Ganesh Naik : भाजप आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ; बलात्काराचा गुन्हा दाखल
BJP Ganesh Naik : भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP Ganesh Naik : भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात आता भारतीय दंड विधान संहिता 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात याआधीच मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गणेश नाईक यांच्या बरोबर गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला होता. लिव्ह इन रिलेशनमधून मी एका मुलाला जन्म दिला आहे. परंतु, या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा, आरोप या महिलेने केला होता. शनिवारी गणेश नाईक यांच्याविरोधात 2010 ते 2017 दरम्यान पीडितेवर शारीरिक आणि मानसिक शोषण करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मार्च 2021 मध्ये सीबीडी येथील गणेश नाईक यांच्या कार्यालयात स्वत: कडील रिव्हॅालव्हर आपल्यावर रोखून ठार मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप करत संबंधित महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
महिला आयोगाकडून दखल
पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर ही गुन्हा दाखल झाला नसल्याने पीडित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेत तक्रार केली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर पोलिसांनी आता गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, याआधी या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना कारवाई कण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले होते. तर, गणेश नाईक यांनी स्वत: पुढे येऊन डीएनए चाचणी करावी आणि याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Nanded crime : नांदेड येथे मिरवणुकीत डीजेसमोर नाचण्याच्या वादातून चाकूने भोसकून युवकाचा खून
- Hingoli :अंगावरील हळद निघण्यापूर्वीच नवविवाहितेने आयुष्य संपवलं, सासरच्या जाचाला कंटाळून गळफास
Before You Go
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या





















