Maharashtra Breaking 1st July LIVE Updates: पुणे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाचवर; एरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 01 Jul 2024 01:14 PM
BEED News: कृषिमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित

BEED News: कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित असल्याचं समोर आले आहे. याच कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांच्या माध्यमातून आक्रोश आंदोलन करण्यात आलं. गेल्या सहा महिन्यात बीड जिल्ह्यात 103 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी केवळ आठ शेतकरी कुटुंबीयांनाच शासकीय मदत मिळाली आहे. इतर आत्महत्याग्रस्त कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळेच या कुटुंबीयांना मदत मिळावी या मागणी करिता हे आक्रोश आंदोलन करण्यात आले. कृषीमंत्र्यांचाच जिल्ह्यात ही बाब उघड झाल्याने तातडीने चौकशी करून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

Zika Virus : पुणे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाचवर; एरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग

Zika Virus : पुणे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाच वर


पुण्यातील एरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग, महिलेची प्रकृती स्थिर


रुग्णांच्या संपर्कात आलेले आणि तापाची लक्षणे असलेले त्यांचे कुटुंबीय आणि इतर व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्थेकडे


झिकाचे रुग्ण आढळून आलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू


पुण्यातील एरंडवणे आणि मुंढव्यात रुग्ण आढळलेल्या परिसरात प्रत्येकी १०० घरांच्या आतमध्ये धूर फवारणी

Jalgaoun News: जळगाव, एसआरपीएफ भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू,प्रशासन जबाबदार, कुटुंबाचा आरोप

Jalgaoun News: मुंबई येथील बालेगाव  कॅम्प परिसरात झालेल्या एसआरपीएफ भरती दरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अक्षय  मिलिंद बिऱ्हाडे या तरुणाचा धावताना खाली कोसळून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.


या घटनेच्या नंतर अक्षय  बिऱ्हाडे यावर वेळीच प्राथमिक  उपचार करण्यात न आल्याने त्याचा मृत्यु झाला असल्याचा गंभीर आरोप केला असून,  या घटनेस स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा  आरोप करत, या घटनेची चौकशी करत यातील दोषी वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

अक्षय हा त्याच्या कुटुंबात एकुलता एक होता,त्याच्यावर त्याच्या कुटुंबाचा उदर निर्वाह अवलंबून होता,तो आता गेल्याने त्याच्या परिवाराचा उदर निर्वाह प्रश्न निर्माण झाल्याने,शासनाने त्याच्या परिवाराचे पुनर्वसन करावे,त्यांना आर्थिक मदत द्यावी आणि पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी शासनाने भरती ठिकाणी आवश्यक त्या सुविधा पुरेशा प्रमाणांत उपलबध करून द्याव्या, जेणे करून पुन्हा एकदा कोणत्याही अक्षय चां अशा पद्धतीने मृत्यू होणार नाही अशी अपेक्षा केली आहे.
Akole News: अकोले दूध दराच्या मागणीसाठी शेतकरी पूत्रांचे आमरण उपोषण

Akole News: दूध दराच्या मागणीसाठी राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन सुरू असताना अकोले तालुक्यातील गणोरे गावात आता शेतकरी पुत्रांनी आमरण उपोषण सुरू केल आहे. शुभम आंबरे आणि संदीप दराडे या दोघांनी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून गणोरे गावासह पंचक्रोशीतील अनेक गावांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा ही प्रमुख मागणी घेऊन हे आमरण उपोषण सुरू झाला असून पंचक्रोशीतील दूध उत्पादक देखील पाठिंबा देण्यासाठी उपोषण स्थळी गर्दी करत आहे.

Yavatmal News: पहिल्याच पावसात अडाण नदीला पूर; वाहतूक काही काळ बंद

Yavatmal News: यवतमाळ शहरासह जिल्ह्यात  रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला असून पावसात अडाण नदीला पूर आला. यामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. 


पावसामुळे यवतमाळ दारवा मार्गावर असलेल्या बोरिअरब येथील अडाण नदीला पूर आला. येथील लहान पुलाच्या वरून पाणी वाहत होते. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद होती. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांपासून अडाण नदीवर बोरी अरब येथे पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र कामाची गती अत्यंत संत असल्यामुळे आजतागयात पुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे सलग तीन वर्षापासून या मार्गावर वाहतूक सेवा विस्कळीत होत आहे.  जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद झाल्यामुळे दहिफलमार्गे 35 किमी फेर्‍याने जाण्याची वेळ वाहनचालकावर येत आहे. 
Maharashtra News: ह भ प एकनाथ महाराज कंधारकर यांचा सन्मान

Maharashtra News: 250 वर्षा पासून सुरू असलेल्या साधू महाराज दिंडीत गेल्या 50 वर्ष पासून   अखंड वारी करणारे ह भ प एकनाथ महाराज कंधारकर यांच्या आज माळेगाव गाव येते सन्मान करण्यात आला, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा उपस्थित हा सत्कार सोहळा पार पडला 1974 पासून एकनाथ महाराज कंधारकर हे वारी सहभागी होत होते साधू महाराज देवस्थानचे ते आठवे वंशज आहे

Ahmednagar News: लाचेची मागणी करून फरार झालेले आयुक्त जावळे यांच्या अडचणीत वाढ

Ahmednagar News: लाच मागणी प्रकरणात फरार असलेले अहमदनगर मनपाचे आयुक्त पंकज जावळे यांच्या अडचणीत आणखी वाढ झालीये. जावळे यांनी त्यांच्या कार्यकाळात ठराव करून घेतलेल्या प्रकरणाचा अहवाल शासनाने मागविला आहे. आयुक्त जावळे यांनी त्यांच्या कार्यकाळात स्थायी समितीची 88 ठराव आणि सर्वसाधारण सभेचे 34 ठराव महापालिका अधिनियमातील तरतुदीचे उल्लंघन करून केले असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली होती. दरम्यान करण्यात आलेल्या मागणीनुसार शासनाने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धारम सलीमठ यांना पास करण्यात आलेल्या एकूण ठराव संदर्भात अहवाल मागविला आहे. तसा आदेशचं शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे.

Paper Leak Case: पेपरफुटी विरोधातला कायदा याच अधिवेशनात आणणार : देवेंद्र फडणवीस

Paper Leak Case: पेपरफुटी विरोधातला कायदा याच अधिवेशनात आणणार आहोत असं फडणवीसांनी आज जाहीर केलं. गट कच्या जागाही आता टप्प्याटप्प्याने एमपीएससीद्वारे भरल्या जातील अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्यात कोणत्याही घोटाळ्याविना 77 हजार पदभरती झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पेपरफुटीने पास होणाऱ्यांची संख्या वाढल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत केला. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

Thane News: ठाण्याजवळ येऊरमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन - जितेंद्र आव्हाड

Thane News: ठाण्याजवळ येऊरमध्ये रेव्ह पार्टीचं आयोजन - जितेंद्र आव्हाड


सर्व मोठे ड्रग्ज पेडलर्स खुलेआम येऊरमध्ये फिरत होते- आव्हाड


वर्ल्डकप जल्लोषाच्या नावाखाली रेव्हपार्टीचं आयोजन- आव्हाड 

Lonavala Bhusi Dam: फक्त पंधरा मिनिटांच्या पावसानं प्रवाह वाढतो, पाण्याचा अंदाज नसेल आला...; भुशी डॅम परिसरात बचावकार्य करणाऱ्यांनी सांगितलं काय घडलं?

Lonavala Bhusi Dam: पुणे : भुशी डॅम (Bhusi Dam) परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलं आहे. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून अद्याप एकजण बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Satara News: साताऱ्यातील मायणी  इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर रुग्णालयातील कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची 5 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी

Satara News: साताऱ्यातील मायणी  इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर रुग्णालयातील कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची 5 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी


माणचे भाजप आ जयकुमार गोरे यांच्यासह पत्नी आणि इतरांवर गंभीर आरोप.


 कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप 


मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी केली होती याचिका दाखल.


आरोपावर  5 जुलैला उच्च न्यायालयात होणार सुनावणी


 आ जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर सहभागी आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची  याचिकेतून मागणी

Sangali News: कडेगाव शहरात गॅस्ट्रोची साथ; 35 रुग्ण आढळले
Sangali News: कडेगाव शहरात गॅस्ट्रोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.या रुग्णाची रुग्णालयात आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी भेट घेत गॅस्ट्रोची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना राबवा, अशा सूचना आरोग्य प्रशासनाला दिल्यात. कडेगाव शहरात गॅस्ट्रोचे सुमारे 35 रुग्ण आढळून आले आहेत. यातील अनेक रुग्ण कडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. विश्वजित कदम यांनी रुग्णालयात जाऊन या रुग्णांची विचारपूस केली. 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.