Mutual Fund : इंडसइंड बँकेचा शेअर 27 टक्क्यांनी गडगडला, लोअर सर्किट लागताच म्युच्युअल फंडांचे 7300 कोटी बुडाले, यादी समोर
इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये मंगळवारी 27 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. यामुळं बँकेचा शेअर 900 रुपयांवरुन 656 रुपयांपर्यंत घसरला. बँकेच्या डेरिवेटिव पोर्टफोलिओतील अनियमिततांमुळं 1500 ते 2000 कोटी रुपयांचं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. ही माहिती समोर येताच बँकेचा शेअर गडगडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये मंगळवारी 27 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. यामुळं बँकेचा शेअर 900 रुपयांवरुन 656 रुपयांपर्यंत घसरला. बँकेच्या डेरिवेटिव पोर्टफोलिओतील अनियमिततांमुळं 1500 ते 2000 कोटी रुपयांचं नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. ही माहिती समोर येताच बँकेचा शेअर गडगडला.
इंडसइंड बँकेचा शेअर 27 टक्क्यांनी घसरल्यानंतर म्युच्युअल फंडच्या होल्डिंगची किंमत 22339 कोटींवरुन 15000 कोटी रुपयांपर्यंत खाली आलं. यामुळं 7339 कोटी रुपयांचं नुकसान म्युच्युअल फंडांचं झालं आहे.
इंडसइंड बँकेच्या शेअरमधील घसरणीचा सर्वाधिक फटका यूटीआय निफ्टी 50 एक्सचेंज ट्रेडेड फंडला 120 कोटी रुपयांचं नुकसान झालं. यूटीआय वॅल्यू फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ला46.46 कोटींचं नुकसान झालं.
यूटीआय निफ्टी बँक एक्सटेंड ट्रेडेड फंडला 52.70 कोटी रुपयांचं नुकसान झालं. बंधन फ्लेक्सी कॅप फंड ग्रोथचं 46.09 कोटी रुपयांचं नुकसान झालं. यूटीआय मिडकॅफ फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथचं नुकसान 44.32 कोटी रुपयांचं नुकसान झालं.
ट्रेंडलाईन डॉट कॉमच्या माहितीनुसार यूटीआय म्युच्युअल फंडकडे इंडसइंड बँकेचे 1.27 कोटी शेअर आहेत. यूटीआयच्या 15 म्युच्युअल फंड योजनांकडे याचं होल्डिंग आहे. याशिवाय बंधन म्युच्युअल फंड, क्वांट म्युच्युअल फंड, मोतिलाल ओसवाल म्युच्युअल फंड, एलआयसी म्युच्युअल फंड, सुंदरम म्युच्युअल फंड, इनेवस्को इंडिया म्युच्युअल फंडचं नुकसान झालं.
म्यु्च्युअल फंडांनी प्रत्येक तिमाहीत इंडसइंड बँकेमधील होल्डिंग वाढवलंहोतं. डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत बँकेच्या एकूण 30.31 टक्के शेअरचा वाटा म्युच्युअल फंडकडे होता. म्युच्युअल फंडांचा इंडसइंड बँकेतील डिसेंबर 2023 च्या तिमाहीतील वाटा 15.63 टक्के होता.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)