एक्स्प्लोर

लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार; पाच आरोपींना अटक, तीन फरार, शोध सुरु

लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकून हल्लेखोरांनी काही प्रवाशांना लुटलं आणि एका महिलेवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई: सामुहिक बलात्काराच्या घटनेनं महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरलाय. साकीनाका, डोंबिवलीच्या घटनांच्या जखमा अजूनही भळभळत असताना आणखी एक धक्का आपल्या पुरोगामित्वाला बसलाय. यावेळी क्रौर्याची परिसीमा ओलांडली असून तीही चक्का धावत्या ट्रेनमध्ये. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकून हल्लेखोरांनी काही प्रवाशांना लुटलं आणि एका महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. इगतपुरी-कसारा स्थानकादरम्यानची काल रात्री 8 वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. आठ दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटलं आणि 20 वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकणी आतापर्यंत कल्याण रेल्वे पोलिसांनी पाच आरोपी अटक ,तीन फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मधून मुंबईत येत असणाऱ्या पुष्पक ट्रेनमध्ये दरोडेखोरांकडून लूट आणि एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पुष्पक ट्रेन लखनऊवरून मुंबईच्या सीएसएमटीला येत होती. त्यामध्ये आठ दरोडेखोरांकडून लुट आणि एका महिलेवर बलात्कार करण्यात आला. 

ट्रेन इगतपुरी ते कसारा दरम्यान आली तेव्हा हा प्रकार घडला.  हे सर्व आरोपी घोटी इगतपुरीमध्ये ट्रेनमध्ये चढले. कल्याण रेल्वे पोलिसांनी पाच आरोपी अटक ,तीन फरार आरोपींचा शोध सुरु आहे.  घटना इगतपुरीमध्ये घडली आहे.  या आठ जणांनी बोगी मधील एकूण 15 ते 20 जणांना लुटलं.  चार लोकांकडून रोख रक्कम लुटली तर 9 जणांचा मोबाईल हिसकावून घेतला. 

तसेच ट्रेनमध्ये उत्तर प्रदेशमधून मुंबईत कामासाठी येत असणाऱ्या नवदाम्पत्यावर हल्ला करत 20 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेचा पती आणि एका प्रवाशाने जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण या आरोपीनी त्यांना जबर मारहाण केली. . या 8 आरोपींपैकी 7 इगतपुरीमध्ये राहणारे आहेत तर 1 मुंबईच्या मालवणी मध्ये राहणार होता.    

मुंबईमध्ये राहणार आरोपी व्यसन करत होता ज्यामुळे त्याला घरच्यांनी घराबाहेर काढलं आहे. तो घर सोडून घोटीमध्ये राहणाऱ्या इतर मित्रांसोबत राहत होता. हा गुन्हा नशेमध्ये केला असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 3 आरोपी अजून ही फरार आहेत ज्यांचा शोध पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Desaiganj Accident: सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेच्या जबर धक्का; दोन सख्या भावांचा जागीच दुर्दैवी अंत; गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये खळबळ
सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेचा जबर धक्का, संख्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या भावाचाही जागीच दुर्दैवी अंत, गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये शोककळा
Nashik Crime News: नाशिकमध्ये मोठा घोटाळा, तब्बल 22 मृत रुग्णांवर 6 वर्षांनी दाखवले उपचार; 2 कोटींचा चुना लावणाऱ्या 3 हॉस्पिटल्सवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये मोठा घोटाळा, तब्बल 22 मृत रुग्णांवर 6 वर्षांनी दाखवले उपचार; 2 कोटींचा चुना लावणाऱ्या 3 हॉस्पिटल्सवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत घडामोडींना वेग, युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, CJPची ट्वीट करुन माहिती
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत घडामोडींना वेग, युट्यूबर ध्रुव राठी पोलिसांच्या ताब्यात, CJPची ट्वीट करुन माहिती
Embed widget