Solapur Barshi Froud Case : मागील काही दिवसांपासून सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम' ची सर्वत्रच चर्चा सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला असून सध्या तो फरार आहे. बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींनाची यावेळी फसवणूक करण्यात आली आहे. दरम्यान याच प्रकरणाचा तपास करुन फटेचा तपास लावण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या आदेशानंतर हे पथक स्थापन करण्यात आलं आहे.


या विशेष पथकात आर्थिक गुन्हे शाखा आणि सोलापूर ग्रामीणचे उपअधीक्षक यामध्ये संजय बोठे यांच्यासह अन्य चार सदस्यांचा समावेश आहे. ज्यात विशाल हिरे (पोलीस उपअधीक्षक), रामदास शेळके (पोलीस निरीक्षक), नारायण मिसाळ (सहायक पोलिस निरीक्षक) आणि ज्ञानेश्वर उदार (सहायक पोलिस निरीक्षक)  यांचा समावेश आहे. नुकतीचआरोपी विशाल फटे याचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या दीपक आंबरे याने या प्रकरणात फिर्याद दिली होती. विशालने बार्शीतल्या कित्येक लोकांना फसवल्याचं बोललं जात असताना त्याने मित्रांना देखील सोडलेलं नाही. दीपक आंबरे यांच्यासह अनेक जवळच्या मित्राना देखील विशाल फटेने कोट्यवधींची फसवणूक केली असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता हे विशेष पथक स्थापन झाल्यामुळे लवकरत विशालचाही शोध घेतला जाईल, अशी आशा नागरिक करत आहेत


तक्रारदारांचा आकडा वाढला


बार्शी फटे प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 76 जणांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ज्यामुळे फसवणूकीचा आकडा 18 कोटींवर पोहोचला आहे. 76 जणांची 18 कोटी 53 लाख 17 हजार रुपयांना फसवणूक झाल्याचं समोर येत आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha