Maharashtra News Live Updates: मुंबईत-उपनगरात गुरुवारी मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह ठाणे, पालघरमधील शाळांना सुट्टी जाहीर

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 25 Sep 2024 11:12 PM
Thane Palghar School Closed : ठाणे आणि पालघरमधील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर

मुंबई, ठाणे आणि परिसरात गुरूवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालघर आणि ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

Mumbai rain Update : मुंबईत पुढील 3 तासांसाठी वादळी पावसाचा इशारा

IMD मुंबई यांनी आपल्या जिल्ह्याकरीता पुढील 3 तासासाठी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. मंत्रालय नियंत्रण कक्ष.


मुंबईत आज (२५ सप्टेंबर २०२४) सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात आलेले केंद्र पुढीलप्रमाणे. (नोंद मिलिमीटरमध्ये)


पासपोली पवई महानगरपालिका शाळा (पवई) - २५७.८


मानखुर्द अग्निशमन केंद्र - २३९.६


एन विभाग कार्यालय- २३३.१


नूतन विद्यामंदिर - २३१.८


टागोर नगर महानगरपालिका शाळा (विक्रोळी) - २२७.६


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर केंद्र, जोगेश्वरी - १८०


मरोळ अग्निशमन केंद्र- १५४.६


मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा (अंधेरी) - १५०


शिवडी कोळीवाडा महानगरपालिका शाळा - १३९.२


 के पूर्व विभाग कार्यालय - १२६.२


नाडकर्णी उद्यान महानगरपालिका शाळा - १२५.८


पी दक्षिण विभाग कार्यालय - १२३.९


प्रतीक्षानगर महानगरपालिका शाळा, शीव (सायन) - ११६.६


कुलाबा उदंचन केंद्र - ११४.३

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प, उद्या शाळांना सुट्टी जाहीर

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली असून अनेक स्टेशनवर पाणी साचलं आहे. उद्याही मुसळधार पावसाचा इशारा असल्याने मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. 

Palghar News : पालघरमध्ये शिक्षकांचं आंदोलन

Palghar News : राज्यातील शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा ताण वाढत असल्याच्या विरोधात एकवटलेल्या शिक्षक संघटनांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयवर विराट आक्रोश मोर्चाच आयोजन केलं होतं . मार्च 2024 चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा , 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाच एक पद बंद करून कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त आणि अन्य नियुक्ती देण्याचा पाच सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय रद्द करावा तसच विविध 15 पेक्षा अधिक मागण्यासाठी या शिक्षकांकडून या आक्रोश मोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं. विविध शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली  हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांनी सहभाग घेतला होता . तसंच मागण्या मान्य न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी शिक्षक संघटनांकडून देण्यात आला.

Dhule News : विविध प्रलंबित मागण्यासाठी शिक्षकांचा निघाला मोर्चा, हजारो शिक्षक उतरले रस्त्यावर

Dhule News : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारो शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शिक्षकांनी संप पुकारल्याने महानगरपालिके सोबत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आल्या होत्या. 

Maharashtra Rain Updates : मुंबई आणि ठाण्यातील काही भागात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Updates : मुंबई आणि ठाण्यातील काही भागात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा, यलो अलर्ट जारी 


रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी, काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता 


पालघरसाठी आॅरेंज अलर्ट, ज्यात काही तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज 


उद्या मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, उद्यासाठी आॅरेंज अलर्ट जारी 


पुण्यासाठी आज रेड अलर्ट, विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता 


नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा 


औरंगाबाद, जालना आणि बीडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, आॅरेंज अलर्ट जारी 


विदर्भातही विजांसह मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra News : मराठा आरक्षणासाठी हिंगोली मध्ये जलसमाधी आंदोलन

Maharashtra News : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि मनोज जरांगे यांचे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा यासाठी आज हिंगोलीच्या कमठा फाटा  या ठिकाणी कयाधू नदी  पात्रामध्ये मराठा समाज बांधवांनी जलसमाधी आंदोलन केला आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव सहभागी झाले होते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे.

Maharashtra News : मराठा आरक्षणासाठी हिंगोली मध्ये जलसमाधी आंदोलन

Maharashtra News : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि मनोज जरांगे यांचे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा यासाठी आज हिंगोलीच्या कमठा फाटा  या ठिकाणी कयाधू नदी  पात्रामध्ये मराठा समाज बांधवांनी जलसमाधी आंदोलन केला आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव सहभागी झाले होते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे.

Maharashtra News : मराठा आरक्षणासाठी हिंगोली मध्ये जलसमाधी आंदोलन

Maharashtra News : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि मनोज जरांगे यांचे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा यासाठी आज हिंगोलीच्या कमठा फाटा  या ठिकाणी कयाधू नदी  पात्रामध्ये मराठा समाज बांधवांनी जलसमाधी आंदोलन केला आहे. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज बांधव सहभागी झाले होते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे.

Latur News : लातूरकरांना खुशखबर मांजरा धरण भरले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Latur News : मांजरा धरण क्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणात  मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. धरणातील पाणी पातळी 95 टक्क्यांनी वाढली आहे. पाणी पातळी  नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज मांजरा प्रकल्पाचे 2 दरवाजे  उघडून मांजरा नदीपात्रत 49.00 क्यूमेक्ने पाण्याचा विसर्ग  सोडण्यात आला आहे. दरम्यान नदी काटच्या गावांना प्रशासनाने सतर्कच्या इशारा दिला आहे..

Sangali News : सांगली जिल्ह्यात सलगच्या पाऊसाने द्राक्ष शेतीला बसणार मोठा फटका

Sangali News : सांगली जिल्ह्यात झालेल्या सलगच्या पाऊसाने तर काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान  झाले आहे. ज्या भागात अतिवृष्टी झालीय त्या भागात आणि  तालुक्यात  आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.  एकीकडे भुईमूग, उडीद, सोयाबीन सारखी पिकं शेतात पाणी साचून राहिल्याने कुजू लागलेत तर दुसरीकडे  द्राक्ष बागाना देखील या पावसाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. द्राक्ष बागांची फळ छाटणी या पावसाने खोळंबलीय तर  छाटलेल्या द्राक्षबागा वांझ जाण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.

Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी उसळी; मुंबईत 77 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रामचा भाव 

Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी उसळी; मुंबईत 77 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रामचा भाव 


फेडरल रिझर्व्हकडून व्याजकपातीचा निर्णय, सोबतच मध्य पूर्वेकडील भूराजकीय संघर्षामुळे सोन्याला झळाळी

Maharashtra Politics : आमदार बांगर यांच्याकडून पैसे वाटप

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुका जवळ आलेले आहेत. या काळात आमदार वेगवेगळे शक्कल लढून मतदारापर्यंत पोहोचत आहेत, असे असताना कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी चक्क मतदार संघामध्ये दवंडी पिटवून पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाने केले आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने मतदार संघामध्ये रुपूर या गावात पैसे वाटप  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमांमध्ये महिलांना चक्क पॉकेटमधून पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे व्हिडिओ मध्ये आमदार बांगर स्वतः पैसे वाटप करताना पाहायला मिळत आहेत. वाटप केलेले या पैशाची चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. वाळू नकली दारू प्रतिबंधित गुटखा जुगाराचे मटका इत्यादी धंद्यातून हा लाखो रुपयांचा काळा पैसा वाटप करण्यात येतोय याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. 

Pune Water Cut: पुणे शहरातील काही भागात उद्या पाणी पुरवठा बंद 

Pune Water Cut: कात्रज येथील केदारेश्वर पंपिंग स्टेशनमध्ये मुख्य व्हॉल्व आणि मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यासाठी गुरुवारी (शहराच्या दक्षिण भागातील कात्रज, बालाजीनगर, आगम मंदिर व कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 


त्यानंतर शुक्रवारी (दि. 27) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.


पाणीपुरवठा बंद असणारा भाग : बालाजीनगर, पुण्याईनगर, काशिनाथ पाटीलनगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रोड, वरखडेनगर, ओमकार, भूषण, उत्कर्ष, राजस या सर्व सोसायट्या व परिसर, कदम प्लाझा परिसर, सुखसागरनगर भाग 1 आणि भाग 2, आगम मंदिर परिसर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, मोरेबाग परिसर, चंद्रभागानगर, भारती विद्यापीठामागील परिसर, कात्रज-कोंढवा रस्ता संपूर्ण परिसर, शिवशंभोनगर, गोकूळनगर. साईनगर, गजानननगर, काकडेवस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर आणि सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बसस्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगेनगर, खडीमशिन परिसर, बधेनगर, येवलेवाडी; कामठे-पाटीलनगर आदी संपूर्ण परिसरात पाणी नाही. 

Thane News : पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची कारवाई; महापालिका क्षेत्रात 611 नळ जोडण्या खंडित, 30 मोटर पंप जप्त

Thane News : ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत संपूर्ण महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 611 नळ जोडण्या खंडित केल्या असून 30 मोटर पंप जप्त केले आहेत. या पाणी बिल वसुली अभियानात आतापर्यंत सुमारे 33 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. दरम्यान, पाणी बिलाची रक्कम वेळच्या वेळी भरून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे 224 कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी, 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही 148 कोटी रुपये आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Vidha Sabha Election 2024 : अमित शहांनी राज्यातील विधानसभेत विजयाचं रणशिंग फुंकलं; कार्यकर्त्यांना कानमंत्र देत कामाला लागण्याचं आवाहन

Maharashtra Vidha Sabha Election 2024 : अमित शाहांनी काल संभाजीनगरात झालेल्या बैठकीत विजयाचं रणशिंग फुंकलं. अमित शाहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत विजयासाठी कामाला लागण्याचं आवाहन केलं. मराठवाड्यात 30 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करतानाच नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, मतदान केंद्राची वर्गवारी करून 10 टक्के मतदान वाढवण्याचा सल्ला दिला. अमित शाहांच्या बैठकीची इनसाईड स्टोरी माझाच्या हाती लागलीय. 

Israel Attack: इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू, लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती

Israel Attack: लेबनॉननस्थित हिेजबुला या बंडखोर गटाने केलेल्या हल्ल्यांना विरोध करताना इस्रायलने लेबनॉनवर दोन दिवसांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या संघर्षात दुर्बल झालेला हेजबोला गट पूर्ण शक्तीनिशी इस्रायलला उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाझा पट्टीपुरते मर्यादित असलेल्या युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यांमधील मृतांची संख्या 558 वर पोहचलीये. मृतांमध्ये 50 लहान मुले आणि 94 महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळतेय. 

Maharashtra Teachers Strike: राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचं आज सामूहिक रजा आंदोलन

Maharashtra Teachers Strike: आज राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक इतिहासात पहिल्यांदा "शिक्षकांना शिकवू द्या , मुलांना शिकू द्या...!"अशी घोषणा करत  इतर मागण्यांसाठी एकदिवसीय संपावर गेले आहेत. प्राथमिक शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करून फक्त मुलांना शिकवू द्या , पोषण आहारातील नवीन मेन्यू रद्द करून पाहिला मेन्यू कायम करा, 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा निर्णय आणि 5 सप्टेंबर 2024 निर्णय रद्द करा , कंत्राटी शिक्षक भरती बंद करा. या मागण्यांसाठी राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आज संपावर गेले आहेत.यामुळे राज्यातील 59,353 शाळा बंद राहणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील 6500 शिक्षक यात सहभागी होणार असल्याने जिल्ह्यातील 1500 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आज बंद राहणार आहेत. या संपाला खाजगी शाळेतील शिक्षकांचा ही पाठिंबा असणार आहे.

Gold Rates : सोन्याच्या दरात मोठी उसळी; सोन्याचा दर प्रति दहा ग्राम 77 हजार रुपयांवर

Gold Rates : सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोन्याचा दर  प्रति दहा ग्राम 77 हजार रुपयांवर पोहोचला आहे.  मागील दोन दिवसांपासून सोन्याचा दर वधारलेला पाहायला मिळत आहे. फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात केलेली कपात, सोबतच मध्य पूर्वेतील भूराजकीय परिस्थितीमुळे सोन्याच्या दरात उसळी पाहायला मिळत आहे. 

Maharashtra News : तीर्थक्षेत्र विकासांच्या 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची मंजुरी

Maharashtra News : विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या 305 कोटी रुपयांच्या आराखड्यांना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मंजुरी दिलीय. यामध्ये पंढरपुरातील दर्शन मंडप आणि दर्शन रांगेसाठी 129 कोटींची तरतूद करण्यात आलीय. याशिवाय नाशिकच्या भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जीवनावर आधारित थीमपार्क साकारण्यात येणारय. त्यासाठी 15 कोटींच्या तरतुदीला मान्यता दिलीय.. तसंच अमळनेर येथील मंगळग्रह देवस्थानाच्या 25 कोटींच्या विकास आराखड्याला. तर संत गाडगेबाबांची कर्मभूमी ऋणमोचन येथील 18 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आलीय.


 

Rain Updates : 26 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार

Rain Updates : 26 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगरसह, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गलाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पुणे आणि रायगडमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती ढासळली, मध्यरात्री सलाईनसह जरांगेंना डॉक्टरांचे उपचार


Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना काल रात्री अखेर सलाईन लावण्यात आलं. जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे मध्यरात्री त्यांच्या सहकाऱ्यांनी सलाईन घेण्याचा आग्रह केला. सलाईनसह जरांगेंना डॉक्टरांचे उपचारही देण्यात आले. 


Nagpur News : विधानसभेसाठी भाजपची रणनिती; महाराष्ट्र भाजपला तीन कॅप्टन आणि एक महाकॅप्टन लाभणार

Nagpur News : विधानसभेसाठी महाराष्ट्र भाजपला तीन कॅप्टन आणि एक महाकॅप्टन लाभणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दिल्लीतले चाणक्य अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात लढल्या जाणार आहेत. विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या अमित शाहांच्या उपस्थितीत, नागपुरात आढावा बैठक झाली. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना वाटण्यात आलेल्या पत्रकात सामूहिक नेतृत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्यात आलाय. चक्रव्यूह भेदण्याचं आवाहन पत्रकाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना करण्यात आलंय. तसंच महाराष्ट्र विधानसभा जिंकेपर्यंत कुणीच थांबणार नाही असा निर्धारही करण्यात आलाय. 

जवळपास अडीच तास महायुतीचे नेते अमित शाहांमध्ये बैठक, अमित शाह आज नाशिक आणि कोल्हापूर दौऱ्यावर

Amit Shah Maharashtra Visit: छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री उशीरा  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. सुमारे अडीच तास जागावाटपाबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह भुपेंद्र यादव, प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित होते. जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. नाशिक आणि कोल्हापूरमधील पदाधिकाऱ्यांशी शाह संवाद साधणारेत. 

Akshay Shinde Encounter: कुणालातरी वाचवण्यासाठी हे सगळं झालं का? बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर संजय राऊतांचा सवाल

Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कुणालातरी वाचवण्यासाठी हे सगळं झालं का? अशी शंका राऊतांनी व्यक्त केलीय. संस्थाचालक दोषी नसेल तर सीसीटीव्ही फुटेज गायब का केलं असा सवाल राऊतांनी विचारलाय. महाराष्ट्राची जनता येत्या निवडणुकीत दुसऱ्या शिंदेंचा राजकीय एन्काऊंटर करेल अशी टीकाही राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलीय. राऊतांच्या टीकेला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंनी प्रत्युत्तर दिलंय. 

Badlapur Case: अक्षय शिंदेचा मृत्यू अति रक्तस्त्रावामुळे, शवविच्छेदन अहवालातून समोर

Badlapur Case: अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावामुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद कऱण्यात आलंय. हा शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलाय. जेजे रुग्णालयात सात तास सुरु असलेल्या शवविच्छेदन प्रकियेची व्हिडिओग्राफी करण्यात आलीये. जेजे रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांच्या पॅनलने अक्षय शिंदेचं शवविच्छेदन केलंय.

Badlapur Crime Case: बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच अक्षय शिंदेची हत्या केल्याचा वडिलांचा आरोप

Badlapur Case Akshay Shinde Postmortem Report: बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच अक्षय शिंदेची हत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. याप्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय.. या प्रकरणी आज तातडीची सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. या कथित चकमकीबाबतचे पुरावेही नष्ट करण्याची भीती अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिकेतून व्यक्त केलीय.

पार्श्वभूमी

Maharashtra News Live Updates: देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर... 


1. अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव... पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप... याचिकेवर आज तातडीची सुनावणी


2. अक्षय शिंदेचा मृत्यू अतिरक्तस्त्रावानं, पोस्टमार्टेममध्ये खुलासा, शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सुपूर्द, डोक्याला एक गोळी लागल्याचं नमूद


3. जवळपास अडीच तास अमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक, जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती, लवकरच अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता 


4. मराठा आंदोलन, नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा, अमित शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, बैठकीची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती


5. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस, नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.