अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी गेल्या 2 दिवसांपासून प्रयत्न करत आहे. आजही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर आणि दिलीप वळसे-पाटील हे अजित पवारांशी चर्चा करत आहे. विधीमंडळ गटनेते पदावरुन राष्ट्रवादीने अजित पवारांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. मात्र पक्षामधून काढून टाकलेले नाही. त्यामुळं अजूनही राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जंयत पाटील हेही अजित पवारांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. मी अजित पवारांना आज शेवटचं समजावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
महाविकासआघाडीच्या पत्रकार परिषदेत काय झालं?
आज आम्ही विधानसभेतील 162 आमदारांच्या सह्या असणारं पत्र राज्यापलांना दिलं आहे. त्यामुळं भाजप असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच घटकपक्षांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, असं यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आम्ही वेळ वाढवून मागितली असतानाही आमची मागणी राज्यपालांनी फेटाळून लावली होती. लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली, तसंच लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अजित पवारांची मनधरणी करण्यात अपयश -
शनिवारी सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादीकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप यामध्ये राष्ट्रवादीला यश आलेलं नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे अनेक वर्षांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांना अजित पवारांची समजूत काढण्यासाठी पाठवलं होतं. मात्र दीड तासाच्या चर्चेनंतरही अजित पवारांची मनधरणी करण्यात पाटील यांना अपयश आलं. तत्पूर्वी रविवारी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही अजित पवारांची भेट घेतली. तटकरेंनी अजित पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही त्यात अपयश आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांना परतण्यासाठी भावनिक साद घातली आहे. याशिवाय आमदार रोहित पवार यांनीदेखील फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अजित पवार यांनी माघारी परतण्याचं आवाहन केलं आहे.
संबंधित बातम्या -
अजित पवारांकडं 27 आमदारांचं पाठबळ; बदल्यात 12 मंत्रिपदं अन् 15 महामंडळं?
"पवारसाहेबांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार"
अजित पवारांची भाजपसोबत जाण्यामागची 10 कारणं
Sharad Pawar PC | अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, त्यांच्याशी बोलणं झालं नाही : शरद पवार | ABP Majha