बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (25 नोव्हेंबर)सुनावणी होणार आहे. त्यामुळं उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर खूप गोष्टी अवलंबून आहेत.
वर्षावर काय चर्चा झाली?
प्रथमतः सुप्रीम कोर्टाच्या तांत्रिक बाबींवर चर्चा होणार. या चर्चेत मुख्यमंत्री, वकील, भुओइंद्र यादव, गिरीश महाजन आणि विनोद तावडे उपस्थित असतील
दुसरं म्हणजे अजित पवार गटाच्या पाठींब्याने जर भाजप बहुमत सिद्ध करू शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजित पवार गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळ दिले जाऊ शकतात
अजित पवार यांची या सत्ता स्थापनेच्या वाट्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुपेंद्र यादव यांच्यासोबत प्राथमिक चर्चा होणार आहे.
यासाठी अजित पवार यांना 27 आमदार पाठींबा देण्याची शक्यता वर्तवली जातेय
मात्र हा आकडा मिळवण्यासाठी भाजप आणि अजित पवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे
आजच्या बैठकीत अजित पवार यांचे विधिमंडळ गट नेते पद आणि व्हीपचा अधिकार कायम कसा ठेवता येईल याबाबत खलबतं होतील.
याच मुद्द्यावर उद्याची सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि सत्ता समीकरण अवलंबून असेल
ऑपरेशन लोटस आणि शिवतेज?
भाजपने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन शिवतेज सुरु केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणाऱ्या आमदारांपैकी काही आमदार परतले आहेत. मात्र, अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त पद्धतीने घेतली जाते. त्यामुळं कोणी कुणाला मतदान केले हे समजणार नाही. याचसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे मन वळवण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जाणार आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी जरी भाजपशी युती तोडली असली तरी अजूनही शिवसेनेचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. हे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला मतदान करतील, असा भाजपच्या नेत्यांना विश्वास आहे. यासाठी भाजप ऑपरेशन शिवतेज राबवणार असल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या -
भाजपनं महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला : खासदार संजय राऊत
"पवारसाहेबांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार"
अजित पवारांची भाजपसोबत जाण्यामागची 10 कारणं
Ajit Pawar | अजित पवार गटाला 12 मंत्रिपद मिळणार- सूत्र | ABP Majha