फक्त सहा टक्के मतं कमी केली की तुमचं सरकार गडगडणार, महादेव जानकरांचा इशारा
काँग्रेसला वाटत होतं या राज्यातील सत्ता जाणार नाही पण घालवणारे आम्हीच होतो असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले.
Mahadev Jankar : काँग्रेसला वाटत होतं या राज्यातील सत्ता जाणार नाही पण घालवणारे आम्हीच होतो असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले. आता जरी ह्या मुख्यमंत्र्यांना वाटत असेल आमच्या सरकारचं कोणी काय करु शकत नाही, तर याद राखा. आम्ही दोघं (बच्चू कडू आणि महादेव जानकर) महाराष्ट्रभर फिरतोय. तुमची सहा टक्के जर मत कमी केली तर तुमचं सरकार गडगडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जानकर यांनी सरकारला दिला.
येत्या 23 किंवा 24 तारखेला आम्ही सांगोल्याला एक मोठी परिषद घेणार आहोत. 30 ते 35 हजार लोक जमतील याचा बंदोबस्त करत असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, रासप आम्ही ताकद दाखवली आहे. माणसं कमी असतील
आम्ही पाच माणसांपासून सरकार बदललीत त्यामुळं काळजी करण्याचं कारण नाही असे जानकर म्हणाले. मी आणि बच्चू भाऊ काल चंद्रपूरला होतो, आम्ही रात्रीचा प्रवास करून आलो आहे. बिलकुल खचून जाण्याचं काम नाही असे जानकर म्हणाले.
मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असे सांगत होते
भल्या भल्याचं सरकार आम्ही उलटी केली आहेत. त्यामुळे ह्यांचं पण उलटायला वेळ लागणार नाही. पण तुम्ही जागे व्हा ही विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय असे जानकर म्हणाले. मुख्यमंत्री विधानसभेत मोठी मोठी भाषण करत होते, आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, कोरा कोरा कोरा असे म्हणत होते. आपण अभ्यास करा पण सातबारा कोरा झाला का? त्याचं चिंतन करा. आम्ही 31 जिल्ह्यात बांधावर जाऊन आलो आहे. एसीत बसलो नाही असे जानकर म्हणाले.
सरकारनं शेतकऱ्यांच्या नावावर मत घेऊन राज्य भरले
लोकांमध्ये फिरण्याचं काम जाग करण्याचं काम आम्ही करतोय. ते इलेक्शनच्या वेळेस मत मागण्यासाठी येतात गोड गोड बोलतात. दुधाला दर ऊसाला दर कापसाला दर द्या म्हणलं तर ते तयार नसतात. यांचं कुठं आपण चिंतन आणि म्हणन करावं. ह्या सरकारनं शेतकऱ्यांच्या नावावर मत घेऊन राज्य भरले आहे. सोयाबीन एकर लावायचं असेल तर 22 हजार रुपये खर्च येतो. काल सरकार साडेआठ हजार रुपये देतो म्हणाले. 22000 खर्च येतो साडेआठ हजार देतो म्हणाले. एकर जमीन जर नदीकाठची वाहून गेली तर भरण्यासाठी सहा लाख खर्च येतो, या सरकारने 47 हजार रुपये दिले आहेत, असे म्हणत जानकरांनी सरकारवर टीका केली.
पश्चिम महाराष्ट्रातील नेते ढगे झाले शेतकरी भिकारी झाले आहेत. ज्या तालुक्याचा आमदार प्रत्येक 5 वर्षाला बदलतो तो तालुका हुशार असल्याचे जानकर म्हणाले. ज्या तालुक्याचा आमदार 35 वर्षे राहतो तो तालुका गुलाम असेही जानकर म्हणाले. मी दूध विकास मंत्री होतो तेव्हा सर्वात जास्त दुधाला दर भारतात मी दिला होता. तुमचं दुःख आहे ते आमचं दुःख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडला होता तेव्हा महाराजांनी सगळ्यांचा पगार बंद केला होता. जनतेला सुखी ठेवण्याचं काम केलं होतं. आत्ताच सरकार शिवरायांचे नाव घेते आणि राज्य कोणाचं चालवतोय असे जानकर म्हणाले.























