एक्स्प्लोर

CAA Protest | कितीही आंदोलनं झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणारच, कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांचं वक्तव्य

हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुसलमानांचाही आहे असं वक्तव्य केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सगळ्या शंका दूर करण्यात येतील असं देखील रविशंकर प्रसदा म्हणाले.

मुंबई : नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात दिल्ली, पाटणा, लखनौ, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आली आहे. ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळीची घटना घडल्या आहेत. दरम्यान केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी नागरिकत्व विधेयकावरुन सुरु असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. 'नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सगळ्या शंका दूर करण्यात येतील. तसंच विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत, मात्र तुकडे तुकडे गँगशी चर्चा करणार नसल्याचंही त्यांनी ठणकावलं आहे'. रविशंकर प्रसाद म्हणाले, 'आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत, मात्र तुकडे-तुकडे गँग, शहरी नक्षलवादी किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी चर्चा करणार नाही. ही आंदोलनं आमच्या राजकीय विरोधकांकडून पुरस्कृत आहेत. नागरिकत्व कायदा कोणत्याही भारतीय नागरिकाला लागू होत नाही. यामध्ये भारतीय मुस्लिमांचाही समावेश आहे. त्यांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. ते भारताचे नागरिक म्हणून कायम राहतील. आंदोलन झाली तरी कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याचं देखील रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. अनेक लोक जाहीरपणे नरेंद्र मोदींना मत न देण्याचं आवाहन करत आहेत. ते सर्व मोदींचा द्वेष करणारे आहेत, असे देखील रवीशंकर प्रसाद म्हणाले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यासह देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेश, लखनौमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड केल्याचे प्रकार झाले आहेत. देशभरातील डाव्या संघटनांनी आज देशभर एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. काही ठिकाणी संचारबंदी तर, अनेक मुख्य शहरांत इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यातील अनेक शहरांत लोक रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले असून शांततेत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला राजकीय नेत्यांसह काही बॉलिवुड सेलीब्रीटींनीही उपस्थितीत लावल्याचे पाहायला मिळाले. या अगोदर नाशिकच्या मालेगावमध्येही मुस्लीम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget