Nashik Fire : नाशिकमध्ये फर्निचरमॉलसह स्क्रॅप गोदामाला आग, कामगारांनी पळ काढल्याने सुखरूप
Nashik Fire : नाशिक (Nashik) शहराजवळील वडनेर-पाथर्डी रस्त्यावरील एका फर्निचर मॉलसह (Furniture Mall)गोदामाला पहाटे भीषण आग (Fire) लागली.
Nashik Fire : नाशिक (Nashik) शहराजवळील वडनेर-पाथर्डी रस्त्यावरील एका फर्निचर मॉलसह (Furniture Mall) त्या शेजारी असलेल्या भंगार मालाच्या गोदामाला आज पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास भीषण आग (Fire) लागली. यावेळी मॉलमध्ये झोपलेले आठ ते दहा कामगार सुदैवाने वेळीच जागे झाल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या आगीमध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे.
नाशिक शहरातील वडनेर पाथर्डी रोड परिसरात एका भंगार वजा फर्निचरच्या गोडाऊनला पहाटे भीषण आग लागल्याने संपूर्ण दुकानच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत अग्निशामनदालाची जवान आग विझवण्यासाठी परिश्रम घेत होते. नाशिक शहरा जवळील वडनेर दुमाला येथील पाथर्डी रोडवरील जय भवानी पेट्रोल पंपच्या पुढे जुना प्लास्टिक भंगार व जुने फर्निचरचे मोठे गोडाऊन आहे. या ठिकाणी जुने भंगार, प्लास्टिक जमा करण्यात येत असते व मोठमोठ्या मॉल मधून स्क्रॅप मटेरियल या ठिकाणी आणून त्याच्यावर प्रक्रिया करून ते विकण्याचा व्यवसाय केला जातो
दरम्यान आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास या गोडाऊनच्या काही भागातून धुराचा वास शेजाच्या रहिवाशांना येऊ लागला. काही शेजारी बाहेर येऊन पहिले असता तर फर्निचर गोदामाला आग लागल्याचे निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ 100 व 102 नंबर वर संपर्क साधत अग्निशामन मुख्यालयाला ही माहिती कळवली. दरम्यान नाशिक रोड अग्निशामन केंद्राला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी सुरुवात केली. मात्र आगेची भीषणता लक्षात घेऊन नाशिक शहरातील पंचवटी, के के वाघ, नाशिक शहर मुख्यालय, सिडको, सातपूर या अग्निशामन मुख्यालयाहून सात बंब घटनास्थळी दाखल झाले.
तर फर्निचरला आग लागल्या नंतर जवळच अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. या घरांना देखील आगेची झळ बसत होती. स्थानिकांनी तात्काळ त्यांना झोपेतून जागी करत घराबाहेर काढले. तसेच घरातील गॅस सिलेंडरचा हाताला लागेल त्या गरजेच्या वस्तू देखील घराबाहेर काढत जिवाच्या आकांताने घराबाहेर पळ काढला. फर्निचरचे गोडाऊन हे जुने असल्याने व काही लाकडाचे साहित्य असल्याने आगीने अधिकच पेट घेतला होता. गोडाऊनचे पत्रे जुनाट फर्निचरवर पडल्याने पत्रे बाजूला करणे आवश्यक होते. त्यामुळे आग विझवताना अडचण निर्माण झाली होती. तात्काळ जेसीबीच्या साह्याने पत्रे बाजूला करत आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.