Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरण, शत्रुघ्न सिन्हा यांचं मांसाहार बंदीबाबतचं वक्तव्य, यांसारख्या महत्त्वाच्या घडामोडी राज्यासह देशात चर्चेचा विषय ठरत आहेत.

Background
Maharashtra 6th February Breaking News Live Updates: राज्यासह, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये एका क्लिकवर आपल्याला पाहता येणार आहेत.
अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मांसाहार बंदीबाबत केलेलं वक्तव्य, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांबाबत केलेलं आक्षेपार्ह्य वक्तव्य आणि त्यानंतर मागितलेली माफी यांसारख्या राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच परदेशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. या सर्व घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये संक्षिप्त स्वरुपात घेता येणार आहे...
Nagpur : विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे अधिवेशन नागपुरात
गडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नागपूर मुख्यालयात 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी दुसरे अधिवेशन होणार आहे. 24 मार्चला दुपारनंतर खुले अधिवेशन होणार असून 120 तालुक्यांचे प्रतिनिधी व पदाधिकारी हजर राहणार आहेत. या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न, अनुशेष यावर चर्चा तसेच विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक भूमिका मांडणार आहेत. प्रसिध्द अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले विदर्भाचा अर्थसंकल्प जनतेसमोर सादर करणार आहेत. या अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे.
Kirit Somaiya : किरीट सोमय्या अकोल्यात दाखल
भाजपा नेते किरीट सोमय्या अकोला येथे दाखल झाले आहेत. अकोल्यातील रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्यासोबत ते चर्चा करत आहेत. अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यात साडेपंधरा हजार बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी आरोप केलाय. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांकडे याबाबत तक्रार दिली होती. अमरावती, नाशिक, नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयांतून मोठ्या प्रमाणात बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप त्यांनी केलाय. आज सोमय्या यांनी अकोला येथील रामदास पेठ पोलीस स्टेशनला भेट दिली आहे.
























