एक्स्प्लोर

राजकारणात महाजनांनाही त्रास होतो : पूनम महाजन

प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षात राजकीय त्रासाला सामोरं जावं लागल्याची मोठी चर्चा होती. मात्र, खुद्द प्रमोद महाजनांच्या मुलीलाही भाजपातील अंतर्गत त्रासाचा सामना करावा लागला, असा गौप्यस्फोट पूनम महाजन यांनी केला.

पंढरपूर : दिवंगत नेते प्रमोद महाजन हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मात्र त्यांच्यानंतर खुद्द महाजन कुटुंबालाही अनेक त्रासाला सामोरं जावं लागलं, अशी खंत भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केली. ‘पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमी’च्या वतीने विष्णुपंत पारनेरकर महाराज  यांच्या हस्ते पूनम महाजन यांना युवक क्रांतिवीर पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला. प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षात राजकीय त्रासाला सामोरं जावं लागल्याची मोठी चर्चा होती. मात्र, खुद्द प्रमोद महाजनांच्या मुलीलाही भाजपातील अंतर्गत त्रासाचा सामना करावा लागला, असा गौप्यस्फोट पूनम महाजन यांनी केला. ''वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदा 2009 साली लोकसभेचं तिकीट कापलं गेलं. नंतर विधानसभा निवडणुकीत नको असलेल्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. यात पराभूत झाल्यावर सगळ्यांनीच डावललं. मात्र यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघात खूप तयारी केली, तेथून तिकिटच कापण्यात आलं. मग मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्यावर अडचणीच्या मतदारसंघात उमेदवारी दिली. मदत मागून कुणीही मदतीला न आल्यावर आपण या मतदारसंघात नवीन टीम तयार करून जिद्दीने निवडणूक लढवली आणि जिंकली,'' अशा शब्दात पूनम महाजन यांनी आपल्याच पक्षाकडून झालेल्या अन्यायाबाबत खंत व्यक्त केली. वडिलांच्या पुण्याईने आणि शिकवणीमुळे त्या विजयानंतर आपण कधी मागे वळून पहिलंच नसल्याचं पूनम महाजन यांनी सांगितलं. वडिलांना गोळ्या घातल्यावर त्यांच्या डोळ्यातील त्यावेळचे आश्चर्याचे भाव आपण अजूनही विसरू शकत नसल्याचं सांगत वडिलांचे मोठेपण आता देशभर फिरताना पदोपदी जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे नाराज असल्याचं कधी जाणवलं नाही : पूनम महाजन दरम्यान, एकनाथ खडसे भाजपवर नाराज आहेत का, या प्रश्नावरही पूनम महाजन यांनी उत्तर दिलं. ते नाराज असल्याचं आपल्याला कधीही जाणवलं नसून उलट त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून न्याय द्यावा, असं पूनम महाजन यांनी सांगितलं. राज्यातील भाजपचे सर्वात मजबूत संघटन असलेला जळगाव हा एकमेव जिल्हा असल्याचंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Embed widget