Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना (Lata Mangeshkar) कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी म्हणाले की, "सध्या लता मंगेशकर आयसीयूमध्ये आहेत. त्यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेता त्या आणखी किती दिवस रुग्णालयात असतील, याबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही. त्यांना कोणालाही भेटू दिले जात नाही. त्यांची प्रकृती स्थिर आहे. याशिवाय मी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही अधिक माहिती देऊ शकत नाही."
लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर डॉ. प्रतीत समदानी म्हणाले, "मला यावर भाष्य करायला आवडणार नाही. मला जे काही काही सांगायचं होतं ते मी यापूर्वीच सांगितले आहे".
कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना न्युमोनिया झाला आहे. याला कोविड न्युमोनिया असं म्हटलं जातं. लता मंगेशकर यांना रविवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईच्या महापौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. रविवारी पहाटे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत.
दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. आज त्या तब्बल 92 वर्षांच्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. लता दीदींना आपल्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला आहे. त्यांनी अवघ्या 5 वर्षाच्या वयात आपल्या वडीलांकडून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर, आरोग्यमंत्री म्हणाले..
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर; डॉक्टरांनी दिली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha