Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर...
राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आलीये. लंडनमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडे तलवार सुपूर्द करण्यात आलेय. तलवार ताब्यात घेतल्यानंतरची एक्स्क्लुझिव्ह दृश्यं 'माझा'वर. राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत. ऐतिहासिक वाघनखानंतर भोसल्यांची तलवार पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. सरकारनं 47 लाख 15 हजार रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतलीये. येत्या 18 ऑगस्टला तलवार लंडनहून मुंबईत आणली जाणार आहे.
लाडक्या बहिणींची अंगवाडी सेविकांद्वारे गृहचौकशी होणार
राज्य सरकारने लाडक्या बहीणींची गृहचौकशी करण्याचा निर्णय घेतलाय, त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील 1 लाख 25 हजार लाडक्या बहिणींची चौकशीचं काम हाती घेण्यात आलंय, हे काम अंगणवाडी सेविकांद्वारे करण्यात येणार आहे मात्र अंगणवाडी सेविकांनी काम करण्यास नकार दिलाय, अंगणवाडी सेविकांकडे FRSचे काम, पुरक पोषण आहार, सर्वे अद्ययावत करणे, गरोदर माता नोंदी ठेवणे, जन्म आणि मृत्यू नोंदी, अशी अनेक कामे आहेत.त्यामुळे योजनेची पडताळणी आणि मातृ वंदनाचे काम सेविकांकडून करणे शक्य होणार नसल्याचे अंगणवाडी सेविकांनी म्हंटले आहे.
कोल्हापुरात महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून संघर्ष
कोकणानंतर आता कोल्हापुरात देखील महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून संघर्ष उभा राहिलाय...स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधून लढणार पण प्रत्येक पक्ष आपलाच महापौर, आपलाच जिल्हा परिषद अध्यक्ष असेल असे दावे सुरू झाले आहेत..महायुतीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आपलाच पक्ष मोठा असणार असा दावा केला आहे. त्यानुसार बैठकांचं सत्र देखील सुरू झालंय
अंबाजोगाईतील फर्निचर दुकानाला आग, आगीत दुकानाचे लाखोंचे नुकसान, जीवितहानी नाही
अंबाजोगाईतील फर्निचर दुकानाला आग, आगीत दुकानाचे लाखोंचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही
Ac - बीड च्या अंबाजोगाईत असलेल्या एका फर्निचर च्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे दुकानातील सामान जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कसलीही जिवितहानी झालेली नाही.अंबाजोगाईतील मंडी बाजार या ठिकाणी फेमस फर्निचर या दुकानाला आग लागल्याने या आगीमध्ये कुलर,कपाट यासह विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या विविध वस्तू दुकानाला आग लागल्याने जळून खाक झाल्या आहेत.यामुळे दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
छत्रपती संभाजीनगर मैत्रिणीवर गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलीस ठाण्यात मुजोरी
छत्रपती संभाजीनगर मैत्रिणीवर गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलीस ठाण्यात मुजोरी दिसून आली,
मेडिकल साठी नेले जात असताना कॅमेऱ्यासमोर त्याने
और दो तीन लडकीयोंको गोली मारता बाहेर आणे के बाद असे बोलला, त्यामुळं आरोपी किती मुजोर आहे हेच या निमित्ताने पुढं आलं आहे... याच सय्यद फैजल ऊर्फ तेजाने रात्री मैत्रिणीवर गोळी झाडली. गोळी तिच्या हाताला लागल्याने ती जखमी झाली. हल शहरातील किलेअर्क परिसरात ही घटना घडली, सय्यद फैजल रात्री १२ वाजेच्या सुमारास तिथे गेलेला, राखी असे जखमी मैत्रिणीचे नाव आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी आरोपीला अटक केली आहे...
बाईट- रत्नाकर नवले , डीसीपी क्राईम























