Airtel Mumbai: मुंबईच्या चारकोपमधील एअरटेलच्या गॅलरीत कर्मचारी तरुणीचा मराठीतून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठी येणं गरजेचं नाही, अशी उद्दाम तरूणीची भाषा दिसून येत आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठीतून बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरूणाशी तरूणीची हुज्जत घालत असल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक तरुणी मराठी तरुणाला महाराष्ट्रात मराठी येणे महत्त्वाचे नाही, असे म्हणत हुज्जत घालत आहे. 'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ है. हम हिंदुस्थान मैं रहते है', भारतात कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो, असे एक तरुणी मराठी तरुणाला म्हणत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एअरटेलच्या गॅलरीत तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने मराठी बोलण्याचा आग्रह केल्यानंतर तेथील तरुणीने मराठी बोलण्यास नकार देत हुज्जत घातली.
ठाकरे गट आक्रमक, अखिल चित्रे थेट एअरटेलच्या गॅलरीत-
सदर प्रकरण समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे थेट एअरटेलच्या गॅलरीत पोहचले. एअरटेलच्या गॅलरीत मराठी तरुण-तरुणी ठेवायला अडचण आहे काय?, असा सवाल अखिल चित्रेंनी उपस्थित केला. तसेच मुंबईतील एअरटेलटच्या कामकाजात मराठी नसेल, तर एकही एअरटेलची गॅलरी दिसणार नाही, असा इशारा अखिल चित्र यांनी दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी असा वाद वाढताना दिसत आहे. एअरटेल प्रशासनाने नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावं. महाराष्ट्रात एअरटेलचे असंख्य मराठी ग्राहक आहेत ते कायम ठेवायचे असतील तर योग्य पाउलं उचला नाहीतर मुंबईत एअरटेल ची गॅलरी दिसणार नाही. इतर भाषेचा विरोध नाही पण मराठी भाषिक 80% कर्मचारी असायलाच हवे, असं अखिल चित्रे म्हणाले. एअरटेल प्रशासनाने ताबडतोब या अशा कर्मचान्यांवर कारवाई करावी, अन्यथा आम्ही कारवाई केली तर मुंबईत एअरटेल गॅलरी दिसणार नाहीत, महाराष्ट्रात आपली ग्राहक संख्या मोठ्या प्रमाणात आहेत, ते संख्या जर कायम ठेवायची असेल तर मराठी भाषेचा मान राखा, असंही अखिल चित्रे यांनी एअरटेलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहित सांगितले.
संबंधित बातमी:
लग्न होताच रात्री खोलीत गेले, सकाळी दाम्पत्याचा मृत्यू; तपासामध्ये धक्कादायक माहिती आली समोर