Maharashtra Breaking 11th July LIVE Updates: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Background
Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...
1. भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची आज सकाळी 10 वाजता बैठक, भाजप प्रदेश कार्यालयात सकाळी 10 बैठकीचं आयोजन,बैठकीला सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार
2. भाजप आमदारांची विधिमंडळात बैठक पार, विधान परिषदेसाठी भाजप आमदारांची घेण्यात आली रंगीत तालीम, आमदारांनी कोणत्या पसंतीची कशी मते द्यावीत याबाबत करण्यात आल्या सूचना
3. मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक संपन्न, 11 प्रमुख नेत्यांची मुंबईतील 36 जागा महायुतीच्या म्हणून निवडून येण्यासाठी बैठक झाल्याची आशिष शेलार यांची माहिती
4. प्रदेश काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू, 19 जुलैला मुंबईतील टिळक भवनात पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजित, बैठकीत निवडणुकीची रणणिती आखली जाणार
5. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची बैठक संपन्न, शिंदे गटाचे सर्व आमदार वांद्रेंच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये उपस्थित
Maharashtra News : रस्त्यावरचे खड्डे पाहणं आणि ते सहन करणं तर दररोजच आपल्या नशिबीच; स्थानिक ग्रामस्थांचा संताप
Maharashtra News : रस्त्यावरचे खड्डे पाहणं आणि ते सहन करणं तर दररोजच आपल्या नशिबी आहे. पण आता आम्ही तुम्हाला सर्व खड्ड्यांचा बाप दाखवणार आहोत. मुंबई-नाशिक महामार्गावरील एका पुलाला चक्क भगदड पडलंय. शहापूरजवळ समृद्धी महामार्गावरून जाणारा आणि दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला भलं मोठं भगदाड पडलं आहे. शेरे - बावघर - शेंद्रूण गावांना जोडण्यासाठी हा उड्डाणपूल बनवण्यात आला आहे. पुलाचं बांधकाम किती निकृष्ट दर्जाचं आहे हे यावरून स्पष्ट होतं. कंत्राटदारावर कारवाई होईल अशी अपेक्षा करण्यावाचून आमच्या हातात दुसरं काही नाही, अशी भावना स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करतायेत.
Maharashtra News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार
Maharashtra News : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप नेते नितेश राणे यांची चौकशी होणार
नितेश राणेंनी दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती
दिशाची आत्महत्या नसून हत्या, असा नितेश राणेंनी केला होता दावा
दिशा मृत्यूप्रकरणात पुरावे असल्याचा नितेश राणेंचा दावा
मुंबई पोलिसांकडून नितेश राणेंना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश























