Maharashtra Breaking 18th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra Breaking 18th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई Last Updated: 18 Jul 2024 02:18 PM
Zika Virus : एडीस डासांमुळे होणाऱ्या 'झिका' विषाणूचा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने प्रसार

Zika Virus : एडीस डासांमुळे होणाऱ्या 'झिका' विषाणूचा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली असून संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.

Maharashtra Politics : शिवसेनेची वर्षावर महत्त्वाची बैठक; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन 

Maharashtra Politics : थोड्याच वेळात शिवसेनेची वर्षावर महत्त्वाची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन 

पक्षाची आगामी रणनीती, संपर्क अभियानाबाबत घेणार माहिती

शिवसेना पक्षाचे मंत्री, नेते, आमदार,  जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते वर्षा बंगल्यावर दाखल... 

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार बैठक 

विधानसभेसाठी काही महत्त्वाच्या नेमणुका करण्यात येणार आहेत, त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता, 

पक्षाची आगामी रणनीती, संपर्क अभियान बाबत घेणार माहिती.. 

पक्षांतर्गत वाद, नाराजी तसंच स्थानिक राजकारणाबाबत घेणार आढावा

विलास लांडेंच्या डोक्यात काय शिजतंय? तुतारी फुंकलेले लांडेंचे कट्टर समर्थक अजित गव्हाणे म्हणतात....!

पुणे: अजित गव्हाणेंनी शरद पवारांची तुतारी फुंकून चोवीस तास ही उलटले नाहीत, तोवर गव्हाणेंचे मार्गदर्शक माजी आमदार विलास लांडे हे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. गव्हाणे समर्थकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानं खडबडून जागे झालेल्या अजित पवारांनी आज पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीला लांडेंनी हजेरी लावल्यानं सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. यानिमित्ताने लांडेंच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय, असा प्रश्न विचारला जातोय? मात्र आज लांडे हे अजित पवारांच्या बैठकीला जाणार असल्याची मला कल्पना होती, तसेच आगामी काळात ते माझाचं प्रचार करतील असा विश्वास गव्हाणेंनी व्यक्त केलाय.  

Nashik :नाशिकमध्ये डेंग्यूचे थैमान, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना थेट आयुक्तांच्या भेटीला

काँगेस पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी ही मनपा आयुक्त अशोक करंजकर यांच्या भेटीसाठी आलेत
-
खासदार राजभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ मनपा मध्ये दाखल
-
गेल्या काही दिवसापासून डेंग्यूचा थैमान सुरू आहे, यावर प्रतिबंध करण्यात मनपा प्रशासनाला अपयश आल्यानं
महाविकास आघाडीचे शिवसेना आणि काँगेस पक्ष आक्रमक

शिवसेनेचे थोड्याच वेळात वर्षावर बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन

शिवसेनेची महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात होणार सुरू, 

वर्षा बंगल्यावर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन 

शिवसेना पक्षाचे मंत्री, नेते, आमदार,  जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते वर्षा बंगल्यावर दाखल... 

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार बैठक 

विधानसभेसाठी काही महत्त्वाच्या नेमणुका करण्यात येणार आहेत, त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता, 

पक्षाची आगामी रणनीती, संपर्क अभियान बाबत घेणार माहिती.. 

पक्षांतर्गत वाद आणि नाराजी तसेच स्थानिक राजकारणाबाबत  घेणार आढावा

Zika Virus : एडीस डासांमुळे होणाऱ्या 'झिका' विषाणूचा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने प्रसार

Zika Virus : एडीस डासांमुळे होणाऱ्या 'झिका' विषाणूचा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली असून संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत.

Mumbai Rain Updates : मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा, नवी मुंबई परिसरात रात्रभर संततधार

Mumbai Rain Updates : मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा, नवी मुंबई परिसरात रात्रभर संततधार सुरू आहे. कल्याण डोंबिवली, वसई विरार पालघरमध्येही पाऊस सुरू आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात दमदार पाऊस होतोय, तर पूर्व उपनगरातही संततधार सुरू आहे. पुढील तीन ते चार तास पाऊस असाच सुरू राहील अशी माहिती हवामान खात्याने दिलीय. सकाळी 5.30 वाजेपर्यंत  दक्षिण मुंबईत 51.8 मिमी पावसाची नोंद तर पश्चिम उपनगरात 27 मिमी पावसाची नोंद झालीय. पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 5 ते 10 मिनिटं उशिराने, हार्बर मार्गावर वाहतूक 10 ते 15  मिनिटं उशिरानं, मध्य रेल्वेची उपनगरीय रेल्वेसेवा 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. हवाई वाहतूक सुरळीत सुरू आहे. महापे शीळ-मार्गावर अवजड वाहतुकीमुळे वाहतूक धीम्या गतीनं आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking 18th July LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

1. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढील काही तास पावसाचा इशारा

2. अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता

3. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली, कोअर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत बैठक, दिल्लीतून दोन्ही निवडणूक प्रभारी येणार

4. विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात, आजपासून बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेत, शहर आणि जिल्हाप्रमुख अशा 60 जणांची बैठक

5. विधानपरिषदेतल्या क्रॉसवोटिंगवर हायकमांडचा आदेश घेऊन प्रदेशाध्यक्ष आज मुंबईत परतणार, उद्या मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची बैठक

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.