Maharashtra News Live Updates 24 Sep 2024: पुढील 2 तासांत अक्षय शिंदेचं शवविच्छेदन पूर्ण होणार
Maharashtra News Live Updates 23 September 2024: राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....

Background
मुंबई : राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. याच कारणामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. दुसरकीडे 23 सप्टेंबर रोजी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचे एन्काऊंटर करण्यात आले आहे. त्याने पोलिसांची बंदुक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातच अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत.
पुढील 2 तासांत अक्षय शिंदेचं शवविच्छेदन पूर्ण होणार
अक्षय शिंदेच्या शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पोलिसांकडून कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण
पुढील 2 तासांत शवविच्छेदन प्रक्रिया होणार पूर्ण
वाशीतील मॅाडर्न कॅालेज येथे सिनेट निवडणूकीत गोंधळ
नवी मुंबई - वाशीतील मॅाडर्न कॅालेज येथे सिनेट निवडणूकीत गोंधळ
उध्दव ठाकरे गटाने बनावट पोलींग ऐजंट बसवला असल्याचा अभवि चा आरोप
आक्षेप घेतल्या नंतर बसलेला पोलींग ऐजंट पळून गेला
यावेळी काही वेळ येथे गोंधळ उडाला होता


















