मुंबई : जगभरात ख्याती असलेले दिग्गज उद्योजक रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर 10 ऑक्टोबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी मुंबईत हजारो लोक जमले होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी रतन टाटा यांना त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान, रतन टाटा यांचा जीवलक युवा मित्र शांतनू नायडू हादेखील यावेळी उपस्थित होता. शांतनू रतन टाटा यांचा चांगला मित्र होता. त्याची हीच ओळख सर्वांना माहिती आहे. मात्र अख्ख्या महाराष्ट्राला हेवा वाटावा, असे काम तो गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करतो आहे. 


रतन टाटा आणि शांतनू नायडू यांच्यात स्नेहबंध


शांतनू नायडू हा मुळचा पुण्याचा आहे. त्याचं इंग्रजीवर चांगलंच प्रभुत्त्व आहे. मात्र तो मूळचा पुण्याचा आहे. विशेष म्हणजे तो अस्खलितपणे मराठी बोलतो. त्याने त्याचं उच्चशिक्षण पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून घेतलेलं आहे. शांतनू नायडू 2014 साली  Tata Elxsi या टाटा उद्योग समूहाच्या कंपनीत काम करत होता. तेव्हाच रतन टाटा आणि शांतनू नायडू यांच्यातील स्नेहबंध जुळले. त्यानंतर हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र झाले. शांतून नायडूला श्वान फार आवडतात. वाहनांच्या धडकेत भटक्या कुत्र्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण बरेच आहे. हे प्रमाण कमी व्हावे म्हणून तो प्रयत्न करतो. रतन टाटा यांनादेखील श्वान फार आवडायचे. या दोघांच्या श्वानप्रेमामुळेही त्यांच्यातील मैत्री अधिक फुलत गेली. 






कित्येक दिवसांपासून करतोय 'हे' अनोखं काम


शांतनू नायडू गेल्या कित्येक दिवसांपासून मुंबईत एक खास मोहीम राबवत आहे. आजकालच्या सोशल मीडियाच्या काळात तरुण-तरुणाी पुस्तकांपासून दूर झालेले आहेत. समाजातील प्रत्येक वयाच्या व्यक्तीमध्ये वाचनसंस्कृती पुन्हा एकदा रुजावी यासाठी शांतनू नायडू प्रयत्न करतोय. त्यासाठी तो पुणे आणि मुंबईत एक खास मोहीम राबवत आहे. या दोन्ही शहरांत तो पुणे बुकीज आणि बॉम्बे बुकीज या नावाने रिडर्स क्लब भरवतो. या रिडर्स क्लबमध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे तो आवाहन करतो. 


रिडर्स क्लबमध्ये नेमकं काय होतं? 


शांतून नायडूच्या या रिडर्स क्लबमध्ये लोक स्वयंस्फूर्तीने एका ठिकाणी जमा होतात. जमा झालेले लोक मिळेल ती सोईची जागा पाहून पुस्तके वाचत बसतात. मुंबईतील चर्चगेटमध्ये प्रत्येक रविवारी सकाळी आठ ते दहा या दोन तासांसाठी रिडर्स क्लब भरवला जातो. सोबत पुण्यातही प्रत्येक रविवारी सकाळी याच वेळेत लोक वाचन करण्यासाठी जमा होतात. या रिडर्स क्लबमध्ये सहभगी होण्यासाठी कोणतीही फी नाही किंवा कोणताही नियम नाही. शांतनू नायडू हा रतन टाटा यांचा चांगला मित्र होता, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी त्याची चाललेली ही धडपड क्वचितच लोकांना माहिती आहे. त्याच्या या अनोख्या मोहिमेचे अनेकांकडून स्वागत करण्यात आले आहे. दिवसेंदिवस त्याच्या या रिडर्स क्लबला वाचकांची मोठी गर्दी होत आहे.  


हेही वाचा :


Ratan Tata Death: रतन टाटांना शेवटचे पाहण्यासाठी धावत आले, पण..., आक्रोश करणाऱ्या जमावाला शांतनू म्हणाला Everything is Over


Ratan Tata Death: रतन टाटांना अखेरचा निरोप देऊन शांतनू जायला निघाला, पण बाईकच दिसेना; शेवटी म्हणाला, 'टॅक्सीसे जाते है...'


Ratan Tata Death: तेरे जैसा यार कहा...! शांतनू पुढे, रतन टाटांचं पार्थिव मागे; Video पाहून सर्वांचे डोळे पाणावले