिला प्रथमदर्शी मानसिक रुग्ण असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र यात पोलिसांकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे तिच्या आधारकार्ड वरील पत्यावर सिंधुदुर्ग पोलिसांची दोन पथक गेली असून त्या पत्यावर पोलिसांना काही सापडलेले नाही. अमेरिकन महिला योग्य माहिती देत नसल्याने पोलिसांसमोर तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






 

 




शरद पवार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,देवेंद्र फडवणीस,उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा

मिटकरी जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या काय गाड्या फोडतात गाड्या फोडायच्या आहेत तर तुम्हाला तर शरद पवार उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी परभणीच्या गंगाखेडमध्ये केले आहे. प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने परभणीत होते परभणीतून ते आज गंगाखेड येथे गेल्यानंतर तिथे आयोजित जाहीर सभेत त्यांनी अशा प्रकारचं विधान केलंय.. तसेच जिंतेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांना चिल्लर म्हणुन संबोधले आहे.

Dhule News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती तयार करण्याच्या कामाला वेग, मूर्त्यांच्या भावात यंदा दहा टक्क्यांची वाढ

Dhule News : विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तीकरांची लगबग सुरू झाली आहे. अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मूर्तिकारांनी या कामाला वेग दिला आहे मात्र दुसरीकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याच्या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसून त्याबाबतचे आदेश आपल्याला प्राप्त झालेले नाहीत त्यामुळे आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या असून ग्राहकांकडून याच मुर्त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या तयार झाल्या असून यंदा मुर्त्यांच्या भावात दहा टक्क्यांची वाढ झाली आहे अशी माहिती धुळे शहरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार खरे यांनी दिली आहे. 


 
Maharashtra News : उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा 

Maharashtra News : कोकणात महायुतीत विधानसभेच्या जागांवरून शिमगा होणार का? असा प्रश्न आता उभा राहिला आहे. याचं कारण म्हणजे भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील पारंपारिक दोन मतदारसंघ सोडले जावेत अशी मागणी भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे. दरम्यान भाजपला एकही जागा न मिळाल्यास आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत असा दावा देखील सावंत यांनी केला आहे. तसेच वेळ पडलीच तर आम्ही स्वतंत्रपणे देखील विधानसभा निवडणूक लढू असे देखील सावंत यांनी म्हटलं आहे. पारंपरिक विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख करताना सावंत यांनी रत्नागिरी आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघाचे नाव घेतलं नसलं तरी रत्नागिरी आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार होते. पण सध्यास्थितीचा विचार केल्यास रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे दक्षिण जिल्हाध्यक्षांनी केलेल्या या मागणीला आता कार्यकर्त्यांनी देखील उचलून धरल्याचे चित्र आहे. दरम्यान याबाबत आता भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार? याबाबतची चर्चा रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Maharashtra News : जगात जर्मनी अन खड्ड्यात परभणी; शहरात येणारे रस्ते असो की शहरातील प्रमुख रस्ते असो सर्वत्र खड्डेच खड्डे

Maharashtra News : जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण परभणी बाबत प्रचलित आहे मात्र काही दिवसांपासून परभणी एका वेगळ्याच प्रश्नावरून प्रसिद्ध झाली आहे ती म्हणजे खड्ड्यांसाठी त्यामुळेच जगात जर्मनी आणि खड्ड्यात परभणी अशी म्हणण्याची वेळ परभणीकरांना आलीय.परभणी शहरातील प्रमुख रस्ते असो किंवा परभणी शहरात येणारे प्रमुख रस्ते असो सर्वच ठिकाणी गुडघ्यापेक्षा मोठे मोठे खड्डे झालेत आणि यामुळे पाऊस पडला तर पाण्याने खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेकजण पडत आहेत. 


 
ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात बोलायला तयार नसलेल्यान जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया

OBC Reservation : मनोज जरांगे जर येत्या विधानसभा निवडणुकीत 50 टक्के आमदार विधानसभा मध्ये पाठवणार या भूमिकेचे लक्ष्मण हाके यांनी स्वागत केलेय. पण जरांगे पाटील ज्या समाजासाठी आरक्षण मागत आहेत  त्या समाजाचे सदस्य सभागृहात कितीतरी पट अधिक आहेत असे हाके यांनी म्हंटलंय. मात्र ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने कुठलाही या महाराष्ट्र मधला आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसीची सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायला तयार नाही.  मग या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत,  कारण ही माणसं पराभूत झाली पाहिजे असं आमचंही मत असल्याचं हाके यांनी म्हटलंय.

Sangali News: सांगलीत भर रस्त्यात पेटली इलेक्ट्रिक बाईक

Sangali News: सांगली माधवनगर रस्त्यावर भर दुपारी इलेक्ट्रिक बाईकने पेट घेतला. दुर्गामाता मंदिर परिसरात झालेल्या या घटनेमध्ये संपुर्ण दुचाकी जळून खाक झाली. या घटनेची माहीती मिळताच अग्निशमन दलाने येवून आक विझवण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत गाडीचे मोठे नुकसान झाले. उन्हाळ्यात अशा घटना घडत असतात पण ऐन पावसाळ्यामध्ये वातावरणात गारवा असताना ईलेक्ट्रीक बाईकने पेट घेतल्याने इलेक्ट्रिक गाड्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pune News : भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर भरलं; धरणात 98 टक्के पाणीसाठा

Pune News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेलं ब्रिटिशकालीन भाटघर आज सकाळी भरलं. धरणात 98 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने जलसंपदा विभागाच्या वतीने आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी धरणातील 45 स्वयंचलित दरवाजांची चाचणी घेण्यात आली आणि धरणांच्या सर्व संचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग निरा नदीत सुरू करण्यात आलाय. सध्या 31 हजार क्युसेक्स इतक्या वेगाने हा विसर्ग करण्यात यैतोय. इंग्रजांनी 1927 मधे हे स्वयंचलित दरवाजै असलेलं धरण बांधलं होतं. या धरणातून पाणी सोडण्यात आल्याने ऊजणी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.

Lalbaug News : लालबाग-परळ मधील फेरीवाल्यांचं उपोषण; महिन्याभरापासून बसू दिलं जात नसल्यानं मराठी फेरीवाले आक्रमक

Lalbaug News : लालबाग परळमधील फेरीवाले  उपोषणाला बसले आहेत


महिन्याभरापासून फेरीवाल्यांना बसू दिले जात नसल्याने मराठी फेरीवाले आक्रमक


मागील अनेक वर्षांपासून हे फेरीवाले लालबाग परळ भागांमध्ये आपला व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात, मात्र मुंबई महापालिका कडून त्रास होत असल्याने हे सर्व फेरीवाले आज उपोषणाला बसले आहेत. 


 लालबाग फेरीवाला विक्रेता संघांकडून लालबागमध्ये  उपोषण


 फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी व्हावी, ही त्यांची मागणी आहे. 

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका; मंगळवारी तातडीची सुनावणी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका 


मंगळवारी होणार तातडीची सुनावणी


14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणा-या पहिल्या हफ्त्यावर तात्काळ स्थिगीतीची मागणी


सरकारची महत्त्वाकांक्षी योजना कायद्याच्या कचाट्यात?


लाडकी बहिण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैश्याचा अपव्यव, याचिकेतून आरोप


नवी मुंबईतील चार्टर्ड अकाऊंटंट, नावेद मुल्ला यांनी वकील ओवैस पेचकर यांच्यामार्फत दाखल केलीय जनहित याचिका

Mumbai News : वांद्र्यात राजीव नगर इथे कांग्रेस आमदार जिशान सिद्दिकीला स्थानिकांनी केला विरोध

Mumbai News : वांद्र्यात राजीव नगर इथे कांग्रेस आमदार जिशान सिद्दिकीला स्थानिकांनी केला विरोध


स्थानिक नागरिकांकडून आमदार झीशान सिद्दीकी यांना भर बैठकीतून अक्षरशः हाकलवून देण्याचा झाला प्रकार


झिशान बोलत असताना त्यांच्या हातातला माईक सुद्धा हिसकावून घेण्याचा झाला प्रयत्न, सर्व प्रकार मोबाईल कॅमेर्यात कैद


झोपडपट्टी पुनर्विकासाला स्थानिकांचा विरोध असताना ही पुनर्विकासाचं काम हाती घेण्यात आलंय, ज्याला स्थानिकांचा विरोध आहे. वारंवार स्थानिक आमदार झिशान सिद्दीकीकडे तक्रार केली मात्र आता  निवडणुकीच्या तोंडावर झिशान आल्याचा आरोप करत  नागरिकांनी झीशान सिद्दीकी यांना खडे बोल सुनावले. 

Yavatmal News: रिवाईज स्क्रिप्ट तहसीलमधून जप्तीत असलेला ट्रक स्वतः मालकानेच नेला चोरून; ट्रक नदीपत्रातून जप्त

Yavatmal News: एखाद्या चोरीच्या घटनेतील ऐवज लपवण्यासाठी चोरटे नवनवीन शक्कल लढवित पोलिसांना गुंगारा देतात. अशातच मोठे वाहन चोरी असेल तर ते स्क्रॅब मध्ये काढून भंगारात विकतात किंवा नंबर प्लेट बदलून दुसऱ्या राज्यात वा जिल्ह्यात विक्री करतात. मात्र, रेती चोरीच्या प्रकरणात यवतमाळच्या मारेगाव तशीलमध्ये आधीच जप्तीत असलेला ट्रॅक (एमएच 36-1675)  हा स्वतः  मालकानेच एक ते दीड लाखांचा दंड टाळण्यासाठी  तहसील कार्यालयाच्या प्रांगनातून16 जूनला चोरून नेला. इतकेच नव्हे तर त्याची रंगरंगोटी करून नंबरही बदलवीला आणि हा ट्रॅक चक्क वर्धा जिल्ह्यातील आंजी नदीच्या पात्रा लगत असलेल्या नाल्यात दडवून ठेवला. याच कालावधीत पावसाने जोर धरला आणि हा चोरीचा ट्रॅक नाल्यात पावसाने अडकून पडला. याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली आणि नदी पात्रातून हा ट्रॅक जप्त करून चौघांना अटक केली. शख अफरोज शेख अब्दुल, शेख रोशन शेख अब्दुल, प्रणय पोहणे, पवन किनाके  अशी आरोपींची नावे आहे. या चोरीतील एकूण 5 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Maharashtra News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक

Maharashtra News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, व्होट जिहादच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार असून, येत्या काळात या विरोधात तीव्र आंदोलने देखील केली जाणार आहेत. संघ, भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून या विरोधात राज्यभर मोहीम राबवली जाणार आहे. याच सोबत धारावीतल्या अरविंद वैश्य याची हत्या आणि उरणमधील यशश्री शिंदे या तरुणीची हत्या या दोन्ही मुद्द्यावर देखील भाजप अधिक आक्रमक होणार आहे.

Nashik News : उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर

Nashik News : उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्यातील कळवण-सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर जातायेत. मात्र त्यांच्या दौऱ्यात छगन भुजबळ उपस्थित राहणार नाहीयेत. भुजबळ त्यांच्या येवला मतदारसंघात विविध कार्यक्रमांना जाणार आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवारांच्या पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीबद्दलही साशंकता आहे. 

Puja Khedkar : पूजा खेडकरनं आयएसएसच्या परीक्षा देताना आपल्या नावात वारंवार फेरफार झाल्याचं सिद्ध

Puja Khedkar : पूजा खेडकरनं आयएसएसच्या परीक्षा देताना आपल्या नावात वारंवार फेरफार केल्याचं समोर आलं आहे. वडिलांचं नाव कधी दिलीप तर कधी दिलीपराव, आईचं नाव कधी वडिलांसोबत तर कधी आजोबांसोबत लावलं, तर स्वतःचं नाव कधी पूजा दिलीप खेडकर तर कधी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं लिहिलं. पूजानं दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवर काल दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टातसुनावणी झाली, त्यात दिल्ली पोलिसांनी तपासाचा तपशील सांगितला. 

Virar Accident: विवारमध्ये भरधाव फॉर्च्युनरनं प्राध्यापिकेला चिरडलं

Virar Accident Updates : विवार : राज्यातील हिट अँड रनच्या (Hit And Run) मालिका संपण्याचं नाव घेईना. विरारमध्ये (Virar Accident) घडलेल्या अशाच एका घटनेनं संपूर्ण शहर हादरलं आहे. विरारमध्ये (Virar) एका कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आत्मजा कासट असं प्राध्यापिकेचं नाव असून त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे.        

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 2nd August LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.