Maharashtra APMC Election 2023 Live Updates : चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाचा विजय, दहा जागा भाजपला तर आठ महाविकास आघाडीला
Maharashtra APMC Election Live Updates : ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी (Agricultural Market Committee Election) आज मतदान होणार आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतिम निकाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील काटावर पास झालेत. त्यांच्या सर्वसाधारण मतदारसंघात ते शेवटच्या म्हणजे सातव्या क्रमांकावर राहिले आहेत. 1267 पैकी 589 मतं त्यांना मिळाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता कायम राखण्यात ही यश आलंय.
एकूण 18 जागांमध्ये
राष्ट्रवादी कॉंग्रेसला 10
सर्वपक्षीयांना 6 ( उद्धव ठाकरे शिवसेना 3, भाजप 2 आणि काँग्रेस 1)
अपक्ष 2
Wardha APMC Election: वर्धा जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी चार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यात सिंदी रेल्वे, पुलगाव, वर्धा आणि आष्टी या बाजार समित्यांचा समावेश होता. वर्धा, सिंदी रेल्वे आणि पुलगाव येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाने विजय मिळविला आहे. पुलगाव येथे काँग्रेस आमदार रणजित कांबळे गटाचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. तर सिंदी रेल्वे बाजार समितीवर काँग्रेसच्या शेखर शेंडे गटाने झेंडा रोवला आहे. वर्धा येथे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या सहकार गटाचा विजय झाला आहे.
चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाचा विजय झाला आहे. 18 पैकी दहा जागा भाजपला तर आठ महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. भाजपाचे माजी आमदार विनायकराव पाटील यांना सत्ता पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणली आहे. अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या मोर्चेबांधणीला म्हणावे तसे यश आले नाही.
Nashik APMC Election: नाशिकच्या देवळा बाजार समितीवर भाजप जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर यांच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 17 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. देवळ्यामध्ये भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सर्व समावेशक पॅनलची निर्मिती केली होती. यापूर्वी या पॅनलच्या 8 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. आज झालेल्या 10 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळविला. पॅनल विजयी होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.
Amaravati APMC Election: अमरावतीत आज सहा बाजार समितीमध्ये निवडणूक मतदान झाले. यात तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसला भरभरून यश मिळाले आहे. 18 पैकी 18 जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे. पहिल्यांदा आमदार यशोमती ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील बाजार समितीत ठाकरे गटासोबत उमेदवार दिले. यात यशोमती ठाकूर यांना मोठं यश मिळालं आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाचे उमेदवार यात विजयी झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला आहे.
नाशिकच्या देवळा बाजार समितीवर भाजप जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य योगेश आहेर यांच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 17 जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. देवळ्यामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत सर्व समावेशक पॅनलची निर्मिती केली होती. यापूर्वी या पॅनलच्या 8 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.आज झालेल्या 10 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळविला. पॅनल विजयी होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.. यावेळी कार्यकर्त्यानी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी विकासासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून पॅनलची निर्मिती केल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समिती उद्याची मतमोजणी
मावळ
मतमोजणी : 29 एप्रिल
जागा : 18
लढत : महाविकास आघाडी विरुद्ध भाजप+शिंदे गट+काँग्रेस एक गट
प्रतिष्ठा : आमदार सुनील शेळके विरुद्ध माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
आर्थिक उलाढाल : नाही
मंचर, ता - आंबेगाव
मतमोजणी : 29 एप्रिल
जागा : 18 ( 3 बिनविरोध - मविआ)
लढत : महाविकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी गट (देवदत्त निकम) विरुद्ध भाजप+शिंदे गट
प्रतिष्ठा : माजी मंत्री दिलीप वळसे पाटील विरुद्ध माजी खासदार शिवाजी आढळराव
आर्थिक उलाढाल : 350 कोटी
वैशिष्ट्य : बटाट्याची बियाणी विक्रीसाठी राज्यात एक नंबर, तरकारीतुन ही मोठी उलाढाल
APMC Election 2023 : यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दिग्रस, नेर, बाभुळगाव, वणी, पुसद, महागाव या सात बाजार समितींसाठी दुपारी 4 वाजेपर्यंत 95 टक्के मतदान झाले. यवतमाळ बाजार समितीमध्ये 1593 पैकी 1542 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर, दिग्रसमध्ये 1018 मतदारांपैकी 988 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नेर येथे 1345 मतदारांपैकी 1298 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाभूळगाव येथे 1062 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वणी येथे 1744 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर, पुसद येथे 1545 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर महागाव येथे 1515 मतदानाचा हक्क बजावला.
APMC Election 2023 : यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दिग्रस, नेर, बाभुळगाव, वणी, पुसद, महागाव या सात बाजार समितींसाठी दुपारी 4 वाजेपर्यंत 95 टक्के मतदान झाले. यवतमाळ बाजार समितीमध्ये 1593 पैकी 1542 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर, दिग्रसमध्ये 1018 मतदारांपैकी 988 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नेर येथे 1345 मतदारांपैकी 1298 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाभूळगाव येथे 1062 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वणी येथे 1744 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर, पुसद येथे 1545 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर महागाव येथे 1515 मतदानाचा हक्क बजावला.
परभणीत थेट महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत आहे इथे उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय जाधव,आमदार राहुल पाटील,काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांच्या विरोधात भाजप नेते आनंद भरोसे असा सामना आहे.
गंगाखेड - गंगाखेड मध्ये रासप आमदार रत्नाकर गुट्टे,राष्ट्रवादीचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांचे महाविकास आघाडीचे पॅनल व भाजप नेते संतोष मुरकुटे यांचा पॅनल अशी तिरंगी लढत आहे.
जिंतुर,सेलु आणि बोरी येथे थेट भाजप आमदार मेघना बोर्डीकर विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पॅनल मध्ये लढत आहे.
पूर्णा - रासप,भाजप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा पॅनल आहे.
ताडकळस - येथे काँग्रेस विरुद्ध भाजप आणि काही मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत त्यामुळे उठे तिरंगी लढत होतेय..
परभणीत थेट महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी लढत आहे इथे उद्धव सेनेचे खासदार संजय जाधव,आमदार राहुल पाटील,काँग्रेसचे आमदार सुरेश वरपूडकर यांच्या विरोधात भाजप नेते आनंद भरोसे असा सामना आहे.
गंगाखेड - गंगाखेड मध्ये रासप आमदार रत्नाकर गुट्टे,राष्ट्रवादीचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे यांचे महाविकास आघाडीचे पॅनल व भाजप नेते संतोष मुरकुटे यांचा पॅनल अशी तिरंगी लढत आहे.
जिंतुर,सेलु आणि बोरी येथे थेट भाजप आमदार मेघना बोर्डीकर विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पॅनल मध्ये लढत आहे.
पुर्णा - रासप,भाजप यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा पॅनल आहे.
ताडकळस - येथे काँग्रेस विरुद्ध भाजप आणि काही मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत त्यामुळे उठे तिरंगी लढत होतेय..
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण मतदान
बारामती - 97.37 टक्के
नीरा - 99 टक्के
दौंड - 99 टक्के
इंदापूर - 96.23 टक्के
इंदापूर, बारामती, दौंड आणि नीरा बाजार समितीचां निकाल उद्या, उद्या सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार.
APMC Election 2023 : भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 14 संचालक निवडीसाठी महविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना युतीमध्ये थेट होत असलेल्या चुरशीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजता दरम्यान भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रात मतदानास सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला.18 संचालक निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यानंतर व्यापारी आणि आडते गटातील दोन तर हमाल तोलारी गटातील एक आणि सेवा संस्था गटातील एक असे चार सदस्य बिनविरोध निवड गेल्याने या निवडणुकीत सेवा संस्था गटातील 10 तर ग्रामपंचायत गटातील 4 अशा 14 गटातील संचालक निवडी करता मतदान होणार आहे. त्यासाठी एकूण 30 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सेवा संस्था मतदानासाठी एक तर ग्रामपंचायत मतदाना साठी चार असे एकूण पाच मतदान केंद्र बनविण्यात आले आहेत. त्यासाठी सेवा संस्था गटातील 339 तर ग्रामपंचायत गटातील 1138 मतदार मतदान करणार आहेत. या ठिकाणी कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. यासाठी विशेष दक्षता घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
APMC Election 2023 : अहमदनगर बाजार समिती निवडणुकीसाठी शहरातील आनंद विद्यालय गुलमोहर रॉड येथे मतदान होत आहे. या दरम्यान भाजप नेते शिवाजी कर्डीले गटाची एक बस मतदारांना घेऊन मतदान केंद्राच्या आवारात आल्याने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते हमारी तुमरी आल्याने चांगलाच उडाल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक नेत्यांनी एकमेकांची समजूत काढत वाद मिटवला. मतदारांना आणलेले वाहन पोलिसांनी बाहेर काढल्याने महाविकास आघाडीचे नेते शांत झाले.
मुंडे बहीण भावांची पाच सेकंदांची धावती भेट ; हास्य विनोद आणि दोघांनीही दोघांना केला नमस्कार
परळी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान होत असून या निवडणुकीसाठी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पॅनल मध्ये अटीतटीची लढत होत आहे
ही निवडणूक अटीतटीची होत असली तरी आज मतदान केंद्रावर मात्र एक सुखद घटना पाहायला मिळाली
सकाळपासूनच धनंजय मुंडे हे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी बुथवर ठाण मांडून बसले आहेत तर दुसरीकडे पंकजाताई मुंडे ह्या ही बूथ ला भेट देत फिरत आहेत
परळी येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा या मतदान केंद्रावर आज या दोन बहिण भावांची सहा सेकंदाची धावती भेट झाली. दोघांनीही एकमेकांना हास्यविनोद करत नमस्कार घातला
अटीतटीच्या या निवडणुकीत मुख्य नेते आपली खुशाली विचारतात हे पाहून दोन्ही गटातील कार्यकर्तेही चांगलेच सुखावले
Jalgaon APMC Election : कृषी उत्पन्न बाजार समिती मतदान प्रक्रियेत चाळीसगावमधील कन्या शाळेच्या मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. महविकस आघाडीचे काही उमेदवार आणि शिंदे भाजप गटाचे काही उमेदवार हे मतदान केंद्र परिसराच्या शंभर मीटर परिसरात घुसत असल्यानं पोलिसांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी लाठी चार्ज केल्याचं पाहायला मिळालं.
Parbhani : परभणी जिल्ह्यातील सात बाजार समित्यांसाठी सर्वत्र शांततेत मतदान पार पडलं आहे.
सकाळी आठ ते 12 दरम्यान झालेल्या मतदानाची टक्केवारी
परभणी - 8.32 टक्के
गंगाखेड - 5.55 टक्के
जिंतुर- 26.66 टक्के
सेलु-12.01 टक्के
पुर्णा- 15.08 टक्के
बोरी-26.51 टक्के
ताडकळस- 18.13 टक्के
Nana Patole on APMC Election : : शेतकऱ्यांमध्ये आणि गरिबांमध्ये भाजप विरोधात मोठा राग बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बाजार समितीचा हा निकाल काँग्रेसच्या बाजूने बघायला मिळणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केला आहे. आमची लढाई कुठल्याही व्यक्ती बरोबर नाही. ज्या प्रमाणे भाजपनं शेतकऱ्यांना फसवलं, गरीबांना फसवलं, त्यांची वाताहत केली. त्याच्या विरोधात हे मतदान आहे. यामुळेच काँगेसच्या बुथवर गर्दी आहे मात्र विरोधकांच्या बुथवर गर्दी नाही. याचाच अर्थ लोकांचा कल काँग्रेसच्या प्रती पाहायला मिळते. ज्या प्रमाणे महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारच्या खोट्या धोरणा विरोधामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. उद्योगपत्यांसाठी हे सरकार चालते असं चित्र बघायला मिळत आहे. आणि या सर्व परिस्थितीमुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये गरिबांमध्ये मोठा राग बघायला मिळत आहे. म्हणून ही निवडणूक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भाजपचा पराजय करण्याचा शेतकऱ्यांनी आणि गरिबांनी निर्णय घेतला आहे. म्हणून हा जो कौल राहणार आहे, तो महाराष्ट्रातील बाजार समितीचा हा निकाल काँग्रेसच्या बाजूने बघायला मिळणार आहे.
Nashik APMC Election : आशिया खंडातील सर्वात मोठी जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत मतदान सुरू झालं आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पाठबळ असलेले मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर आणि नाशिक जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे या दोन्ही पॅनल प्रमुखांनी लासलगाव बाजार समितीवर आपलेच वर्चस्व राहणार असून एकहाती सत्ता येण्याचा दावा केला आहे.
Buldhana : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मतदान केंद्रावर मतदारांना आनण्यावरून भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणून मतदान सुरळीत केल आहे. यावेळी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
Dhule APMC Election : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यादरम्यान आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी धुळ्यातील महाराणा प्रताप प्राथमिक विद्यामंदिर या मतदान केंद्रावर 93 वर्षीय सोजाबाई वेडू पाटील या वृद्ध आजींनी पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावला. आपल्या मुलाच्या मदतीने 93 वर्षीय आजीबाई या आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचल्या. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा हक्क बजावण्यासाठी मतदारांची मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी देखील केल्याचे बघायला मिळाले आहे, यावेळी मतदान केंद्राच्या बाहेर लांबच लांब रांगा या मतदारांच्या बघावयास मिळत असून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर 16 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
Parali APMC Election : मार्केट कमिटीची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक असते. मात्र, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मुंडे बंधू भगिनींची मोठी प्रतिष्ठा पणाला लावण्याचं चित्र परळीत पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे दोन तासापासून मार्केट कमिटीच्या निवडणुकीसाठी परळी शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मतदान केंद्रावर तळ ठोकून बसले आहेत. तर दुसरीकडे पंकजा मुंडेसुद्धा याच मतदान केंद्रावर तळ ठोकून बसल्या आहेत.
Pune : पुण्यातील हवेली बाजार समितीत बाजार समितीच्या निवडणुकीवेळी बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळालं. पोलिस आणि मतदारांमध्ये बाचाबाची झाली. बोगस मतदान होत असल्याचा आरोप मतदारांनी केला होता. भाजप आणि मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
APMC Election : संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांचे एक अनोख दृश्य दिसून आलं. राजापूर गावचे मतदार महिला आणि पुरुष हे सर्वजण डोक्याला फेटा बांधून मतदानाला आले. आम्ही सर्व आमच्या नेतृत्वाच्या पाठीशी आहोत आणि एकजुटीने आम्ही त्यांच्यासाठी मतदान करतो हे दाखवण्यासाठी आम्ही फेटे बांधले असे मनोगतही या मतदारांनी बोलून दाखवलं. आपण नेहमी मतदानाला आलेले मतदार पाहतो मात्र फेटे बांधून आलेल्या महिला व पुरुष मतदारांनी सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं होतं. हे सगळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक होते.
Pune APMC Election Update : पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत बनावट मतदान होत असल्याच्या आरोपांमुळे शुक्रवार पेठेतील शिवाजी मराठा महाविद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर प्रचंड गोंधळ सुरू झाला होता.
APMC Election : अहमदनगर बाजार समितीच्या निवडणुकीवेळी मविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बचाबाची झाली. मतदारांना घेऊन येणाऱ्या बस मविआच्या कार्यकर्त्यांनी रोखल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला.
Hingoli APMC Election : हिंगोली जिल्ह्यातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी हिंगोली आणि जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 17 जागांसाठी 40 उमेदवार मैदानात आहेत. प्रतिष्ठेची मानली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भाजप काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट या पक्षांनी एकत्र पॅनल तयार करुन ही निवडणूक लढवली जात आहे या निवडणूक काळामध्ये भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर मतदान केंद्रावर तळ ठोकून आहेत .
Baramati APMC Election : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी पावसानं हजेरी लावल्यानं मतदारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बारामतीसह पुरंदर भागात देखील पावसानं हजेरी लावली आहे. बारामतीत 17 जागांसाठी मतदान होत आहे. तर इंदापूरमध्ये 14, दौंड मध्ये 18 तर नीरामध्ये 16 जागांसाठी हे मतदान होत आहे. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. पण पावसाने हजेरी लावण्यानं मतदारांची तारांबळ उडाली आहे. या निवडणुकीत अजित पवार, राहुल कुल आणि विजय शिवतारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Yavatmal APMC Election : यवतमाळ जिल्ह्यात आज 7 बाजार समित्यांसाठी मतदान सुरु झालं आहे. नेर बाजार समितीच्या मतदान केंद्रावर नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क. आकाश राजेश तोंडरे (रा. पाथ्रड ता. नेर) यांचे आज वर्धा जिल्ह्यातील शिरजगाव येथे लग्न झाले. त्याआधी मतदानाचा हक्क बजावला.
Buldana : बुलढाणा जिल्ह्यातही आज पाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. सकाळी आठ वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मोठ्या संख्येत सकाळपासूनच मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत. ग्रामसेवा सहकारी सोसायटी मतदारसंघ, व्यापारी मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदार संघ आणि हमाल मापारी मतदारसंघासाठी वेगवेगळ्या मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळपासूनच मोठ्या संख्येत या ठिकाणी चारही मतदारसंघातील मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर दाखल होत आहेत. दुपारी चार पर्यंत संपूर्ण मतदान प्रक्रिया राबवली जाईल आणि त्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात केली जाईल.. त्यामुळे आजच हे संपूर्ण बाजार समिती निवडणुकीतील मतदानाचे निकाल रात्री उशिरापर्यंत हाती येऊ शकतात. बुलढाणा, खामगाव, मलकापूर ,मेहकर, देऊळगाव राजा या पाच बाजार समितीसाठी होत आहे मतदान.
Dhule APMC Election : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या असून उत्स्फूर्त प्रतिसाद या निवडणुकीला मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी विशिष्ट गटाकडून गाड्यांची सोय देखील करण्यात आली असून सुरक्षित वातावरणात मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यात येत आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शहरातील महाराणा प्रताप विद्यालयात मतदान सुरू असून या ठिकाणी एका गटाकडून मतदारांना पक्षाचे चिन्ह सांगून मतदान करण्याचे आवाहन केले जात असताना यावरून दुसऱ्या गटाने त्यांना विरोध केला असता यावेळी या ठिकाणी शाब्दिक चकमक उडाली, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच आवर घालत त्यांच्यातील वाद मिटवला. मतदान केंद्रावर मतदारांसोबत कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Jalgaon APMC Election : जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत हमाल मापारी उमेदवार देवेंद्र सोनावणे यांनी मतदार यादीत बोगस मतदार असल्याचं दोन दिवस पूर्वी आरोप केला होता त्या नंतर आज हे बोगस मतदार मतदान करत असल्याचा आरोप करत त्यांना रोखण्यात यावे यासाठी जळगाव शहरातील नूतन मराठा मतदान केंद्रावर येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात करून मतदान रोखण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावले आणि मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरळीत पणामे पार पडली आहे
Beed APMC Election : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. परळीच्या मतदान केंद्रावर माजी मंत्री धनंजय मुंडे सकाळी 8 वाजल्यापासून मतदान केंद्रावर तळ ठोकून आहेत. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून दिवसभर इथेच थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुंडे बहीण भावातील संघर्ष पुन्हा एकदा दिसून येतोय. ही निवडणूक दोघांनीही अत्यंत प्रतिष्ठेची केलेली दिसून येत आहे.
Beed APMC Election : बीड जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांसाठी आज मतदान होतंय या सहापैकी बीड बाजार समिती वगळता इतर सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष पाहायला मिळतोय परळी मध्ये मात्र पुन्हा एकदा पंकजा मुंडे समर्थक विरुद्ध धनंजय मुंडे समर्थक असा मोठा संघर्ष पाहायला मिळतोय याच परळी बाजार समितीच्या मतदानाचा आढावा घेतला आहे गोविंद शेळके यांनी
Nandurbar APMC Election : नंदुरबार जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सकाळी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून येत आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तळोदा या दोन कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध झाल्या आहेत. तर अक्कलकुव्यातील 17 पैकी 15 जागा बिनविरोध झाल्यानं दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. तर नंदूरबार, नवापूर, शहादा या ठिकाणी मोठी चुरस बघायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागले आहे.
Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह 12 बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू...
- जिल्ह्यातील लासलगाव, येवला, नांदगाव, मालेगाव आदी ठिकाणी पाहायला मिळणार चुरस...
- निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज...
- उमेदवार व कार्यकर्त्यांची मतदान केंद्राबाहेर गर्दी...
- पोलिसांचाही चोख बंदोबस्त...
Dhule APMC Election : धुळे आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. सकाळपासून मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा लागल्या असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धुळे आणि दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 16 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत असून या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Nagpur APMC Election : नागपूर जिल्ह्यातील 13 कृषी उत्पन्न बाजार समित्यापैकी 6 बाजार समितीच्या निवडणुका वर्षभर पूर्वी झाल्या आहेत. आता 7 बाजार समितीच्या निवडणूक होत आहे.
त्यापैकी सावनेर बाजार समितीवर केदार गटाने बिनविरोध बाजी मारली आहे. निवडणुका होऊ घातलेल्या सातपैकी सहा बाजार समित्या काँग्रेसच्या ताब्यात होत्या. केवळ उमरेड बाजार समिती भाजपच्या ताब्यात होती. आता निवडणुकांसाठी माजी मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे, तर भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात स्थानिक नेत्यांवर जबाबदारी दिली आहे. सहापैकी रामटेक,कुही-मांढळ आणि पारशिवनी या 3 बाजार समित्यांची निवडणूक होत आहे. रामटेक बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसमध्ये 2 गट पडले आहेत.
Jalgaon APMC Election : जळगाव जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांसाठी आज मतदान होत आहे. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी पक्षाचं आणि नेत्यांचं वर्चस्व दाखवणारी असल्याने प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी या बाजार समित्या आपल्याच ताब्यात रहाव्या यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्यानं बोदवड मुक्ताईनगर बाजार समितीसाठी एकनाथ खडसे आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पॅनलमध्ये चुरस आहे. तर दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव मतदारसंघात त्यांच्या शिंदेगटाच्या आणि भाजपाच्या सहकार पॅनलला घेरण्यासाठी महाविकास आघाडीकडून माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतीश पाटील, गुलाबराव वाघ अशा नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून संजय गरुड यांनी आव्हान दिलं आहे. पाचोरा बाजार समितीमध्ये शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपली ताकद पणाला लावली आहे.
APMC Election : कोरोना प्रादुर्भावामुळं दोन वर्ष उशिरा होत असलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 14 पैकी सात कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान होत असून, यामध्ये अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात राधाकृष्ण विखे पाटील यांनी पॅनल उभा करत आव्हान दिलंय. तर पारनेरमध्ये कट्टर विरोधक असलेले आमदार निलेश लंके आणि विजय औटी हे एकत्रित आल्याने सुजय विखेंसमोर मोठं आव्हान उभा राहिलंय. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवाजी कर्डिले यांचे विरोधात माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर कर्जतमध्ये भाजपचे राम शिंदे यांच्या विरोधात रोहित पवार यांनी पॅनल उभा केला आहे. आज होणाऱ्या सात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच थेट लढत होत आहे. त्यामुळं या बाजार समित्यांवर कोणाचं वर्चस्व राहणार हे लवकरच स्पष्ट होईल.
पार्श्वभूमी
Maharashtra APMC Election 2023 Live Updates : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी (Agricultural Market Committee Election) आज मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळं आज या निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजुने कौल टाकणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला
सर्वच राजकीय पक्षांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान, कुठे बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे तर कुठे निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा समना होत आहे. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत आहेत.
ग्रामीण भागात कोणाचं वर्चस्व हे 30 एप्रिलला समजणार
राज्यातील 257 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक लागली आहे. यामधील काही बाजार समितीत्या बिनविरोध देखील झाल्या आहेत. बाजार समित्यांसाठी आज (28 एप्रिल) मतदान होणार आहे. तर 30 एप्रिलला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळं ग्रामीण भागात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे हे आपल्याला 30 एप्रिललाचं समजणार आहे.
बऱ्याच ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत
स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि शिवसेना-भाजप अशी लढती होणार आहेत. तर काही ठिकाणी काही पक्ष स्वतंत्र ताकद अजमावत असल्याचे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न केले. प्रचाराच्या सभा, संपर्क मोहीम यासह सर्व पद्धतीने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच पक्षाच्या पॅनलकडून केला गेला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -