एक्स्प्लोर
..तर मी शंभरी साजरी करेन, मा.गोंचं राज ठाकरेंना उत्तर
नागपूर : रा. स्व. संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्यावर टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मा. गो. यांनी मार्मिक उत्तर दिलं आहे. मला मारायचं असेल तर पिस्तुल घेऊन यावं अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.
मा. गो. वैद्य यांना महाराष्ट्र म्हणजे वाढदिवसाचा केक वाटला का, त्यांची पृथ्वीपासून स्वतंत्र होण्याची वेळ आली आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर उत्तर देताना 'देशात लोकशाही आहे, त्यानुसार प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. माझं वय जास्त आहे आणि सर्वांनाच एके दिवशी जायचंय. मात्र मला 100 वर्ष जगण्याची इच्छा आहे. आता त्याआधीच जर मला मारायचं असेल
तर पिस्तुल घेऊन यावं' अशा शब्दात मा. गो. वैद्यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं.
93 वर्षांचे मा. गो. वैद्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आहेत. गेल्या आठवड्यातच त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी राज्याचे 4 तुकडे करा, असं मत मांडलं होतं. ज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र अशी विभागणी होती. त्यावरुनच राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात घणाघाती टीका केली होती.
संबंधित बातम्या :
अमित शाह सुटले, मग राम मंदिर कोर्टात का अडकलं : राज ठाकरे
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement