Maharashtra News Live Updates : नाशिकच्या मेळाव्यात 'मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले' आशयाचे बॅनर

Maharashtra News Live Updates 23 August 2024 : राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व घडामोडींच्या अपटेड्स वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 23 Aug 2024 03:07 PM
Nashik Congress Melava नाशिकच्या मेळाव्यात 'मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले' आशयाचे बॅनर

नाशिक- नाशिकच्या मेळाव्यात आमचे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले अशा आशयाचे बॅनर घेऊन घोषणाबाजी... 


-  नाना पटोले भाषणाला उभे राहिल्यानंतर कार्यकर्त्यांकडून आमचे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले असे बॅनर दाखवण्यात आले 


- काँग्रेस कार्यकर्त्याच्या हातात "उध्दव ठाकरे म्हणतात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आमचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे आणि नाना पटोले कार्यकर्त्यांची भावना" असे आशयाचे बॅनर...


- महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सध्या आघाडीच्या वर्तुळात सुरू असताना हा बॅनर चर्चेचा विषय ठरतोय...

Pune Protest : पुण्यात आज सर्वपक्षीय आंदोलन, महिला अत्याचारांमुळे राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

पुणे : पुण्यात आज सर्वपक्षीय आंदोलन 


राज्यातील महिलांवरील अत्याचारांमध्ये होणाऱ्या वाढीविरोधात पुण्यात सर्वपक्षीय एकटवले 


बदलापूर प्रकरण यासह राज्यातील महिला असुरक्षिततेबाबत प्रश्न विचारत पुण्यातील कोथरूड येथे सर्वपक्षीय आंदोलनाला सुरुवात 


राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Sharad Pawar : पुणे महापालिका आयुक्त, मुख्य बांधकाम अभियंता शरद पवारांच्या भेटीला

पुणे : पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र नभोसले आणि मुख्य बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे शरद पवारांच्या भेटीला


नदीसुधार प्रकल्प आणि पुण्यातील इतर प्रकल्पांची माहिती देण्यासाठी आणि त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट 


पुण्यात नुकत्याच झालेल्या

Palghar CPM Protest : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून विविध मागण्यांसाठी पालघरमध्ये रास्ता रोको

पालघर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा आज रास्ता रोको


पालघरच्या चारोटी येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको


पेसा भरतीसह विविध मागण्यांसाठी सीपीएम आक्रमक


चारोटीसह परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप


शेकडो पोलिसांचा चारोटी येथे बंदोबस्त तैनात असून रास्ता रोकोला सुरुवात होणार

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आता 5 सप्टेंबरला सुनावणी

आप पक्षाचे नेते अरविंद केजरिवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. एक केजरीवाल यांना झालेली अटक बेकायदेशीर आहे, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. तर दुसरी याचिका अंतरिम जामीनासाठी दाखल केली आहे.


आज पार पडलेल्या सुनावणीत सीबीआयने केजरीवाल यांनी त्यांची अटक बेकायदेशीर आहे, असा दावा केला आहे त्यावर आम्ही उत्तर सादर केलं आहे मात्र, अंतरिम जामिनावर आम्ही उत्तर सादर केलेले नाही. ते लवकरच सादर करू, असं म्हणत वेळ मागितला होता.


यावर केजरिवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने या सर्व प्रकरणावर ५ सप्टेंबरला सुनावणी घेऊ असं सांगत आज होणारी सुनावणी पुढं ढकलली आहे…

कोल्हापूर : समरजित घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू

कोल्हापूर : समरजित घाटगे यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू झाला.. 


या मेळाव्याला समरजित घाटगे उपस्थित झाले


समरजित घाटगे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेऊन मेळाव्यात आणले...

Badlapur Crime Update : बदलापूर प्रकरणात SIT ची मोठी कारवाई, शाळेवरही पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

बदलापूर प्रकरणात शाळेवरही गुन्हा दाखल.


एसआयटीने केला पोक्सो अंतर्गत शाळेवर गुन्हा दाखल.

विधानसभा निवडणुकीत 6-7 जागांवर मुस्लीम उमेदवार देणार, अल्पसंख्याकांच्या मतांसाठी अजित पवार गटाची खेळी

अल्पसंख्याकांना जवळ करण्यासाठी अजित पवार गटाची खेळी 


विधानसभा निवडणुकीत ६-७ जागांवर मुस्लिम उमेदवार देण्याची शक्यता 


कळवा-मुंब्रा, अणुशक्ती नगर, वांद्रे पूर्व, शिवाजीनगर-मानखुर्द, जालना,  परभणी, बीड या जागांवर अजित दादा गटाकडून मुस्लिम उमेदवार 


संभाव्य उमेदवार 


कळवा-मुंब्रा-नजीम मुल्ला 
अणुशक्तीनगर-सना मलिक 
शिवाजीनगर-मानुखुर्द-नवाब मलिक 
वांद्रे पूर्व-झिशान सिद्दीकी

अजितदादांच्या राष्ट्रवादीची जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत उडी, 25 स्टार प्रचारकांची केली घोषणा!

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २५ स्टार प्रचारकांची घोषणा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिली. 



राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 



प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी जाहीर केलेल्या यादीत पक्षाच्या २५ प्रमुख नेत्यांचा समावेश असून या भागातील निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.



या यादीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यासह महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, एस. आर. कोहली, ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि जम्मू आणि काश्मीर प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल आदी प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.


या अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये एक मजबूत आणि प्रभावी मोहिम राबवली जाणार आहे. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल असा विश्वास ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी व्यक्त केला.



स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे आहे - राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर कोहली, राष्ट्रीय सरचिटणीस आणि जम्मू आणि काश्मीर प्रभारी ब्रिजमोहन श्रीवास्तव, राष्ट्रीय सरचिटणीस आणि अल्पसंख्याक अध्यक्ष जलालुद्दीन, पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय सचिव श्रीमती रुही अंजुमन, कार्यकारिणी सदस्य पार्थ पवार, ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष उमाशंकर यादव, राष्ट्रीय मिडिया समन्वयक नवीन कुमार, युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य मानकर (सनी), अल्पसंख्याक विभागाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष फैज अहमद फैज, अल्पसंख्याक सेलच्या राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. मुमताज आलम रिझवी, जम्मू आणि काश्मीरचे अध्यक्ष डॉ. तारिक रसूल, अध्यक्ष MSME मोहम्मद इक्बाल, काश्मिरी पंडित वेलफेअर सेलचे अध्यक्ष अरुण रैना, सरचिटणीस फैयाज अहमद दार,उपाध्यक्ष हरिस ताहिर भट, सरचिटणीस  फिरोज अहमद रंगराज, प्रदेश सरचिटणीस तौसीफ भट्ट, गांदरबल, राज्य सचिव संजय कौल, सदस्य इर्शाद अहमद गनी, सुश्री ऐशिया बेगम, सुश्री सलीमा अख्तर, आदींचा समावेश आहे.

Nashik Maratha Reservation Protest : काँगेसच्या मेळाव्याच्या ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक, काँग्रेसच्या नेत्यांना निवेदन देणार

- नाशिकमध्ये मराठा समाज आक्रमक
- काँगेसच्या मेळाव्याच्या ठिकाणी पोहचले मराठा आंदोलक

- ओबीसी मधून मराठा समजला आरक्षण दिले पाहिजे या मागणीचे निवेदन देणार

- विजय वडेट्टीवार यांच्यासह काँगेस नेत्यांना जाब विचारणार


- दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिकमधे येणार त्यांनाही मराठा समाजाकडून निवेदन दिले जाणार

Pune Murder : पुण्यात भर रात्री सराईत गुंडाचा निर्घृण खून

पुणे : मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील सिंहगड रस्त्यावर एका सराईत गुंडाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी बसल्यानंतर वाद झाला. आणि त्या वादातूनच मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. हनुमंत उर्फ गोट्या शेजवळ असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. तर याप्रकरणी आरोपी गणेश आकाश कुलकर्णी याला सिंहगड रोड पोलीस आणि ताब्यात घेतले आहे. 

Maharashtra Bandh : उद्याच्या महाराष्ट्र बंदविरोधात हायकोर्टात याचिका, तातडीची सुनावणी सुरू

उद्याच्या महाराष्ट्र बंदविरोधात हायकोर्टात याचिका, तातडीची सुनावणी सुरू


डॉ. गुणरत्न सदावर्तेंसह इतरांची बंदविरोधात याचिका


महाविकास आघाडीनं आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता बंद पुकारल्याचा आरोप


बंदमुळे शाळा, महाविद्यालय, रूग्णालय, यांच्यासह सर्वसामान्य जनता भरडली जाणार असल्याचा आरोप


मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू

Vidhansabha Election 2024 : भाजप, संघाच्या सर्व्हेवर ठरणार भाजपाच्या आमदारांचे भविष्य

भाजप आणि संघाच्या सर्व्हेवर ठरणार भाजपच्या आमदारांचे भविष्य


विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि संघाकडून आणखी दोन सर्व्हेक्षण केले जाणार


या सर्वेक्षणानंतर कुणाला उमेदवारी द्यायची? आणि कुणाचा पत्ता कापायचा? यावर होणार निर्णय


याआधी भाजपकडून एक सर्व्हेक्षण करण्यात आले होते


बहुतांश आमदारांची कामगिरी गेल्या सर्वेक्षणात असमाधानकारक होती


आता पुन्हा भाजप आणि संघाकडून केले जाणार सर्वेक्षण

Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं 

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं 


मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आज शेतकरी कशाप्रकारे आत्महत्या करतात याचे प्रात्यक्षिक आंदोलन तुपकर आणि काही शेतकरी करणार होते 


 सुरक्षेच्या कारणास्तव आणि परवानगी नसल्यामुळे चर्चगेट येथून तुपकर यांना पोलिसांनी हॉटेलमधून ताब्यात घेतलं 


 सध्या आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये तुपकर यांना नेलं आहे

पार्श्वभूमी

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेतेमंडळी जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करण्यासाठी सभा, मेळावे, रॅली आयोजित करत आहेत. सध्या राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचेही पेव फुटले आहे. दुसरीकडे बदलापूरमधील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या तसेच आंतरराष्ट्रीय, देश, राज्य पातळीवरील सर्व घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर... 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.