Maharashtra Breaking 29th July LIVE Updates: मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं घेतली शरद पवारांची भेट

Maharashtra Breaking 29th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 29 Jul 2024 03:03 PM
Wardha News : वर्ध्यात धबधब्यावर वाढतेय तरुणांची गर्दी

Wardha News : वर्ध्यात सतत झालेल्या पावसाने जंगलातील झरे, धबधबे ओसंडून वाहायला लागले आहेय. बोरधरण जंगलातील नदीनाल्याना पूर आला आहेय. येथील वाहते धबधबे तरुणांचे आकर्षण ठरत आहेय. त्यामुळे तरुणांची गर्दी देखील वाढत आहेय. धबधब्याच्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी तरुण गर्दी करीत असल्याचे चित्र आहेय.

Pune News : पुण्यात चांगला पाऊस; उजनी धरणातील पाणी पातळी वाढली

Pune News : पुणे आणि परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे उजनी धरणातील पाणी वाढू लागलेला आहे. उजनी धरण 40 टक्के भरले आहे. उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 117 टीएमसी असून 121 टीएमसी पर्यंत या धरणात पाणी साठवलं जातं. सध्या उजनी धरणात 85 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

Maharashtra News : फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येते अनिलबाबू : चित्रा वाघ

Maharashtra News : जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचे फडणवीसांसोबतचे फोटो अनिल देशमुखांनी जाहीर केले आता त्याला भाजपकडूनही प्रत्युत्तर दिलं जातंय. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी समित कदम यांचे शरद पवारांसोबतचा फोटो ट्वीट केलाय तर केशव उपाध्ये यांनी समित कदम यांचा आदित्य ठाकरेंसोबतचा फोटो ट्वीट केलाय.

Maharashtra News : खासदार स्मिता वाघ यांची लोकसभेत भाजपकडून प्रतोदपदी नियुक्ती

Maharashtra News : खासदार स्मिता वाघ यांची  लोकसभेत भाजपकडून  प्रतोदपदी नियुक्ती

खासदार स्मिता वाघ यांची  लोकसभेत भाजपकडून  प्रतोदपदी नियुक्ती

लोकसभेत भाजपचे दोन प्रतोद, स्मिता वाघ प्रतोदपदी

Pankaja Munde : विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर 

Beed News : विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर 


बीड मधील भगवान भक्तीगडावर दर्शन घेण्यासाठी पंकजा मुंडे दाखल


भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे समर्थक दाखल झालेत.


भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांची पेढे तुला होणार आहे.


पेढे तुला करण्यासाठी वजनकाटा सजविण्यात आलाय.

Maharashtra News : मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं घेतली शरद पवारांची भेट

Maharashtra News : सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आज मातोश्रीवर धडक दिली. उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची समाजाची मुख्य मागणी आहे. याबाबत याबाबत सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनीही  आपली भूमिका मांडावी असं या सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाचं म्हणणं आहे. दरम्यान या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती.

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे मध्यरात्री गायींची स्कॉर्पिओ कारमधून तस्करी 

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे मध्यरात्री गायींची स्कॉर्पिओ कारमधून तस्करी 


दोन गायींना स्कॉर्पिओ मध्ये टाकून पसार, तीन युवक कॅमेरात कैद


यापुर्वी सुध्दा अशा प्रकारची घटना छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्याच ठिकाणी विमल प्लाझा समोर घडलेल्या आहेत..


पोलीस प्रशासन ह्या गंभीर प्रकरणी तातडीने कारवाई करेल का असा सवाल गोरक्षकांनी केली आहे.

Maharashtra News: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर पवारांची भूमिका काय? पंकजा मुंडेंचा शरद पवारांना सवाल 

Maharashtra News: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर पवारांची भूमिका काय? पंकजा मुंडेंचा शरद पवारांना सवाल 

शरद पवार मोठे नेते, त्यांची भूमिका महत्वाची : पंकजा मुंडे 

Pandharpur News: शेकापच्या अधिवेशनासाठी शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्याला ओबीसी संघटनांचा विरोध

Pandharpur News: पंढरपुरात 3 ऑगस्टला होणाऱ्या शेकापच्या अधिवेशनासाठी शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्याला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याबाबत आपल्या भूमिकेचा लेखी खुलासा करावा अन्यथा काळे झेंडे दाखवून निषेध करु, असा इशारा ओबीसी नेते माऊली हळणवर यांनी दिला आहे. 

Maharashtra News : अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांचा दावा

Maharashtra News : अनिल देशमुख यांच्या जामीनावर भाजपचे काही नेते प्रश्न उपस्थित करत आहेत, परंतु अनिल देशमुखांना वैद्यकीय आधारवर नाही तर त्यांच्या विरोधातल्या पुराव्यात दम नाही, म्हणून जामीन मिळाला आहे, असा दावा अनिल देशमुख यांचे सुपुत्र आणि नागपूर जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य सलील देशमुख यांनी नागपुरात पत्रकार परिषद केला आहे. 

Maharashtra Poliitcs : छत्रपती संभाजीनगमध्ये माविआला मोठा धक्का; कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Poliitcs : छत्रपती संभाजीनगमध्ये माविआला मोठा धक्का बसला आहे. कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. 

Maharashtra News : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार 

Maharashtra News : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार 


बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारणार 


सीपी राधाकृष्णन यांनी आधी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे आता ते रमेश बैस यांच्या जागी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारतील

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा नाशिक दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरे आढावा घेत आहेत. निफाड आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात जाऊन घेणार विधानसभा समन्वयकांची बैठक आहे. 

नाशिक, येवला, सिन्नर चा आढावा घेतल्यानंतर आज निफाड आणि दिंडोरीचा घेणार आढावा. नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीकडे लक्ष. याआधी नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी लावली होती शरद पवार गटाच्या बैठकीला हजेरी, गोकुळ झिरवळ यांच्या राजकीय वाटचाली बाबत तटकरे काय भूमिका मांडणार यांकडे लक्ष, निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार  दिलीप बनकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत. शरद पवारांच्या उपस्थित  मागील आठवड्यात निफाड मध्ये आयोजित करण्यात आला होता शेतकरी मेळावा, त्यानंतर आज सुनील तटकरे घेणार मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. 

Nashik News : मनमाडला मका कोळपणीसाठी शेतकऱ्यांची लगबग

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव आदी परिसरात मागील एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे..त्यातच जेमतेम पाऊस झाल्याने मका पीक चांगले आले आहे. सध्या मका पीक कोळपणी आणि वखरणी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये लगबग बघायला मिळत आहे. दरम्यान, दमदार अशा पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी मात्र कायम आहे..

Sangli Rains: सांगलीचा पुराचा धोका तूर्त तरी टळला; कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी ओसरून 38 फुटांजवळ आली

Sangli Rain Updates: सांगलीचा पुराचा धोका तूर्त तरी टळला असून कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी ओसरून 38 फूट 10 इंचावर आली आहे. मोठा पाऊस आणि धरणातील विसर्ग वाढवला तर पातळीत वाढ होत राहणार आहे. मात्र  चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची मुसळधार बॅटिंग कायम असून 24 तासांत 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची मुसळधार बॅटिंग सुरू असून चांदोली धरणातून 16976 विसर्ग वारणा नदी पात्रात सोडला जात आहे चांदोली धरण 29.29% म्हणजे 85.13% भरले असून 2434 मिलिमीटर आत्तापर्यंत पाऊस पडला आहे.   सध्या शिराळा,  वाळवा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पावसाची बॅटिंग कायम आहे त्यामुळे धरण प्रशासनाने 16976 क्युसेकने धरणातून विसर्ग सुरू ठेवला आहे. वारणा नदीची पाणी पातळी एकदम हळूहळू उतरू लागली आहे. धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे वारणा नदी काठावरील पिके अजूनही पाण्याखाली आहेत.  गेली आठ दहा दिवस पिके पाण्याखाली असल्यामुळे पिके सडू लागली आहेत. कुजू लागली आहेत. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे.  या वारणा नदी काठावरील शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 
Bhandara News : पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी काढण्यासाठी मोफत जेसीबी; शेतकऱ्यांच्या मदतीला धावला किशोर पंचभाई

Bhandara News : मागील आठवड्यात भंडारा जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं होतं. याचा सर्वाधिक फटका पवनी आणि लाखांदूर तालुक्याला बसला. आठ दिवसांनंतरही पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली असल्यानं भात पिकांच्या शेतीची अक्षरशः नासाडी झाली आहे. शेतात साचलेलं पाणी काढण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावं लागतं असल्यानं पवनी येथील सामाजिक कार्यकर्ता किशोर पंचभाई यांनी आता पुढाकार घेतला आहे. पंचभाई यांनी त्यांच्याकडील जेसीबी मोफत देत शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पुराचं पाणी बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळं पूरपीडित शेतकऱ्यांना मोफत मदत त्यांनी दिली असून कुणाकडूनही एक रुपयाही ते घेत नाहीत. त्यांच्या या मदतीची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Sangali News: कृष्णा, वारणा नदी काठची शेती पाण्याखाली; पिके कुजण्याचा धोका

Sangali News: कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांना काही दिवसांपासून पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्याच्या पाणी पातळीत वाढ झल्यानं नद्या पात्राबाहेर पडल्या होत्या. यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्या काठची पिके  गेली आठ दहा दिवस  पाण्याखाली असल्यामुळे पिके  कुजू लागली आहेत. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे.  या वारणा नदी काठावरील शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

Dhule Rain : धुळे जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात वाढ

Dhule Rain : धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्प भरून वागू लागली आहेत, साक्री तालुक्यात देखील दमदार पावसाची हजेरी लागत असून कान नदीवरील जामखेडी, मालनगाव प्रकल्प ओव्हरफ्लो भरून वाहू लागले आहेत. तर दुसरीकडे अक्कलपाडा धरणात 400 एमसीएफटी इतका जलसाठा निर्माण झाला असून नागरिकांसह शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे... धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावात 20 एमसीएफटी जलसाठा निर्माण झाला आहे.

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; वेशांतराची मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वेशांतराची मास्क आणि टोपी घालून वेश बदलून दिल्लीला जायचो, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. दिल्लीत पत्रकारांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये कशी सहभागी झाली, याबद्दलचे खुलासे केले. महायुतीत सहभागी होण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दहा वेळा बैठका झाल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं. 

Maharashtra News : नीट परीक्षेची सुनावणी दिवसभर सुरू राहिल्यानं अपात्रतेची सुनावणी लांबली

Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलै रोजी होण्यची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात 23 जुलैला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती. मात्र, नीट यूजी परीक्षेसंदर्भातील सुनावणी दिवसभर सुरु राहिल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला वेळ मिळाला नाही. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी या संदर्भातील प्रश्न सरन्यायाधीशांसमोर मांडला. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीसंबंधीची सुनावणी 29 जुलै रोजी तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलै रोजी होणार असल्याचे सांगितलय

Maharashtra Politics : नवी मुंबईतील वाशीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सामाजिक ऐक्य परिषद

Maharashtra Politics : महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती शरद पवारांनी व्यक्त केलीय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नवी मुंबईतील वाशीतील सामाजिक ऐक्य परिषद आयोजन करण्यात आलं होतं. त्याच शरद पवार बोलत होते.
तसंच पुरोगामी विचारांची परंपरा हे महाराष्ट्राचं सुदैव असल्याचं मतही शरद पवारांनी व्यक्त केलं. देशात जी परिस्थिती आहे त्यात बदल करण्याची गरज आहे. यासाठी जात, पंत, धर्म एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. यासाठी ही ऐक्य परिषद मोलाची कामगिरी करेल, असं शरद पवार म्हणाले.

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 29th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


1. मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचो...अमित शाहांसोबत 10 वेळा बैठका झाल्या...पत्रकारांशी गप्पा मारतांना अजितदादांनी सांगितले महायुतीत सहभागाचे किस्से...


2. भाजपची 288 जागा लढण्याची तयारी, पण महायुतीत मिळतील तेवढ्या जागा लढवू, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य...तर 288 मतदारसंघात निरीक्षक नेमणार, संजय शिरसाटांची माहिती...


3. अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांसोबत, हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमात सहभागी..कालच बाबाजानी दुर्राणी झालेत पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी..


4. समित कदममार्फत फडणवीसांनी निरोप पाठवला होता, अनिल देशमुखांचा दावा, तर देशमुखांना अडचणी कमी करण्यासाठी शाह, फडणवीसांच्या मदतीची अपेक्षा होती, समित कदम यांचा दावा


5. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून वाशीमध्ये सामाजिक ऐक्य परिषदचं आयोजन. जात, पंत, धर्म एकत्रीत येऊन काम करण्याची गरज, पवारांचं प्रतिपादन

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.