बीड : सावरगावच्या भगवान भक्तीगड येथील तीन दानपेट्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या होत्या. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्या चोरट्यांकडूएन एक पेटी जप्त केली. तर इतर दोन पेट्या करंजवणच्या विहिरीत टाकल्याचे चोरट्यांनी सांगितले. विहिर तुडूंब भरलेली असल्याने त्याचे पाणी उपसणे सध्या सुरू आहे.
सावरगाव घाट येथील श्रीसंत भगवान भक्तीगड समोर तीन दानपेट्या अज्ञात चोरट्यांनी परवा मध्यरात्री चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी विनायक विठ्ठलराव सानप (वय 51 वर्षे) यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास ठाणेप्रमुख गोरक्ष पालवे यांनी करत तीन चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांनी तीन पेट्या चोरून नेल्याची कबुली दिली. त्यातील एक पेटी पोलिसांनी ताब्यात घेतली असून इतर दोन पेट्यांचा शोध सुरू आहे. त्यापैकी एक पेटी करंजवणच्या विहिरीत टाकली असल्याचे चोरट्यांनी सांगितले. ती विहिर तुडुंब रभलेली असल्याने त्याचे पाणी उपसणे सुरू आहे.
भगवानगड हे वारकरी संप्रदायाचं एक पवित्र स्थान मानलं जातं. त्याचबरोबर बीड, लातूर, परभणी जिल्ह्यातील सर्व जाती-जमातीचे लोक भगवानगडावर दर्शनासाठी जातात. भगवानबाबा या गडावर आले आणि त्यांनी गडाच्या बांधकामाला सुरुवात केली आणि त्यातूनच या गडाला भगवानगड नाव मिळालं. दरवर्षी दसऱ्याला इथं लाखो लोक जमतात. भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे अनेक वर्षे दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे. त्यांना मानणारा बीड जिल्ह्यातला वंजारी समाज मोठ्या संख्येने त्याला उपस्थित असायचा.
इतर महत्त्वाच्या बातम्या :