एक्स्प्लोर

नंदुरबारमध्ये शाळेच्या इमारतीवर वीज कोसळली!

नवापूर शहरासह तालुक्यातील चिंचपाडा, विसरवाडी परिसरात विजेचा कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.

नंदुरबार : नवापूर शहरासह तालुक्यातील चिंचपाडा, विसरवाडी परिसरात शुक्रवारी मद्यरात्री विजेचा कडकडाटासह नवापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र याचवेळी नवापूर शहरातील डी जे अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल शाळेच्या इमारतीवर वीज पडण्याचा मोठा आवाज झाला व क्षणातच शाळेच्या इमारतीवर वीज पडली. शाळेत एकूण 500 विद्यार्थी उपस्थित होते. सुदैवाने जीवितहानी टळली असून, वीज पडल्यामुळे शाळेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नवापूर येथील डी जे अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूलची इमारत तीन मजली आहे. चौथ्या मजल्यावर सिमेंटची पाण्याची टाकी आहे. साडे दहा वाजेच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि थोड्या वेळाने वीज शाळेतील पाण्याचा टाकीवर पडली.टाकीचे दोन ठिकाणाचे भाग कोसळून विटा सिमेंटचे तुकडे तिसऱ्या मजल्यावर आल्याने मोठा आवाज झाला विद्यार्थी व शिक्षक घाबरुन गेले. सर्व विद्यार्थी मैदानात आले. इयत्ता पहिली ते दहावीचे सुमारे 500 विद्यार्थी घाबरून गेले लहान मुले रडायला लागली. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावत मनातील भीती काढली व थोड्या वेळाने शाळेला सुट्टी दिली. तळमजल्यावर इयत्ता पहिली ते चौथी व नववी दहावी चे चार वर्ग व कार्यालय आहे. दुसऱ्या मजल्यावर पाचवी ते आठवी आणि इतर वर्ग आहेत. तिसऱ्या मजला एक छोटा रूम त्यावर चौथ्या मजल्यावर पाण्याची टाकी बांधली आहे. येथे वीज पडली होती. नवापूर शहरातील डि जे अग्रवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवापूर शहरातील सुमारे 500 विद्यार्थी शिकत आहे. या शाळेतील संचालक मंडळाने शालेय इमारत अद्ययावत सुविधायुक्त तयार केली आहे. परंतू शुक्रवारी वीज पडल्याने वीज रोधक यंत्र बसण्याची मागणी पालकांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget