Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना  कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. 92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, लता मंगेशकर यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुढे डॉक्टर म्हणाले, त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे.


डॉक्टरांनी सांगितले, लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्युमोनिया देखील झाला आहे. त्याचं वय लक्षात घेता, त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना 7 ते 8 दिवस ऑब्जर्वेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.


काही दिवसांपूर्वी  उषा मंगेशकर यांनी देखील लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. दीदींची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्या लोकांसोबत बोलू शकतात. पण डॉक्टरांनी त्यांना लोकांबरोबर बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे, असं उषा मंगेशकर यांनी सांगितले होते. 


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना  'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. 



संबंधित बातम्या


Lata Mangeshkar Corona Positive : लता मंगेशकरांना घरातील कर्मचार्‍याकडून कोरोनाची लागण


Mumbai Coronavirus Update : कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, टास्क फोर्सचा दावा, मुंबईकरांसाठी सर्वात मोठा दिलासा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha