एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : सरकारकडून दडपशाही सुरु, पर्यावरणाची हानी होणार असेल तर रिफायनरी प्रकल्प नको : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : नागरिक जर या प्रकल्पाला विरोध करत असतील तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी सुद्धा या प्रकल्पाला विरोध करणार असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

Uddhav Thackeray : बारसू प्रकल्पाला (Barsu project) स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळं नागरिक जर या प्रकल्पाला विरोध करत असतील तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी सुद्धा या प्रकल्पाला विरोध करणार असल्याचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. सरकारकडून दडपशाही सुरु आहे. पर्यावरणाची हानी होणार असेल तर हा प्रकल्प नको असेही ते म्हणाले. महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी असं केलं जात आहे. माझं म्हणणं आहे की, हा प्रकल्प गुजरातला न्या आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांवर वरंवंटा कशासाठी?

चांगले प्रकल्प गुजरात आणि दिल्लीला नेले जात आहेत. विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राला दिले जात असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मी जर दबावाखाली असतो तर आज इकडे आलो असतो का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.जनतेशी संवाद न करता तुम्ही प्रकल्प कसे लादू शकता असेही ते म्हणाले. या प्रकल्पामुळं पर्यावरणाची हानी होणार असेल तर प्रकल्प इथे नको आहे. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांवर वरंवंटा कशासाठी? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी आज बारसू इथं भेट दिली. यावेळी त्यांनी येथील स्थानिकांशी संवादही साधला. त्यांनतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.

कातळशिल्प प्रकल्पात जाऊ देणार नाही

जर इथल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळणार असतील प्रकल्प हवे आहेत. पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर असे प्रकल्प नकोत. आम्ही विकासाच्या आड येणार नाही, पण पर्यावरणाची हानी होणार असेल तर आम्ही विरोध करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज रिफायनरी प्रकल्प विरोधकांची सोलगाव इथे भेट घेतली. त्यानंतर बारसू कातळशिल्पची पाहणीही त्यांनी केली. गिरमादेवी कोंड येथे येथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.  त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. विनाशकारी प्रकल्प येऊ नये यासाठी कोकणवासियांची भेट घेण्यासाठी आलो असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. समर्थकांसोबत आमचा संपर्क झाला नाही, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. तसंच सत्ताधाऱ्यांना सत्तेत असताना नौटंकी करण्याची गरज काय त्यापेक्षा हिम्मत असेल तर त्यांनी विरोध करणाऱ्यांना भेटावं, असं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिले. सोलगावजवळच्या कातळशिल्पाची आज उद्धव ठाकरेंनी पाहणी केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कातळशिल्प प्रकल्पात जाऊ देणार नाही. संवर्धनासाठी मी युनस्कोला पत्र लिहलं होत असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget