Maharashtra Live Updates : पुढील 3 तासांत रायगड, रत्नागिरी येथे बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता - IMD

Maharashtra News Live Updates 24 August 2024 : राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व घडामोडींच्या अपटेड्स वाचा एका क्लिकवर...

ज्योती देवरे Last Updated: 24 Aug 2024 03:06 PM
Jalgaon : नेपाळ बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील वरणगाव मधील 25 जणांचा मृत्यू, ग्रामस्थांकडून कडकडीत बंद

Nepal Incident : नेपाळमध्ये बस नदीत पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील वरणगाव मधील 25 जणांचा मृत्यू


वरणगावमध्ये शोककळा पसरली आहे 



नेपाळ अपघातात मयत झालेल्यांचे मृत्तदेह आज आणले जाणार



मयताच्या दुःखात सहभागी होण्याच्या साठी ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला आहे

Nashik Rain : नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ

Nashik Rain : नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ
-
गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा
-
छोटी मंदिर पाण्याखाली जायला सुरवात
-
दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पोहचतेय  गेले पाणी

Jalna : जालना औद्योगिक वसाहती मधील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये स्फोट, 15 जखमी 3 गंभीर,

Jalna : जालना औद्योगिक वसाहती मधील गजकेसरी स्टील कंपनीमध्ये स्फोट, 15 जखमी 3 गंभीर,


स्टील कंपनीत लोखंड वितळणाऱ्या भट्टीमध्ये विस्फोट झाल्याने वितळलेले लोखंड अंगावर पडुन 15 जण जखमी.

Rain Update : कोकणात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी

Rain Update : कोकणात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज 


रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी, काही भागात अतिवृष्टीची शक्यता 


मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आजसाठी आॅरेंज अलर्ट जारी, अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा 


पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील अतिवृष्टीचा अंदाज, घाट माथ्यासाठी रेड अलर्ट जारी 


संभाजीनगर, जालना, अकोला आणि अमरावतीसाठी आॅरेंज अलर्ट जारी, काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा 


नगर, जळगाव आणि कोल्हापुरसाठी देखील आॅरेंज अलर्ट, अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता

Badlapur Crime : बदलापूर प्रकरणी पीडित कुटुंबाच्या बाबतीत अफवा पसरवणाऱ्या एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल

Badlapur Crime : बदलापूर प्रकरणी पीडित कुटुंबाच्या बाबतीत अफवा पसरवणाऱ्या एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल
पोलिसांनी इंस्टाग्राम अकाउंट केले ब्लॉक
आतापर्यंत पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार आरोपींचा शोध सुरू आहे

Amravati Crime : अमरावतीत प्रियसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या

 Amravati Crime : अमरावतीत प्रियसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या
 
नातेवाईकांचा आरोप


प्रियसीवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांची पोलीस स्टेशन येथे धडक


दर्यापूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये एका 27 वर्षीय युवकांनी आपल्या राहता घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  काल शुक्रवार रोजी घडली..

ST : राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश

ST : राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश


तीन दिवसात चौकशी करत अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश


एसटी महामंडळाकडून देखील चौकशीला सुरुवात


महामंडळाकडून काल तात्काळ दोन बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या


सोबतच, काही विभाग नियंत्रकांच्या देखील महामंडळाकडून बदल्यांचे आदेश

Nashik : 10 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी मनसेकडून आंदोलन, ज्ञानेश्वरी क्लासेसच्या दरवाजाला फासले काळे

Nashik : 10 वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी मनसेकडून आंदोलन



- सिडकोतील घटनेचा मनसेकडून निषेध 
- ज्ञानेश्वरी क्लासेसच्या दरवाजाला मनसेने फासले काळे

- अंबड पोलीस ठाण्यात क्लास चालकावर विनयभंगाचा गुन्हा 


- जोरदार घोषणाबाजी करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी 
-
- *वाढत्या घटना बघता गृह खात्याचे अपयश असल्याचा मनसेचा आरोप

Crime : आसाममध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी तफज्जुल इस्लामचा मृत्यू

Crime : आसाममध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी तफज्जुल इस्लामचा मृत्यू


पाण्यात बुडून मृत्यू


पोलिस आरोपीला रात्री क्राइम सीनवर घेऊन जाऊन घटना पुनर्निर्माण करत होते. त्याच वेळी आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला आणि जवळच्या एका तलावात पडला


तलावात बुडूनच आरोपी तफज्जुल इस्लामचा मृत्यू झाला

पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना धोक्याचा इशारा, 99% भरले धरण

Pune Rain : पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे,


पवना धरण सद्यस्थितीत 99 % भरलेले असून पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झालेली आहे.


धरणात येणारे पाणी विचारात घेता लवकरच पाणीसाठा 100 % होण्याची दाट शक्यता आहे.



सद्यस्थितीत धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे 1400 क्युसेक्स इतक्या क्षमतेने  नदीपात्रात विसर्ग चालू असून  पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार सांडव्याद्वारे विसर्ग सोडण्यात येणार आहे.

Vasai Virar Rain : वसई विरार नालासोपाऱ्यात आज दुपार नंतर रिमझिम पावसाला  सुरुवात

Vasai Virar Rain : वसई विरार नालासोपाऱ्यात आज दुपार नंतर रिमझिम पावसाला  सुरुवात झाली आहे. 


काही दिवसाच्या उघाडी नंतर पावसाने दोन दिवसापासून  रिपरिप सुरुवात केली आहे. या पावसामुळे हवेत गारवा पसरला आहे. सध्यातरी कुठेही पाणी साचले नाही.

Mumbai : महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक, मुंबईतील जागांच्या संदर्भात बैठकीत चर्चा होणार

Mumbai : महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक


मुंबईतील जागांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती


 महाविकास आघाडीचे मुंबईतील नेते जागा वाटपावर आज या बैठकीत चर्चा करणार आहेत


मागील बैठकीत जागा वाटपावर बदलापूर घटनेमुळे चर्चा होऊ शकली नाही... मात्र आजच्या बैठकीत  महाविकास आघाडीतील मुंबईतील नेते पुन्हा एकदा चर्चेला बसणार आहेत

Beed Rain : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने परळी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी

Beed Rain : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने परळी तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी;


पाणी प्रकल्पावर हौशी तरुण मंडळींची हुल्लडबाजी..


बीडच्या परळी तालुक्यात काल सायंकाळपासून दमदार सुरू असलेल्या पावसाने प्रमुख पाणी प्रकल्प ओसंडून वाहत आहे.


नागापूर येथील वाण धरण, बोरणा मध्यम प्रकल्प आणि चांदापूर येथील तलाव ओसंडून वाहत आहे.


त्यामुळे परळीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय.

Thane Rain : ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात, सकल भागात पाणी साचायला सुरुवात...

Thane Rain : ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात...


मासुंदा तलाव परिसरात काही सकल भागात पाणी साचायला सुरुवात...


ठाणे महानगरपालिका कडून पंप द्वारे साचलेल्या पाणीचा निचरा होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न.

Washim : प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत असलेल्या चॉकलेटमध्ये निघाल्या अळ्या

Washim : प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत असलेल्या चॉकलेटमध्ये निघाल्या अळ्या...


महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील जि.प.प्राथ.शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी शासन स्तरावर महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेत चॉकलेट वाटप केल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय...


आडोळी ,टो गावाच्या शाळेत प्रकार. समोर आलाय

Rain Update : पुढील 3 तासांत रायगड, रत्नागिरी येथे बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता - IMD

Rain Update : पुढील 3 तासांत रायगड, रत्नागिरी येथे बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता - IMD


हवामान विभागाची माहिती

Mumbai Rain : मुंबईसह पश्चिम उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात.

Mumbai Rain : मुंबईसह पश्चिम उपनगरात आज पहाटेपासून अधून मधून मुसळधार पावसाला सुरुवात.



मागील काही दिवसापासून मुंबई परिसरात विश्रांती घेतलेल्या पावसाने घेतलेला पावसाने आज पहाटेपासून पुन्हा अधून मधून जोरदार पाऊस सुरू झाला आहे...



पश्चिम उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून मागील दहा ते पंधरा मिनिटांपासून अंधेरी,विलेपार्ले,जोगेश्वरी


गोरेगाव,मालाड,कांदिवली,बोरिवली,सांताक्रुझ परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे....

Raksha Khadse : नेपाळ बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडूला पोहोचल्या, घेतला अधिकाऱ्यांकडून आढावा

Raksha Khadse : नेपाळ बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडूला पोहोचल्या


रक्षा खडसे यांनी घेतला अधिकाऱ्यांकडून आढावा


भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्री ब्रिघू ढुंगाना यांच्यासोबत केली चर्चा


मृतदेह महाराष्ट्रात आणण्याबाबत केली चर्चा


लवकरच सर्व मृतदेह विशेष विमानाने महाराष्ट्रात आणले जाणार

Ratnagiri - राजापूर जवळ अणुस्कुरा घाटात कोसळली दरड, हटवण्याचे काम सुरू, घाटातील वाहतूूक ठप्प

Ratnagiri - राजापूर जवळ अणुस्कुरा घाटात कोसळली दरड हटवण्याचे काम सुरू 


बांधकाम विभागाच्या माध्यमातून जेसीबी लावून दरड बाजूला करण्याचे काम सुरू 


अनुस्कुरा घाटातील दरड दूर करण्यासाठी आणखी दोन तास लागणार


पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोसळली होती दरड


दरड कोसळल्याने घाटातील वाहतुक ठप्प


वाहतुक बंद असल्याने कोल्हापूरकडे जाणारी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यात तुफान पाऊस, धडगाव तालुक्यातील वीज पुरवठा खंडित

Nandurbar Rain : नंदुरबार जिल्ह्यातील तुफान पाऊस.....


पहाटे पासून पावसाची संततधार सुरू.....


नंदुरबार शहरासह धडगाव तालुक्यात मुसळधार पाऊस......


पहाटे पासून होत असलेल्या पावसामुळे धडगाव तालुक्यातील नद्यांना पूर.....


मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यातील वीज पुरवठा खंडित......

Sindhudurg : वेगाची नशा जीवावर बेतली, दुचाकीची उभ्या कंटेनरवर धडक, दोघांचा जागीच मृत्यू

Sindhudurg : वेगाची नशा जीवावर बेतली, दुचाकीची उभ्या कंटेनरवर धडक, दोघांचा जागीच मृत्यू


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली मधील वागदे येथील हॉटेल मालवणी जवळ पहाटे २ ते २:४५ वा. च्या सुमारास उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाले.

Vasai : वसईत सावत्र आईने दोन लहानग्यांवर घरात अत्याचार केल्याची घटना उघड

Vasai : वसईत सावत्र आईने दोन लहानग्यांवर घरात अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.


घरातील भांडी घासणे, फरशी पुसणे, झाडू मारणे यासाठी सावत्र आईने दोन अल्पवयीन मुलावर लोखंडी पकडीने, पोळी लाटण्याच्या लाटण्याने मारहाण करत, एका 7 वर्षाच्या मुलाच्या गुप्तांगावर गरम चाकूने चटके दिले आहेत.


ही घटना वडिलांना कळल्यावर वडीलांनीच सावत्र आई विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला  आहे.

Nalasopara : नालासोपार्‍यात 17 वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार, दोन्ही आरोपींना अटक

Nalasopara : नालासोपार्‍यात १७ वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


तुळींज पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Sindhudurg : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती, मासेमारी ठप्प, गुजरातसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल 

Sindhudurg : अरबी समुद्रात वादळसदृश स्थिती, मासेमारी ठप्प, गुजरातसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल 


अरबी समुद्रात दक्षिण वारा आणि वादळसदृश वातावरणामुळे मासेमारी ठप्प झाली आहे.


त्यामुळे कोकणातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देवगड बंदरात गुजरातसह तामिळनाडू आणि राज्यातील शेकडो बोटी देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.


हवामान विभागाने वादळसदृश वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये असा इशारा दिला आहे. 

Sindhudurg : सह्याद्रीच्या खोऱ्यात रात्रभर मुसळधार पावसाने नदीचे पाणी रस्त्यावर, वाहनचालकांचा आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा खोळंबा.

Sindhudurg : सह्याद्रीच्या खोऱ्यात रातभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे


कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीचे पाणी घावनळे मुख्य रस्त्यावर आले


वाहन चालकांचा आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा खोळंबा.


काही वाहनचालक पाण्यातूनच गाड्या हाकत आहेत. जिल्हात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे.

Parbhani : परभणीत पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारीच तरुणाकडून मुलीची छेड

Parbhani : परभणीत पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारीच तरुणाकडून मुलीची छेड


छेड काढणाऱ्याला जमावाने चोप देऊन केले पोलिसांच्या स्वाधीन 


पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 

Pune : पुण्यात आज शरद पवार,सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणार निषेध आंदोलन

Pune : पुण्यात आज शरद पवार,सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणार निषेध आंदोलन


बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व घटक पक्षांच्यावतीने आज काढण्यात येणारा शांतता मोर्चा रद्द करण्यात आला आहे. 


मात्र,महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज निषेध आंदोलन केले जाणार आहे.

Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, सकाळपासून पावसाची संततधार सुरू 

Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, सकाळपासून पावसाची संततधार सुरू 


सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं.


तर आता जिल्हात बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे.


सिंधुदुर्गात पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज आज अमरावती दौऱ्यावर, भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज आज अमरावती दौऱ्यावर


अमरावतीत राज ठाकरे यांचं भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज सायंकाळी त्यांचे अमरावती शहरात आगमन होत आहे..

Chiplun : गुहागर मधील नवानगरमध्ये घरावर कोसळली दरड, कोणतीही जीवितहानी नाही

Chiplun : गुहागर मधील नवानगर मध्ये घरावर कोसळली दरड.....


कोणतीही जीवित हानी नाही. मात्र मोठ्या प्रमाणात दरडीचा भाग घरावर आल्यामुळे घराचे नुकसान.


मुसळधार पावसामुळे पुन्हा दरड कोसळण्याच्या घटना.


प्रशासनाकडून घटनेची पाहणी करण्यासाठी कर्मचारी रवाना.

Raigad Rain : रायगड जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात, ऑरेंज अलर्टचा इशारा

Raigad Rain : रायगड जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात 


जिल्हयाला आज ऑरेंज अलर्टचा इशारा

Rain : जोरदार पावसानं गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले

Rain : जोरदार पावसानं गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडलेत


11 गेट एक मीटरनं तर, 22 गेट अर्धा मीटरनं सुरू


गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं जोरदार पाऊस होत आहे. परिणामी, गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसीखुर्द धरण प्रशासनानं मध्यरात्रीपासून धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले आहेत.

Solapur : सोलापुरात दुचाकीसह ओढ्यात पडून एका इसमाचा मृत्यू, नागरिकांचा तीव्र संताप

Solapur : सोलापुरात दुचाकीसह ओढ्यात पडून एका इसमाचा मृत्यू 


शहरातील उमानगरी परिसरातील ओढ्यात पडून एका इसमाचा मृत्यु 


पुलाचा अंदाज न आल्याने दुचाकीसह तरुण ओढ्यात 


नागरी वस्तीत असलेल्या ओढ्याला कोणतीच संरक्षक भिंत नाही ... परिसरात रात्री पूर्ण अंधार ..


सुरक्षा नसल्याने महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप


दरम्यान मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल

महंत रामगिरी महाराज यांच्या अडचणीत आणखी वाढ, आग्रीपाडा आणि सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

महंत रामगिरी महाराज यांच्या अडचणीत आणखी वाढ


वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आग्रीपाडा  आणि सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


या आधी पायधुनी पोलिस ठाण्यात महंत रामगिरीवर दाखल करण्यात आला होता गुन्हा

Rain : पैठणच्या कडेठाण येथील पाझर तलाव फुटला, शेतपिकांचेही नुकसान

Rain : पैठणच्या कडेठाण येथील पाझर तलाव फुटला



शेतपिकांचेही नुकसान,


सलग दोन दिवस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात कडेठाण,पाचोड, दावरवाडी, परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने परिसरातील नदी नाले ओढे तुंबड भरून वाहू लागले आहे. 

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

- पावसामुळे रात्री त्र्यंबकेश्वर शहरात शिरले  पाणी

- त्र्यंबकेश्वर शहरात पावसाचे पाणी आल्याने रस्त्यांना प्राप्त झाले नदीचे स्वरूप
इगतपुरीच्या काही भागात नागरिकांच्या घरात शिरले होते पाणी
-
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
-
गंगापूर धरणातून सकाळी 8 वाजता 520 क्यूसेक वेगाने विसर्ग तर दारणातून 2 हजार 62 क्यूसेक वेगाने होणार विसर्ग


- इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर सह,जिल्ह्यातील इतरही काही भागात पावसाने लावली जोरदार हजेरी

Malad : शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर, शिवीगाळ व मारामारीचा सीसीटीव्ही प्रचंड वायरल 

Malad : शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर 



मालाड पूर्वेतील दिंडोशी विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांच्यात तुफान हाणामारी 



शिवीगाळ व मारामारीचा सीसीटीव्ही प्रचंड वायरल 


लेटर डिस्पॅच करण्यावरून झाला वाद 

Gondia  : गोंदिया शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या जिल्हा परिषदेत शिरले अस्वल

Gondia  : गोंदिया शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या जिल्हा परिषदेत शिरले अस्वल....


शहराच्या मध्यभागी अस्वलीचे दर्शन झाल्याने नागरिकांची उडाली तारांबळ..... 


गोंदिया शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या जिल्हा परिषद आणि सध्याच्या घडीला या ठिकाणी उपविभागीय सार्वजनिक  बांधकाम विभाग यांचे कार्यालय असुन आज सकाळच्या सुमारास नागरिकांना या कार्यालय आवारात अस्वल दिसून आल्याने मोठी तारांबड उडाली. 

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालची शिक्षा निलंबित करण्यासाठी मागणी हायकोर्टाने फेटाळली

India : पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपात दोषी ठरलेल्या अभियंता निशांत अग्रवालची जन्मठेपसह इतर  


शिक्षा निलंबित करण्यासाठीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे...


निशांत हा भारत रशिया संयुक्त उपक्रम असलेल्या ब्राह्मोस एरोस्पेस कंपनीच्या नागपुरातील प्रकल्पामध्ये सिस्टीम इंजिनियर म्हणून कार्यरत होता.

Nanded Rain : शिवपुराण कथेला पावसाचा फटका, जिल्हा प्रशासनाने तात्काळ भाविकांना सुखरूप स्थळी हलवले 

Nanded Rain : शिवपुराण कथेला पावसाचा फटका,


जिल्हा प्रशासनाने तात्काळ भाविकांना सुखरूप स्थळी हलवले 


नांदेडमध्ये 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज संध्याकाळी धुवादार पाऊस झाला


याच पावसाचा फटका हा शिवसपुराणकथेला बसला आहे


पंडित प्रदिप मिश्रा यांची आज पासून शिवकथा ही नांदेड येतील मोदी मैदानात आयोजित करण्यात आली होती


संध्याकाळी मुसळधार पावसाने सभा मंडपात सगळी कडे पाणी झाले आहे


जवळपास 20 हजार लोक हे याच मंडपात मुक्कामी होते सगळी कडे पाणी झाल्या नंतर जिल्हा प्रशासनाने साजगता दाखवत हा सर्व भाविकांना सुखरूप स्थळी हळविण्यात आले

Nashik : नाशिकमध्ये 10 वर्षच्या मुलीच्या विनयभंगाचा प्रकार उघडकीस, खाजगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांनेच केला विनयभंग

Nashik : बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ आज ठीक ठिकाणी आंदोलन होत असतानाच नाशिकमध्ये 10 वर्षच्या मुलीच्या विनयभंगाचा प्रकार उघडकीस


- नाशिकच्या सिडको परिसरात १० वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग 
- खाजगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांनेच केला विनयभंग


- उपेंद्र नगरमधील धक्कादायक प्रकार 
अंबड पोलिसात गुन्हा दाखल


- इयत्ता पाचवी शिकणारी मुलीला क्लासरूम मध्ये एकटी बघून शिक्षकाने अंगलट केल्याची तक्रार

Beed Rain : परळी - बीड वरील वाहतूक मागच्या दोन तासापासून बंद..पांगरी गावातील पूल खचला..

Beed Rain : परळी - बीड वरील वाहतूक मागच्या दोन तासापासून बंद..


वान नदीवरील पांगरी गावातील पूल खचला..


बीड परळी रोडवरचे काम चालू असताना हा पूल तात्पुरता बनवण्यात आला होता..


रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर गोपीनाथ गड परिसरात असलेला परळी बीड रोड वरचा पूल वाहून गेल्याने पहाटे पाच वाजल्यापासून परळी ते बीड कडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.. 

Maharashtra Rain : मुंबई, कोकण आणि घाट माथ्यावर पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून माहिती

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सकाळी आपली हजेरी लावली. 


हवामान खात्याने पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे. 


त्याचबरोबर कोकणात आणि घाट माथ्यावरही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


मुंबई शहर आणि उपनगरात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने उसंत घेतली होती.


 शुक्रवारी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी होत्या. मात्र, आता पुन्हा मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 


मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Nagpur :अज्ञात वाहनाच्या धडकेने पोलीस उपनिरीकक्षकाचा मृत्यू, अर्धातास मदत न मिळाल्याने होते रस्त्यावर पडून.

Nagpur :अज्ञात वाहनाच्या धडकेने पोलीस उपनिरीकक्षकाचा मृत्यू ...


दिलीप चोरपागर असे पोलीस उप निरीक्षकांचे नाव असून ते नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्यात कार्यरत होते.


ड्युटीवरून घरी परत जात असतांना मानकापूर फ्लायओहर वर रात्री 11 वाजताच्या सुमारास अपघात झाला ...


अपघातानंतर अर्धातास मदत न मिळाल्याने होते रस्त्यावर पडून..


एका वाटसरून हिम्मत दाखवत त्यांना वाहनातून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Satara Rain : साताऱ्यातील पश्चिम भागात पावसाची रिपरिप, वीर धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले

Satara Rain : साताऱ्यातील पश्चिम भागात पावसाची रिपरीप सुरू 


जिल्ह्यातील पश्चिम भागातील सर्व धरणे काठावर


वीर धरणाचे दरवाजे पुन्हा उघडले


धरणातून 15 हजार 221 क्युसेक्स पाणी नदीपात्रात


नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Mumbai : मुंबई महापालिकेकडून मूर्तिकारांना तब्बल 607 टन शाडूची माती विनामूल्य भेट

Mumbai : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसवर घातलेली बंदी लक्षात घेऊन भाविकांना मोठ्या संख्येने पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती उपलब्ध करण्याचा संकल्प मुंबई महानगरपालिकेने केला आहे.


त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने यंदा गणेशमूर्ती घडविणाऱ्या मुंबईमधील मूर्तिकारांना तब्बल ६०७ टन शाडूची माती विनामूल्य दिली.


त्याचबरोबर शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ७२३ मूर्तिकारांनी नाममात्र १०० रुपये शुल्क घेऊन मंडप परवानगी दिली आहे

Mumbai : मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी भरती सापडली वादाच्या भोवऱ्यात

Mumbai : मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे.


मात्र पात्रता अटींमुळे ही भरती वादात सापडली आहे.


‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या संवर्गातील १ हजार ८४६ जागा सरळसेवेने भरली जाणार असून


या पदासाठी मुंबई महापालिकेने ठेवलेल्या जाचक अटींमुळे अनेक उमेदवार या पदभरतीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करीत


या अटी रद्द कराव्या अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra News Live Updates 24 August 2024 : राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व घडामोडींच्या अपटेड्स वाचा एका क्लिकवर...

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.