Devendra Fadnavis : हे सरकार मुंबईतल्या इमारतीत हरवलंय, दलालीत अडकलंय, त्यांना मराठवाड्याची चिंता नाही : फडणवीस
औरंगाबादमध्ये आयोजीत केलेल्या जाहीर कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीक केली. हे सरकार इमारतीत हरवलंय, दलालीत अडकलंय असे फडणवीस म्हणाले.
![Devendra Fadnavis : हे सरकार मुंबईतल्या इमारतीत हरवलंय, दलालीत अडकलंय, त्यांना मराठवाड्याची चिंता नाही : फडणवीस Leader of Opposition Devendra Fadnavis criticism on state govt in aurangabad Devendra Fadnavis : हे सरकार मुंबईतल्या इमारतीत हरवलंय, दलालीत अडकलंय, त्यांना मराठवाड्याची चिंता नाही : फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/21/454089f9ba2cbe1f10e6799a3b528bf9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Devendra Fadnavis : हे सरकार मुंबईतल्या इमारतीत हरवलं आहे. दलालीत अडकल आहे, त्यांना मराठवाड्याची चिंता नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. रोज सकाळी उठायचं नको ते बोलायचं. एक दिवस तरी दुष्काळ, शेतकरी, वीज कनेक्शन याबाबत बोलले आहेत का? असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. औरंगाबादमध्ये आयोजीत केलेल्या जाहीर कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
आमच्या मनात मराठवाडा आहे, त्यांच्या मनात मराठवाडा नाही, त्यांच्या भाषणात नाही, त्यांनी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळचा मूडदा पडला असल्याची जहरी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली. गोदावरी खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी योजना आणली. या कामाची फाईल या सरकारने वितभर पुढे सरकवली नाही. हे सरकार मुंबईतील इमारतीत हरवलं आहे. दलालीत अडकल आहे, त्यांना मराठवाड्याची कोणताही चिंता नसल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, भजपचे आमदार प्रशांत बंब हे अभ्यासपूर्ण मांडणी करतात. ते जे मुद्दे मांडतात त्याची उत्तरे सरकार कधीच देत नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. माननीय मोदीजी यांचा अजेंडा एकच आहे, प्रत्येकाच्या जीवनत परिवर्तन झाले पाहिजे. वेगवेगळ्या योजना मोदींनी सुरू केली त्यातून जनेतेचे कळ्याण झाले असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. ज्यांचे कोणी नाही, त्यांचे मोदीजी आहेत. त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी मोदीजी आहेत असे फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Nitesh Rane on Shiv sena : महाराष्ट्राच्या प्रधान सेवकानं जनतेला भेटलेलं आम्हालाही पाहायचंय; नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
- Aaditya Thackeray : कोरोनाचं संकट दूर व्हावं; आमच्या हातून चांगलं काम घडावं, आदित्य ठाकरेंचं अंबाबाई चरणी मागणं
- Devendra Fadnavis : "आघाडी केली तरी लोकसभेत फायदा होणार नाही" फडणवीसांची मविआवर टीका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)