एक्स्प्लोर

लॉकडाऊन काळात राज्य सरकारनं नागरिकांना मदतीसाठी एक पैसाही दिला नाही : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. केंद्र सरकारने तर वीस लाख कोटींचं पॅकेज दिला होता, मात्र महाराष्ट्र राज्याने एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही, असं फडणवीस म्हणाले. 

नागपूर : महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात लॉकडाऊन केल्यानंतर नागरिकांना मदत केलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर फडणवीस यांनी वेगवेगळ्या देशांनी घोषित केलेल्या मदतीच्या पॅकेजबाबत ट्वीट करुन माहिती दिली होती. त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे पॅकेज किंवा मदत ही  तिथल्या केंद्र सरकारांनी केलेली आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून अशी टीका केली होती. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. केंद्र सरकारने तर वीस लाख कोटींचं पॅकेज दिला होता, मात्र महाराष्ट्र राज्याने एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही, असं फडणवीस म्हणाले. 

ते म्हणाले की, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले, मला तर समजतच नाही की ते का केले. कारण त्यामध्ये कुठल्याही उपाययोजना नव्हत्या, कुठलेही निर्णय नव्हते. तज्ञांशी बोलू दोन दिवसानंतर सांगू असेच मुद्दे त्यांनी मांडले. लॉकडाऊन करताना त्याकाळात काळात नागरिकांना कशा पद्धतीने मदत केली जाईल हे सांगणे गरजेचे आहे, असं फडणवीस म्हणाले. 

फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन केला होता तर प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली होती. त्यांच्यासाठी काही न काही उपाययोजना केल्या होत्या प्रत्येक नागरिकांच्या घरी अन्नधान्य पोहोचेल अशी व्यवस्था केली होती खात्यात पैसे जाईल असे नियोजन केले होते, असं ते म्हणाले. राज्य सरकार ने पॅकेज न देता फक्त लोकांची वीज कापली लोकांना त्रास दिला, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. 

महत्त्वाच्या बातम्या

Shahaji Bapu Patil: अशोक खरात सारख्या महाराजांच्या बापाचाही मी बाप; महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल चित्रपटात घोटाळा, कारण...; सांगोल्यातील शिवसेना मेळाव्यात शहाजीबापूंची तुफानी फटकेबाजी
अशोक खरात सारख्या महाराजांच्या बापाचाही मी बाप; महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल चित्रपटात घोटाळा, कारण...; सांगोल्यातील शिवसेना मेळाव्यात शहाजीबापूंची तुफान फटकेबाजी
Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi In Mumbai Thane Pune 2026: गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
Maharashtra Residential Schools:नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget