एक्स्प्लोर

शिकारीसाठी आलेल्या बिबट्याची गायींकडून शिकार

विशेष म्हणजे बिबट्यावर गायींनी हल्ला केला त्यावेळी गोठ्याबाहेर असलेल्या दुसऱ्या बिबट्याने तेथून धूम ठोकली. संगमनेरमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

अहमदनगर : बिबट्याने गायीची अथवा मानवाची शिकार केल्याच्या घटना नेहमी घडत असतात. मात्र गायीच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला आपले प्राण गमावावे लागल्याची विलक्षण घटना समोर आली आहे. शिकारीसाठी गोठ्यात घुसलेल्या बिबट्याला 30 ते 35 गायींनी एकत्रित हल्ला करुन ठार केलं. संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर येथील ही घटना आहे.

विशेष म्हणजे बिबट्यावर गायींनी हल्ला केला त्यावेळी गोठ्याबाहेर असलेल्या दुसऱ्या बिबट्याने तेथून धूम ठोकली. संगमनेरमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

संगमनेर तालुक्यातील उंबरी-बाळापूर शिवारातील कारवाडी परिसरातील उंबरकर वस्तीत सूर्यभान रावसाहेब उंबरकर यांचा गायींचा मुक्त गोठा आहे. त्यामध्ये 30 ते 35 जनावरे आहेत. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास या गोठ्यात एका बिबट्याने मागील बाजूने प्रवेश केला. त्यामुळे गायी सैरावैरा पळत सुटल्या. तसेच त्यांनी मोठमोठ्याने हंबरडा फोडत, बिबट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली.

या आवाजाने उंबरकर कुटुंबियांनी गोठ्याकडे धाव घेतली. यावेळी त्यांना एक बिबट्या या गायींच्या पायाखाली तुडवला जात असल्याचे, तर दुसरा गोठ्याबाहेर उभा असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत तात्काळ वनविभागाला माहिती दिली.

वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा गायीच्या पायाखाली दीड वर्षाचा नर जातीचा बिबट्या मृत झाल्याचे आढळले. या बिबट्याच्या हल्लात एक वासरुही जखमी झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Mumbai Agitation: मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या मनसुब्यांना झटका, आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली
मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या मनसुब्यांना झटका, आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मुंबईत मनोज जरांगेंना नो एन्ट्री, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, 'या' कारणामुळे आंदोलनाला नाकारली परवानगी
मुंबईत मनोज जरांगेंना नो एन्ट्री, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, 'या' कारणामुळे आंदोलनाला नाकारली परवानगी
Manoj Jarange : बावनकुळे बाईच्या पदराआड लपतात, त्यांच्या अधिकाऱ्यांचे शनिवारी रविवारीही काम सुरू; मनोज जरांगे यांची जहरी टीका 
बावनकुळे बाईच्या पदराआड लपतात, त्यांच्या अधिकाऱ्यांचे शनिवारी रविवारीही काम सुरू; मनोज जरांगे यांची जहरी टीका 
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'

व्हिडीओ

Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
Mumbai Crime News: डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
मोठी बातमी, पाचगणीमधून लष्कर-ए-तोयबाशी संबंधित व्यक्तीस अटक; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण
Sunetra Pawar Post:
"दादांची रांगोळी पाहिली अन् मन थांबलं..."; अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार पुन्हा भावूक, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
Chhatrapati Sambhajinagar : गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
गंगापूर-खुलताबादमधील एक हजार 86 शिक्षकांची वेतनवाढ रोखली; शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश, मुख्यालयी न राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
Embed widget