Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन देखील मुंबईत सुरु आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

मुकेश चव्हाणLast Updated: 12 Mar 2025 06:54 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींचा जबाब बंंद लिफाफ्यात सादर होणार आहे. तर सतीश भोसले उर्फ खोक्याचा...More

विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार,परिणय फुके यांनी  परिषदेत उपस्थित केला प्रश्न

*विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी
नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार*


*आमदार डॉ. परिणय फुके यांनी  परिषदेत उपस्थित केला प्रश्न  


ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती 



गडचिरोली जिल्ह्यात 100 ते 150 राईस मिल्स धानाच्या भरडाईचे काम करतात. यातील निवडक सात राईस मिल्सची नावे लक्षवेधीत घेण्यात आले. याबाबत काल, 11 मार्च रोजी विधानसभेत प्रश्न मांडण्यात आला. परंतु दोन दिवसांपूर्वी राईस मिल्स कार्यालयातील एजंटसारख्या असलेल्या लोकांनी प्रश्न का लावायचा, लावल्यावर काय होणार आदी चर्चा करीत पैशाची मागणीचाही उल्लेख करण्यात आला. ही संपूर्ण संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचे नमुद करीत यात काही नेत्यांच्या एजंटचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधानपरिषदेत केला. या एजंट व नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.


धानाच्या भरडाईचे काम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील 100 ते 150 राईस मिल्सपैकी सात राईस मिल्सने 2022-23 मध्ये कमी बॅंक गॅरंटी दिली. तीन कोटींच्या बॅंक गॅरंटीवर सात कोटींची भरडाई केली आहे, असा यांच्यावर ठपका ठेवला होता, याकडे आमदार डॉ. परिणय फुके यांनी आज विधानपरिषदेत लक्ष वेधले. 



विधानसभेत प्रश्न लावण्याच्या दोन दिवसाआधीच्या काही ऑडिओ क्लिप पुढे आल्या आहेत. काहींचे फोनवर संभाषण देखील झाले. या राईस मिल मालकाच्या कार्यालय एजंटसारखे असलेले लोक हा प्रश्न का लावायचा नाही, लावल्यावर काय होणार, अशाप्रकारच्या धमक्या देणाऱ्या क्लिप माझ्याकडे असून मी आज आदरणीय गृहमंत्र्यांना याबाबत सूचना दिली, असे डॉ. परिणय फुके यांनी परिषेदत सांगितले. 


या प्रकरणात ब्लॅकमेल करणे किंवा पैशाची मागणी करण्यात आली असून यात काही नेत्यांच्या एजंटचा समावेश आहे. या एजंट व नेत्यांवर कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर  मा. अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री श्री योगेशजी कदम,  यांनी गरीब लोकांना निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा केला जातो, ही बाब मान्य करीत यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले. एवढेच नाही तरी कोणत्याही राजकीय पक्षांचे नेते किंवा त्यांचे एजंटांवर तसेच गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. संभाषणाबाबत जी माहिती पुढे आली, ती एकत्रित करण्यात येईल. याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित केली असल्याचे सांगितले.