मुंबई : संपूर्ण जगासह देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं धाकधुक वाढवली आहे. सध्या राज्यातही कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल  33 हजार 470 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 29 हजार 671 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील  काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने 40 हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे.  तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  


राज्यात 31 ओमायक्रॉनबाधितांची नोंद


राज्यात  आज 31 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे.   आतापर्यंत 1247 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 467 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


मागील   काही  दिवसातील  रूग्ण संख्या 


9 जानेवारी - 44, 388 रूग्ण


8 जानेवारी - 41, 134 रूग्ण
7 जानेवारी -   40, 925 रूग्ण
6 जानेवारी - 36,265  रूग्ण
5 जानेवारी -   26, 538  रूग्ण
4 जानेवारी - 18, 466 रूग्ण
3 जानेवारी - 12, 160 रूग्ण
2 जानेवारी - 11, 877 रूग्ण
1 जानेवारी - 9,170 रूग्ण


राज्यात आज 8 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


 राज्यात आज  8  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 2  हजार 259 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 66 लाख 2 हजार 103 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.95 टक्के आहे.   सध्या राज्यात 12 लाख 46  हजार  729  व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2505 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7, 07 , 18,  911  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


 मुंबईत 13,648 नवे कोरोना रुग्ण


मागील 24 तासांत 13 हजार 648 कोरोनाबाधित समोर आले असून 5 जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. मुंबईत सोमवारी तब्बल 27 हजार 214 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केल्याने नव्या आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. ही देखील एख दिलासादायक गोष्ट आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 411... झाली आहे. सध्या मुंबईत 1 लाख 3 हजार 862 सक्रीय रुग्ण आहेत.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :