नागपूर : नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा एकदा टोळधाडीनं आक्रमण केले आहे. त्यामुळं जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास टोळधाड काटोल तालुक्यातील कचारी सावंगा, सोनपूर, गणेशपूर, शेकापूर आदी भागांमध्ये दाखल झाली आणि भाजीपाल्यासह हिरव्या झाडांचे नुकसान केले.याबाबत माहिती मिळताच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री 10 वाजता त्या भागात जाऊन पाहणी केली.


टोळधाडीचं संकट नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी : कृषीमंत्री

यावेळी गृहमंत्री देशमुख यांनी कृषी अधिकाऱ्यांना तातडीने फवारणी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे कमीत कमी नुकसान झाले पाहिजे यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांच्यासोबत कृषी विभाग महसूल विभाग सोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. टोळधाडीचा आक्रमणापासून होऊ शकणारे पिकांचं नुकसान कमी होण्यासाठी ग्रामस्थांनी सतर्क राहून धुर करून, फटाके फोडून वा बँड वाजवून टोळधाडीला पळवून लावण्याचा सल्लाही गृहमंत्र्यांनी दिला.

टोळधाडीचा मुंबईला धोका नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार : महापालिका


नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात टोळधाडीने शेतीचे नुकसान होत आहे. त्यापासून बचावासाठी कृषी विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, तसेच शेतकऱ्यांनीही सतर्क रहावे. अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या. शेतकऱ्यांचे पीक, फळबागा, भाजीपाला वाचू शकेल वा कमीत कमी नुकसान होईल. शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी सुद्धा टोळधाड पासून बचाव करण्यासाठी बँन्ड,फटाके याचे मोठे आवाज करावेत, मोठ्या प्रमाणात धूर करावा त्यामुळे ही टोळधाडी पासून आपण बचाव करू शकतो, असे देशमुख म्हणाले.


पाकिस्तानातील टोळधाडीची महाराष्ट्रात एन्ट्री, मध्यप्रदेशमार्गे नागपुरात पोहोचलं संकट, शेतकऱ्यांना धास्ती


राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांवर एक मोठं संकट पाकिस्तानातून आलं आहे. या टोळधाडीच्या संकटामुळे हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. आधीच कोरोनामुळे देश लॉकडाऊन असल्याने बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाहीय. त्यात हे नवीन संकट उभं राहिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.



गेलं वर्षभर राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील महत्वाची पीकं, गहू, मोहरी, कापूस, भाजीपाला पीकांचं मोठं नुकसान झालंय. साधारण साडेआठ लाख एकरवरील पिकांना याचा फटका बसला होता. देशाच्या इतिहासतील सर्वात मोठ्या नुकसानींपैकी एक घटना मानली जाते. यात सर्वाधिक नुकसान राजस्थानमध्ये 33 पैकी 16 जिल्ह्यात, तर मध्य प्रदेशातील 15 जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव झाला.
टोळधाडी बद्दल थोडक्यात माहिती

  • सहसा जून जुलैमध्ये वाळवंटातून टोळधाड भारतात घुसते. यंदा मात्र महिना दिड महिना आधीच आक्रमण केलं आहे.

  • सध्या टोळ जिथे अंडी घालतात त्या ठिकाणी फवारणी केली जात असली तरी प्रादुर्भाव वाढला तर विमानातून किंवा ड्रोनने फवारणी करण्याचा पर्यायही वापरला जाऊ शकतो.

  • ऐन खरीपाच्या तोंडावर आधीच कोरोनाची चिंता त्यात या टोळधाडीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान राज्य आणि केंद्र सरकारसमोर आहे.

  • सध्या पश्चिम आफ्रिकेच्या काही भागात, केनिया, सोमालिया, इथिओपिया, सुदान, दक्षिण इराण आणि नैऋत्य पाकिस्तानात जास्त प्रादुर्भाव आहे

  • लोकस्ट (Locusts ) म्हणजेच टोळधाड काही भागात नाकतोडे अशीही ओळख.

  • सूर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यंत टोळ आधाशीपणे पिकांवर तुटून पडतात.

  • भारताच्या इतिहासात मोठ्या नुकसान करणाऱ्या 10 टोळधाडींची नोंद आहे.

  • साधारण 35 हजार लोकं किंवा 20 उंट किंवा 6 हत्ती एका दिवसात खाऊ शकतील एवढं पीक ही टोळ धाड (अंदाजे 4 कोटी) फस्त करु शकते.

  • FAO म्हणजेच अन्न आणि शेती कृषी संघटना या टोळधाडीबाबत महत्वाची माहिती गोळा करत असते. तसंच सर्व देशांना सावध करत असते.

  • टोळधाडीबाबत सहा आठवडे आधीच संबंधित देशांना इशारा दिला जातो.