Lata Mangeshkar Passes Away: भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज निधन झालंय. वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनामुळं संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरलीय. लता मंगेशकर यांचे जगभरात चाहते आहेत. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील रहिवाशी किसन म्हसाळ हे देखील लता दिदींच्या आवाजाचे मोठे चाहते आहेत. म्हसाळ हे वयाच्या सातव्या वर्षापासून लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे ऐकत आहेत. त्यांनी ट्रान्झिस्टर रेडिओपासून ते आता मोबाईलपर्यंत लता मंगेशकरांनी गायलेले गाणी ऐकत आहेत. आज लता मंंगेशकर यांचं निधन झाल्यानं या 80 वर्षीय आजोबांच्या काय आहेत आठवणी पाहुयात.


किसन म्हसाळ हे बुलढाण्यातील संग्रामपूर येथील रहिवाशी आहेत. जंगलात गुरे चारने व शेती करणे हा त्यांचा व्यवसाय. वयाच्या सात वर्षांपासून म्हणजे ट्रान्झिस्टरपासून तर, मोबाईलपर्यंत म्हणजे तब्बल 73 वर्ष फक्त लता मंगेशकरांची गाणी ऐकले आहेत. म्हसाळ यांना 1952 पासून लता दिदींच्या गाण्याचा छंद लागला. आजही ते आवडीनं लता मंगेशकर यांचे गाणे ऐकतात. जुन्या जमान्यात ट्रान्झिस्टर रेडिओ असायचे गुरे चरताना जंगलात रेडिओवर सेल संपल्यावर लतादिदींचे गाणी बंद झाली की गुरे सुद्धा सैरवैर धावायची. पण गाणी सुरू केली की गुरांना सुद्धा जंगलात ती ऐकावी वाटत होती, असं किसन म्हसाळ यांनी म्हटलंय. 


लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. उपचारासाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर 28 जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र, 5 फेब्रुवारीला पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली. ज्यामुळं त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. मात्र, आज सकाळी 8.12 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha