Lata Mangeshkar Death News :  गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. दरम्यान ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन  (Amitabh Bachchan) यांनीदेखील लता मंगेशकरांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. 


लता मंगेशकर यांचे ब्रीच कॅंडी रुग्णालयात सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झाले आहे. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहित लता मंगेशकांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी लिहिले आहे,"शतकांचा आवाज हरपला, आता स्वर्गातही लतादिदींचा आवाज रुंजी घालेल". 


अमिताभ बच्चन यांनी शोक व्यक्त करत पुढे लिहिले आहे,"लता दीदी आज आपल्याला सोडून निघून गेल्या आहेत. आता त्यांचा अवीट सूर स्वर्गातही रुंजी घालेल. दिदींच्या जाण्याने मला अतिव दु:ख होत आहे. गेली 90 वर्ष त्यांनी भारतीयच नव्हे तर जगभरातील रसिकांची सेवा केली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."


लतादीदींच्या जाण्याने अवघ्या संगीतक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. राहुल देशपांडेंपासून ते एआर रहमानपर्यंत अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. लता मंगेशकरांच्या अंत्यदर्शनासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital)आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.


संबंधित बातम्या


Lata Mangeshkar Passes Away: गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 


Lata Mangeshkar-PM Modi Conversation: लतादीदी मोठ्या बहिणीसमान! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये ऐकवला होता आपुलकीचा फोन कॉल!


Lata Mangeshkar Songs : 'अजीब दास्तां है ये' ते 'एक प्यार का नगमा', लता मंगेशकरांची 10 सदाबहार गाणी


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha