एक्स्प्लोर

मावळमधील उमेदवार पार्थ पवार, श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पैसे वाटणाऱ्या दोघांना अटक

दोघांविरोधातही मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी खांदेश्वर पोलिसांनी कलम 171 (इ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई : पनवेलमधील देवेद आणि सुकापूरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारासाठी पैसे वाटप करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. निवडणूक भरारी पथकाच्या फिर्यादीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रताप रामचंद्र आरेकर असं सुकापूरमध्ये अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. प्रतापची झडती घेतली असता त्याच्याकडे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या नावाच्या 78 कोऱ्या व मतदारांच्या चिट्ठ्या सापडल्या. याशिवाय 5800 रुपयांची रोख रक्कम असलेले 29 खाकी पाकिटंही सापडले.

प्रत्येक लिफाफ्यात 200 रुपयांच्या नोटा असल्याचं आढळून आलं. याशिवाय त्याच्याकडे एक लाल रंगाची पिशवी होती, त्यामध्ये 178 पानी रजिस्टर व त्यात साक्षी पार्क, जन्मोत्री, गोकुळधाम सोसायटी, श्रीनिकेतन, तपोवन, मातोश्री, साईकृपा, स्वर्णभूमी, सुंदरम सोसायटी अशी नावे व सदस्यांची नावे आढळली.

तर देवेदमध्ये संजय पाटीलला अटक करण्यात आली आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या नावाच्या 23 मतदारांच्या चिट्ठ्या सापडल्या. त्याच्याकडे 2 हजार रुपयांच्या 3 नोटा, 500 रुपयांच्या 22 नोटा, 200 रुपयांच्या 5 नोटा, 100 रुपये दाराच्या 81 नोटा, तसेच रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल-भाजप सरकार कामगिरी असे लिहिलेले नोटबुक सापडले.

दोघांविरोधातही मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी खांदेश्वर पोलिसांनी कलम 171 (इ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. काल देखील कामोठे येथे पैसे वाटप करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse and Girish Mahajan: एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार का? 'त्या' निमंत्रणावर गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Maharashtra Live blog updates:अभिजी दीपकेंनी उपोषण संपवलं; तर आंदोलकांनी संसदेचं दार गाठलं
Maharashtra Live blog updates: अभिजीत दीपकेंनी उपोषण संपवलं; तर आंदोलकांनी संसदेचं दार गाठलं
कर्जाचा डोंगर अन् सततच्या नापिकीला कंटाळून पिता-पुत्रानं टोकाचं पाऊल उचललं; राबत्या शेतातच गळ्याला दोर लावत जीवन संपवलं; बुलढाणा जिल्हा हादरला!
कर्जाचा डोंगर अन् सततच्या नापिकीला कंटाळून पिता-पुत्रानं टोकाचं पाऊल उचललं; राबत्या शेतातच गळ्याला दोर लावत जीवन संपवलं; बुलढाणा जिल्हा हादरला!

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Embed widget