एक्स्प्लोर
सोन्याचा मुलामा असलेला एकविरा देवी मंदिराचा कळस चोरीला
या कळसाला सोन्याचा मुलामा होता. साधारण सव्वा लाख रुपये किमतीचा हा कळस होता. एका भक्ताने हा कळस दान दिला होता.
लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान अशी ओळख असलेल्या लोणावळ्याजवळील कार्ला गडावरील एकविरा देवी मंदिराचा कळस चोरीला गेला आहे. वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकविरा देवी ही आदिशक्ती आहे.
कार्ला गडावर मध्यरात्री कळसाची चोरी झाली. या कळसाला सोन्याचा मुलामा होता. साधारण सव्वा लाख रुपये किमतीचा हा कळस होता. एका भक्ताने हा कळस दान दिला होता, अशी माहिती एकविरा देवी मंदिराचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते अनंत तरे यांनी दिली आहे.
या मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, एकवीरा देवीच्या दर्शनासाठी मुंबई, ठाण्यातून अनेक भाविक दरवर्षी दर्शनाला जात असतात. विशेष म्हणजे एकविरा देवी हे ठाकरे कुटुंबाचं कुलदैवत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement