Maharashtra Breaking 27th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra Breaking 27th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
Ahmednagar News : अहमदनगरच्या उड्डाण पुलावरून एक टेम्पो थेट खाली पडून भीषण अपघात घडलाय. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून या उड्डाणपूलावर वारंवार अशा घटना घडत आहे. दरम्यान, अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केलीये. या उड्डाण पुलावरील वळणं धोक्याची ठरत आहे. खासदार निलेश लंके यांनी याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत आवश्यक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. पुलावरील कठड्यांची उंची वाढवण्यासह पुलावर डांबराचा एक लेयर देण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या आहे. सोबतच या संदर्भात संबंधित विभागाची लवकरच बैठक घेणार असल्याचं खासदार लंके यांनी सांगितल आहे.
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
Yavatmal News : यवतमाळच्या महागाव तालुक्यात मागील काही महिन्यापासून बोगस कंपनीच्या औषधी आणि बोगस खतांची विक्री जोमात सुरू आहे. याची माहिती अमरावती पथकाला लागताच त्यांच्यामार्फत महागांव शहरातील स्वराज अॅग्रो आणि इतर कृषी चालकाची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये काही औषधी, खतांचे नमुने अमरावती पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोबत घेतले असून ते तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. वास्तवात कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कृषी केंद्र चालकांना सहभागी असल्याने भोगस खते विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. घेण्यात आलेले नमुण्याचे निरीक्षण झाल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pooja Khedkar : पुजा खेडकर कूठे आहेत हा प्रश्न वेगवेगळ्या तपास यंत्रणांना पडलाय. यु पी एस सी ने प्रशिक्षण थांबल्यानंतर पुजा खेडकर वाशीम मधुन निघाल्यावर कुठे गेल्यात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय खरा पण त्या दिल्ली पोलिसांना भेटलेल्या नाहीत. पुणे पोलिसांनी तीनवेळा नोटीस बजावून देखील त्या पुणे पोलिसांसमोर हजर झालेल्या नाहीत तर यु पी एस सी ने त्यांना मसुरी इथल्या प्रशिक्षण केंद्रात बोलावल्यानंतर त्या मसुरीला प्रशिक्षण केंद्रात गेल्या की नाही हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे पुणे पोलिसांनी पुजा खेडकर यांच्या आई वडीलांचा घटस्फोट खरंच झाला होता का याबाबत तपास करुन त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केलाय.
Washim News : वाशिमच्या मंगरूळपीर नगरपालिका अंतर्गत सुरु असलेल्या विविध विकास काम सुरु आहेत . मात्र, कामाची मुद्दत संपण्या पूर्वी देयक काढायच्या नादात भर पावसात 500 मीटर च्या 12 लाख रुपये किमतीचा सिमेंट रस्ता भर पावसात चिखलात रस्ता निर्मितीचा काम सुरु असल्याने स्थानिक नागरिकांनी या संदर्भात तक्रार नगर पालिका प्रशासना कडे केली असून.. तत्काळ काम बंद करून पावसा नंतर काम सुरु करण्याची मागणी केली आहे
Maharashtra News: ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठल्यानंतर काल सकाळी 9 वाजता जिवंत साठ्यात आलेल्या उजनी धरणाने केवळ 24 तासांत 25 टक्केची पातळी ओलांडली आहे. यामुळे बळीराजा आनंदात असून आता आठकड्यात उजनी धरण भरणार याची खात्री वाटू लागली आहे . सध्या पुणे परिसरातील पाऊस थांबला असला तरी आता अजूनही 75 हजार क्युसेक पेक्षा जास्त निसर्गाने पाणी उजनी धरणाकडे येत असल्याने उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वधारत आहे. केवळ 55 दिवसात उजनी धरणात 48 टीएमसी पाणी जमा झाले असून आता उजनी धरणात जवळपास 77 टीएमसी पाणी जमा झाले आहे. पुन्हा उजनी जलाशय परिसरात दोन तीन दिवस जरी चांगला पाऊस झाला तरी उजनीसाठी तो फायदेशीर ठरणार आहे . काल सकाळी नऊ वाजता उजनी मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आले होते आणि आज सकाळी नऊ वाजता धरणाने 25 टक्के पातळी गाठली आहे .
Pune News : पुण्यात महिनाभराचा पाऊस पाच दिवसात पडला
शहराची जुलै महिन्याची सरासरी 221.9 मिलिमीटर, पाच दिवसांतच भरून निघाली
शहरात 21 ते 25 जुलै या पाच दिवसांत तब्बल 222.5 मिमी इतका पाऊस
शहरात 2019 नंतर 24 तासांत झालेला हा सर्वांत मोठा पाऊस
शहरात 21 जुलैपर्यंत हंगामातील एकूण पाऊस 374.5 मिमी इतका होता, तर 26 जुलै रोजी ही नोंद 596.5 मिलिमीटरवर पोहचली
ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत आणखी दोनशे मिमीची भर पडेल, असा अंदाज आहे.
Nashik News : नाशिक मुबंई महामार्गावर पंचवटी परिसरात जेसीबीच्या सहाय्याने स्टेपिंग करून रस्त्याला चर मारण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्ता निसरडा होतो. त्यामुळे दुचाकी स्लिप होऊन अपघात होत असल्यानं रस्ता दुरुस्ती ऐवजी रस्तावर जेसीबीचा पंजा मारला जात आहे.
Yavatmal Crime News : यवतमाळ घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथे अनैनातिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली. प्रभाकर मारवाडी असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर जयश्री प्रभाकर मारवाडी असे पत्नीचे नाव आहे. तर सुरज रोहनकर असे प्रियकराचे नाव आहे. या दोघांचे प्रेम संबंध जुळले होते दरम्यान त्यांच्या प्रेमसंबंधात मृतक प्रभाकर हा अडसड ठरत होता. दरम्यान जयश्री आणि सूरजने प्रभाकर चे तोंड दाबून त्याची हत्या केली. आणि गावाशेजारील एका फाट्यावर त्याचा मृतदेह फेकून दिला. दरम्यान याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता दोघांनीच प्रभाकर ची हत्या केल्याची कबुली दिली. दरम्यान पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
Bhandra Rains : मागील सहा दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीनंतर काही प्रमाणात उसंत घेतली होती. आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली. कुठं मध्यम, तर कुठं हलक्या स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. सहा दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसानं लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्यानं भात पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली आहे. याच्या पंचनाम्याला जेमतेम सुरुवात झालेली असून पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज जिल्ह्यात येलो अलर्ट घोषित केलेला असून काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची मध्यम शक्यता वर्तवली आहे, त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण हे 100 टक्के भरले. असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी धरणाला भेट देवून जलपूजन केले. या परिसरात लागवडी खालील क्षेत्रापैकी सुमारे 1 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते. यावर्षीच्या हंगामात सुरुवाती पासूनच पावसाचा लहरीपणा कायम राहिला. परिणामी धान पिकाची लागवडही उशिरा झाली. त्यातच जून व जुलै महिन्यात काही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद वगळता उर्वरित हंगामात कुठेही पूर परिस्थिती दिसून आली नाही. खरीप हंगामातील शेवटचे सत्र सुरू असून 5 दिवसापूर्वी आलेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, मोठे धरण, मोठे धरण, जलयुक्त शिवार योजनेतील तलाव, बोडी, मामा तलाव आदींमध्ये जवळपास 100 टक्के जलसाठा झाला. याचा प्रत्येक्ष लाभ धान पिकालाही झाला. त्यातच जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण हे 100 टक्के भरल्याने त्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी भेट देवून जलपूजन केले.
Wardha Rains : वर्ध्याच्या कारंजा(घाडगे )तालुक्यातील 50 ते 60 गावातील शेतपिकांचे नुकसान झालेय. आमदार दादाराव केचे यांनी कारंजा तालुक्यातील सहा गावातील पिकांची पाहणी केलीय. चंदेवाणी,सेलगाव, धर्ती, बोरी,ठाणेगाव,नागलवाडी शिवारात पोहचून शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. कुठे पुरामुळे नदीकाठच्या शेतपिके खरडून गेली, तर सोयाबीन,कपाशी, संत्रा पिके हातची गेली. रस्ते,पुलाचे कठडे वाहून गेले. राज्य सरकारकडून तातडीने भरीव मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन आमदार दादाराव केचे यांनी दिले आहे. यावेळी शेतपिकांचे पंचनामे गांभीर्याने करण्याचे निर्देश तहसीलदार, कृषी अधिकारी यांना देण्यात आले.
Bhandara Rains : पूरपरिस्थिती नियंत्रणात असून गोसीखुर्द धरण प्रशासनानं आता पाण्याचा विसर्गही कमी केला आहे. सध्या धरणाचे 11 गेट अर्धा मीटरनं सुरू असून त्यातून 46 हजार 795 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर भंडारा जिल्ह्यात सर्वत्र जलमयस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यातही मोठी वाढ झाली होती. धरणाचा पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी मागील आठवड्यात धरण प्रशासनाने सर्व 33 गेट उघडून 3 लाख 83 हजार पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग केला होता.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking 27th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत नीती आयोगाची बैठक, देशातील विविध राज्याचे मुख्यमंत्री हजर राहणार, 2047 पर्यंत विकसित भारत हे बैठकिचं मुख्य उद्दिष्ट
2. मला भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं, अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर, आता देश चालवतायत, पवारांची टीका
3. लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी कुठून आणणार? योजनेच्या मंजुरीपूर्वीच अर्थ विभागाने आक्षेप घेतल्याची चर्चा, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून टीकेचा सूर
4. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटांच्याजवळ... खबरदारीसाठी लष्कराची एक तुकडी दाखल... तर चार तालुक्यातील शाळांना आज सुट्टी
5. सतरा वर्षांपासून रखडलेल्या गोवा हायवेसाठी पुन्हा नवीन डेडलाईन, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाट तूर्तास बिकटच, सरकारकडून पुन्हा आश्वासनांचीच बरसात
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -