एक्स्प्लोर
लतादीदींना 28 दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज, ट्वीट करत चाहत्यांचे मानले आभार
लतादिदींनी स्वत: ट्विट करुन याची माहिती चाहत्यांना दिली. तसंच, दीदींनी चाहत्यांचे आणि रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले. दीदींना न्यूमोनिया झाला होता. मध्यरात्री 2 वाजता त्यांना श्वसनाचा त्रास उद्धभवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आता घरी सोडण्यात आले आहे.
मुंबई : गानकोकीळा लता मंगेशकर यांना २८ दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. लतादिदींनी स्वत: ट्विट करुन याची माहिती चाहत्यांना दिली. तसंच, दीदींनी चाहत्यांचे आणि रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले. दीदींना न्यूमोनिया झाला होता. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू होते.
लता दीदींनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, नमस्कार गेल्या 28 दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयाच उपचार घेत होते. मला न्युमोनिया झाला होता. माझी प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच घरी जावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर आज मी घरी आले आहे. माई, बाबा, देव आणि तुमचं सगळ्यांच प्रेम आणि प्रार्थनेमुळे माझी तब्येत बरी आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते.
ब्रीच कँडी मधील डॉक्टर माझ्यासाठी देवदूत आहेत. तेथील कर्मचारी वर्ग देखील चांगला आहे. मी पुन्हा एकदा तुमची आभारी आहे. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असेच राहावे.नमस्कार.पिछले 28 दिनोंसे मैं ब्रीच कैंडी हॉस्पिटल में थी। मुझे न्यूमोनिया हुआ था.डॉक्टर चाहते थे की मैं पूरी तरह से ठीक हो जाऊँ फिर घर जाऊँ,आज मैं घर वापस आगयी हूँ. ईश्वर, माई बाबा के आशीर्वाद और आप सब के प्यार,प्रार्थनाओं से मैं अब ठीक हूँ.मैं आप सब की हृदयसे आभारी हूँ.
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 8, 2019
मेरे ब्रीच कैंडी के डॉक्टर सच में फ़रिश्ते हैं, यहाँ का सभी कर्मचारी वर्ग भी बहुत अच्छा है.आप सब की मैं पुनः एक बार मन से आभारी हूँ. ये प्यार और आशीर्वाद ऐसे ही बना रहे।
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 8, 2019
मध्यरात्री 2 वाजता त्यांना श्वसनाचा त्रास उद्धभवल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आता घरी सोडण्यात आले आहे. लता दीदींनी केलेल्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement