मुंबईहून श्रीवर्धनकडे पायी निघालेल्या प्रवाशाचा रस्त्यातच मृत्यू
मुंबईतील कांदिवली येथून आपल्या कुटुंबासह श्रीवर्धनकडे चालत निघालेल्या मोतीराम जाधव यांचा गुरुवारी पेण तालुक्यातील खारपाडा येथे रस्त्यातच मृत्यू झाला.

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या चाकरमानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पायी गावची वाट धरली आहे. भर उन्हात महामार्गावरून निघालेल्या चाकरमान्यांसह त्यांच्या लहान लहान लेकरांचे हाल होताना दिसत आहेत. रायगडमधी एका चाकरमान्याचं कुटुंब मुंबई ते श्रीवर्धन पायी प्रवास प्रवासात उद्ध्वस्त झाले आहे.
मुंबईतील कांदिवली येथून आपल्या कुटुंबासह श्रीवर्धनकडे चालत निघालेल्या मोतीराम जाधव यांचा गुरुवारी पेण तालुक्यातील खारपाडा येथे रस्त्यातच मृत्यू झाला. मूळचे श्रीवर्धन हादगाव येथील सात जणांचे जाधव कुटुंब मुंबईतील कांदिवली येथून चालत निघाले होते. उन्हाच्या झळा, थकलेला जीव मात्र तरीही गावी जाण्याची तीव्र इच्छा असल्याने हे कुटुंब पावले टाकत होते. गुरुवारी 80 ते 82 किलोमीटरची पायपीट केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते पेण तालुक्यातील खारपाडापर्यंत आले. एवढे अंतर चालून थकलेल्या मोतीराम जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते रस्त्यातच कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशकडे निघालेल्या दोन मजुरांचा वाटेतच मृत्यू, दोघांना कोरोना झाल्याचा संशय
सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात चाकरमान्यांना गावी येण्यासाठी ऑनलाईन पासेस सुविधा चालू केली आहे. परंतु यानुसार केलेल्या अर्जाचं उत्तर येईपर्यंत येवढा उशीर लागतो की चाकरमानी आपल्या गावी पायी चालत पोहोचतो. त्यामुळे अनेकजण पायी जाण्याचाच पर्याय निवडत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
