एक्स्प्लोर
Advertisement
संपूर्ण गावाचा अवयवदानाचा संकल्प, लातूरच्या आनंदवाडीची देशात दखल
लातूर : रक्तदान हे श्रेष्ठदान असं आपण नेहमी म्हणतो, पण रक्तदानाइतकंच महत्त्वाचं दान आहे ते म्हणजे अवयवदान... लातूरच्या आनंदवाडी गावाने मिळून अवयवदानाची मोहिम हाती घेतली. त्यामुळे देशपातळीवर त्यांचा गौरव केला जात आहे.
आनंदवाडी... लातूर जिल्ह्यातलं जेमतेम लोकसंख्या असणारं गाव... गाव लहान जरी असलं तरी गावकऱ्यांची कामगिरी मात्र महाराष्ट्राला अभिमान वाटावी अशी आहे... कारण अवयव दानाच्या उपक्रमात देशात अग्रेसर येण्याचा बहुमान या गावाना पटकावला आहे.
गेल्या 14 ऑगस्टला स्मशामभूमीत श्रमदान करण्यासाठी गावकरी एकत्र आले. मात्र त्याचवेळी ग्रामसेवकाने त्यांच्यासमोर अवयवदानाची कल्पना मांडली. ही कल्पना गावकऱ्यांनी नुसती ऐकूनच घेतली नाही, तर संपूर्ण गावाने एकमुखाने मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतला.
कुठलंही काम करायचं तर ते एकत्र येऊनच, असा या गावाचा अलिखित नियम झाला आहे. गावचे रस्ते असोत किंवा ग्रामपंचायतीची इमारत... सगळ्या गोष्टी गावकऱ्यांनी स्वत: उभारल्या.
या गावात ना आजवर कधी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली, ना कधी कोणी एकमेकांच्या नावाने शिमगा केला. त्यामुळेच या गावाला मिळालेला तंटामुक्त गावाचा पुरस्कार गावकरी आजही प्रेमाने जपत आहेत.
मृत्यूनंतर आपल्या डोळ्यांनी कुणीतरी हे जग पाहावं, मृत्यू नंतर आपल्या हातांनी कुणाला तरी आधार मिळावा, अशा मरणोत्तर अवयवदानाचं गमक आणि देण्यातला आनंद आनंदवाडीतल्या ग्रामस्थांनी ओळखला आहे. त्यामुळे अजरामर कसं व्हावं हे आनंदवाडीच्या लोकांकडून शिकावं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement